Zoster झॉस्टर् n--- नागीण. विषाणूने (व्हायरसने) होणारा एक त्वचा रोग.
Zucchetto झुकेटो n.--- डोक्याभोवती घट्ट बसणारी ख्रिश्चन पुरोहितांची छोटी गोल टोपी. (पुरोहितांच्या हुद्द्याप्रमाणे ह्या टोपीचा रंग वेगवेगळा असतो. उदाहरणात Priest ची काळी, Bishop ची जांभळी, Pope ची पांढरी, वगैरे)
Zucchini झूकीनी n.--- काकडी सारखा दिसणारा गडद हिरव्या रंगाचा व उन्हाळ्यात उगवणारा एक प्रकारचा भोपळा. ह्या भोपळ्याचे झाड.
Zumba झूम्बा n.--- प्रसिद्ध गाण्यांच्या (विशेषतः लॅटिन-अमेरिकन गाण्यांच्या) तालावरती करायचा व्यायामाचा एक प्रकार.
Zygodactyl झाइगडॅक्टिल् a. & n. --- प्रत्येक पायाला दोन बोटांची एक जोडी पुढे व एक जोडी मागे असलेला (पक्षी).
Zygote झाइगोट् n.--- दोन जनजपेशींच्या (gametes) संयोगातून उत्पन्न होणारी पेशी.