Ecu-Eff

Ecumenism एकमेनिझम्/इक्यूमेनिझम् n.--- सर्वधर्मांच्या/एका (विशेषतः ख्रिश्चन) धर्मांतील अनेक पंथांच्या तत्वांच्या समन्वयाची विचारप्रणाली.
Ecumenist n.--- ‘ecumenism’ चा पुरस्कर्ता.
Eczema एक्सीमा n.--- त्वचेला खाज उत्पन्न करणारा एक रोग.
Eddy एडि n.--- पाण्याचा भोवरा, चक्र . v. भोवऱ्यात फिरणे.
Edema = Oedema इडीमा
Eden ईडन् n.--- सुखाचे स्थान, एदेन नावाची बाग.
Edentate इडेन्टेट् a.--- दंतहीन, अदंत.
Edge एज् v.t.--- धार लावणे, पाणी देणे, कांठ/झालर लावणे, टोचणी देणे. N.--- कड, काठ, धार.
Edged एज्ड् a.--- धारेचा, तीक्ष्ण, जलाल, धारायुक्त.
Edgeless एज्लेस् a.--- बिनधारेचा.
Edgetool एज्टूल् n.--- धारेचे-पाणी दिलेले-हत्यार.
Edging एजिंग् n.--- संजाब, किनारी, घडी, गोट.
Edible एडिबल् a.--- खाण्याचा, भक्षणीय, खाद्य.
Edict एडिक्ट् n.--- राजाज्ञा, राजशासन, आज्ञापत्र.
Edification एडिफिकेशन् n.--- समजावणी, ज्ञानवृद्धि, शीलवर्धन, उद्धार.
Edifice एडिफिस् n.--- इमारत, मोठा इमला, हवेली.
Edify एडिफाय् v.t.--- शिकवणे, उपदेशणे, सल्ला देणे, नैतिक/आध्यात्मिक बाल देणे.
Edit एडिट् v.t.--- तपासून ग्रंथ छापण्यास तयार करणे.
Edition एडिशन् n.--- आवृत्ति, छाप, कापणी.
Editor एडिटर् n.--- वर्तमानपत्रात विषय लिहिणारा, पुस्तककर्ता, संपादक.
Editorial एडिटोरिअल् a.--- कर्त्याचा, संपादकीय.
Educate एजुकेट् v.t.--- शिकविणे, पढविणे.
Education एजुकेशन् n.--- शिक्षण, शिक्षा, विद्या.
Educational एजुकेशनल् a.--- विद्येसंबंधी, शिक्षणाचा.
Educe ईड्यूस् v.t.--- बाहेर काढणे/आणणे.
Eel एल् n.--- वांव नावाचा मासा, वाम.
Eerie / Eery इयरी a.--- भयोत्पादक, विचित्रभीषण, अनाकलनीयरीत्या भीतिदायक.
Efface इफेस् v.t.--- पुसून/खरडून टाकणे, खोडणे.
Effect इफेक्ट् v.t.--- घडवून आणणे, साधणे. N.--- कार्य, गुण, परिणाम, फळ.
Effects इफेक्ट्स् n.--- मालमत्ता, जिंदगी.
Effective इफेक्टिव्ह् a.--- गुणकारक, कार्यक्षम.
Effector इफेक्टर् n.--- शरीरांतील कर्मेंद्रिय, कार्य करणारा स्नायु व ग्रन्थि.
Effectual इफेक्चुअल् a.--- सफळ, सार्थक, सार्थ.
Effectually इफेक्चुअलि ad.--- पूर्णपणे, गुण येईल असे.
Effeminacy एफेमिनसि n.--- बायकोपणा, नामर्दपणा, स्त्रीस्वभाव, रांडपणा.
Effeminate इफेमिनट् a.--- बायक्या, नामर्द, रांड्या.
Efferent एफरन्ट् a.--- बहिर्वाही, बाहेर नेणारा.
Effervesce एफरव्हेस् v.i.--- खतखतणे, ऊत येणे, उतास येणे, उचंबळणे.
Effervescence एफरव्हेसन्स् n.--- ऊत उकळी, उमाळा, ऊर्मि, उत्साह.
Effete एफीट् n.--- वांझ, निष्फळ, गलितशक्ति.
Efficacious एफिकेशस् a.--- गुणकारी, कार्यसाधक, परिणामकारी, प्रभावशाली.
Efficacy एफिकसि n.--- गुण, कार्यसिद्धिपणा, सत्व, परिणामकारित्व, प्रभाव.