gecko गेको n.--- एक प्रकारचा छोटा सरड. (pl. gecko(e)s) (‘गेकॉक’ असा आवाज काढणारा व उभ्या व उलट्या पृष्ठभागावर चालण्याचे विशेष कौशल्य असलेला).
geek गीक् n.--- एखाद्या विषयाबद्दल विलक्षण आवड व स्वारस्य असलेली व्यक्ती.
geese गीस् n.--- ‘Goose’ चे अनेकवचन.
geld गेल्ड् v.t.--- अड खच्ची करणे/बडविणे.
gem जेम् n.--- रत्न, मणि, जवाहिर.
gemini जेमिनि n.--- मिथुन रास.
gemmary जेम्मारी a.--- रत्नाचा, जवाहिरी.
gemological जेमॉलॉजिकल् a.--- रत्न-शास्त्र-/विद्या-/-विषयक.
gemologist जेमॉलजिस्ट् n.--- रत्नविद्याविशारद, रत्नपारखी.
gemology जेमॉलजी n.--- रत्न/मणि -शास्त्र, रत्न/मणि -विद्या.
gendarme जेण्डार्म् n.--- शस्त्रसज्ज / सन्नद्ध शिपाई / रखवालदार.
gender जेन्डर् n.--- (व्याकरणात) लिंग, जाति.
gene जीन् n.--- जीवशरीरांतील पेशींच्या केंद्रात / गर्भात (nucleus) असलेल्या, विशिष्ट आनुवंशिक गुणधर्मदायी द्रव्ये (प्रथिने इ.) धारण करणाऱ्या, ‘chromosome’ च्या अंगभूत असलेल्या अनेक कणांपैकी एक.
genealogy जीनिअॅलॉजी n.--- वंशावळ, वंशवृत्त, वंशावाळीचे शास्त्र. (See : Lineage).
general जनरल् n.--- सेनापति. a.--- साधारण, सामान्य रूढीचा, सर्वांचा, सर्वसाधारण, सर्वांवरचा, सर्वश्रेष्ठ, उच्च.
generalissimo जनरलिसिमो n.--- भूदल, नौदल, वायुदल इ. सर्व सशस्त्र सेनांचा सर्वोच्च सेनापति. महासेनानी.
generality जनरॅलिटि n.--- सामान्यता, रूढि, प्रचार.
generally जनरलि ad.--- साधारणपणे, बहुतकरून, प्रायः, बहुशः, बहुधा.
generate जनरेट् v.t.--- उत्पन्न करणे, जन्म देणे.
generation जनरेशन् n.--- उत्पत्ति, उत्पादन, प्राणी इ. च्या विशिष्ट गटापासून वंशपरंपरेने इ. उपजणाऱ्या विशिष्ट गुणधर्मांचा उत्पत्तिगटांतील एक कडी. अशा पाठोपाठच्या दोन कड्यातील (सरासरी) अंतर
generational जनरेशनल् a.--- ‘Generation’ -ने उद्भवणारा / -शी संबद्ध. वंशपरंपराप्राप्त / -आगत. पिढीजात. आनुवंशिक.
generic जिनेरिक् a.--- साधारण, जातीसंबंधी, वर्गवाचक, जातिवाचक, सर्वसामान्य, सर्वसाधारण.
generous जनरस् a.--- उदार, थोर मनाचा, दाता.
genesis जेनिसिस् n.--- घटना, रचना, जनन, उत्पत्ति,उद्भव, मूळ.
genetic(al) जेनेटिक्(ल्) a.--- उत्पत्तिविषयक. उपजत, सहज, जन्मसिद्ध, अनुवंशशास्त्र (genetics) संबंधीचा.
geneticist जेनेटिसिस्ट् n.--- ‘Genetics’ चा अभ्यासक / तज्ज्ञ.
genetics जेनेटिक्स् n.--- अनुवंशशास्त्र, जीवोत्पत्ति शास्त्र, पिढ्यान्पिढ्या होणारे गुणसंक्रमण व त्यात घडणारा गुणबदल यांचे शास्त्र.
genial जीनिअल् a.--- अनुकूल, आनंदी, मनमिळाऊ.
genie जीनी n.--- भूत, पिशाच, अद्भुत शक्ति.
genital जेनिटल् a.--- जननविषयक, जननसंबंधी, (बाह्य) जननेंद्रियविषयक
genitalia जेनिटेलिया n.--- जननेन्द्रिय, उपस्थ.
genitals जेनिटल्स् n.--- बाह्य जननेंद्रिये.
genitive जेनिटिव्ह् n.--- षष्ठी विभक्ती.
geniture जेनिचर् n.--- जनन, जन्म.
genius जीनिअस् n.--- बुद्धिमान मनुष्य, आधिदैवत.
genocide जेनसाइड् n.--- विशिष्ट वंशातील सांस्कृतिक गटांतील माणसांची (पद्धतशीर) कत्तल.