diarrh(o)ea डायरीआ n.---हगवण, अतिसार, संग्रहणी, रेच, जुलाब, विष्ठा पाण्यासारखी पातळ होऊन वारंवार बाहेर पडण्याचा विकार. (पहा: Dysentery) (हिंदी: दस्त (की बिमारी))
diary डायरी n.--- रोजनिशी, दैनंदिनी, आन्हिकी.
diaspora डायॅस्परा n.--- पालेस्टाइन (इझ्राएल) बाहेरील अन्यधर्मीय देशांतील यहुदी(ज्यू). अशा अहुद्यांचे (पुनर-)वसन/पुनर्वसनाचे क्षेत्र. विशिष्ट-ध्रमॆयाञ्चा/वन्शॆयनचा अन्यधर्मीय(अन्यावंशीय)प्रधान देशांतून विखुरलेला (पांगलेला) समुदाय. विशिष्ट संस्कृति जपणारा राष्ट्रांगभूत (अल्पसंख्य/विखुरलेला) समुदाय.
diastole डायॅस्टोलि n.--- प्रसरण, शिथिलिभवन (रक्ताशय/धमनींचे/हृदयाचे). विकसन व वृद्धि.
diatribe डायट्राइब् n.--- कठोर-जळजळीत-शिवराळ टीका.
dice डाइस् n.--- फांसे, फांशाचा खेळ.
dicey डायसी a.--- (फलितासंबंधी) अनिश्चितता / भय / धोका / संशय यांनी भरलेला/ग्रस्त. संदिग्ध, डळमळीत.
dichotomy डाय्कॉटमी n.--- (परस्पर- विरोधी/विसंगत) द्वंद्वात झालेली विभागणी. द्विधास्थिति, द्वंद्वावस्था, दुहेरी भेद, द्वैत.
dictate डिक्टेट् v.t.--- सांगून लिहविणे. n.--- आज्ञा.
dictation डिक्टेशन् n.--- शुद्धलेखन, सांगून लिहविणे, श्रुतलेख.
dictator डिक्टेटर् n.--- मुखत्यार, अधिकारी, हुकूमशहा.
dictatorial डिक्टेटोरिअल् a.--- ‘dictator’ विषयक /- स्वरूपाचा.
dictatorship डिक्टेटरशिप् n.--- हुकूमशाही.
diction डिक्शन् n.--- शब्दयोजना, शब्दाच्या निवडीतील शुद्धता व औचित्त्य.
dictionary डिक्शनरी n.--- शब्दांचा सार्थकोश, शब्दकोश.
dictum डिक्टम् n.--- नियमात्मक अधिकृत घोषणा, तत्वनिर्णय, म्हण, न्याय, वचन, सिद्धांतवचन. (pl.--- -dicta / dictums)
didactic डिडॅक्टिक् a.--- उपदेशपरयुक्त, शिक्षकसुलभ.
die डाय् v.i.--- मरणे, संपणे, समाप्त होणे, देवाज्ञा होणे, थकणे. n.--- फांसा, पाश, शिक्का.
diet डाएट्/ डायट् n.--- खाणे, भोजन, आहार, अन्नपाणी, (प्रकार व मात्रा यांनी नियंत्रित) अन्न. देशाच्या/प्रांताच्या कायदेकरणाऱ्या प्रतिनिधि मंडळाचे / विधिमंडळाचे एक प्रचलित नाव/संज्ञा. v.t.--- पथ्यावर ठेवणे, पथ्यावर राहणे, जेऊ घालणे, पोसणे.
dietary डाय्(अ)टरी n.--- नेमून दिलेला आहार. a.--- आहारनियमन संबंधीचा.
dietetic डायटेटिक् a.--- = dietary.
dietetics डायटेटिक्स् n.--- आहारनियमन शास्त्र, पथ्यशास्त्र.
dietician डायटीशिअन् n.--- आहार (नियमन) तज्ज्ञ, पथ्यविद्.
dietist = Dietician
dietitian = Dietician
differ डिफर् v.i.--- अंतर/तफावत असणे, मतभेद असणे, वांकडे असणे, भेद पावणे.
difference डिफरन्स् n.--- तफावत, अंतर, भेद, फरक.
different डिफरन्ट् a.--- वेगळा, दुसरा, निराळा.
differential डिफरेन्शिअल् a.--- निरनिराळा.
differentiate डिफरन्शिएट् v.t.--- -ला वेगळा/भिन्न करणे / वेगळे रूप देणे, चे वेगळेपण दाखविणे. v.i.--- भिन्न रूप / भूमिका धारण करणे, विभाजन पावणे.
differentiation डिफरन्सिएशन् n.--- विभजन.
difficult डिफिकल्ट् a.--- अवघड, दुर्बोध, जड.
difficulty डिफिकल्टि n.--- संकट, अडथळा, कठीणपणा, अवघडपणा, कष्ट, दुःख.
diffidence डिफिडन्स् n.--- अविश्वास, संकोच, शंका, आत्मविश्वासाचा अभाव.
diffident डिफिडन्ट् a.--- अविश्वासी, शंकेखोर, भिडस्त.