Clo-Coc

Cloak क्लोक् n.--- पोकळ अंगरखा, कफनी, आडपडदा, सोंग, झांकण. v.t.--- पडद्यात झांकणे, छपविणे.
Clobber क्लॉबर् v.t.----ला ठोकणे/हाणणे. -ला पूर्ण/पराभूत/परास्त करणे.
Clock क्लॉक् n.--- मोठे घड्याळ.
Clod क्लॉड् n.--- ढेकूळ, माती, स्थूल देह, टोम्ब्या, गोळा, वशिंड.
Clodhopping क्लॉड्हॉपिंग् v.i./n… (नांगरलेल्या जमिनीतील) ढेकळांंवरून चालणे; गावंढळपणे/असभ्यपणे वागणे, ग्राम्य वर्तणूक.
Clog क्लॉग् n.---लोढणे, खोडा, अडथळा, रोख, अडचण. v.t.---खोडा घालणे, -ला अडथळा/अटकाव/अडचण करणे, अटकाविणे. v.i.---तुंबणे, तटाणे, चोंदणे .
Cloister क्लॉइस्टर् n.--- मठ. v.t.--- बंदिस्त करणे.
Clone क्लोन् n.--- नर-मादी संयोगावाचून उपजविलेले अपत्य. कलम करण्याच्या रीतीने सिद्ध केलेला नवा प्रतिकृतिप्राय जीव, समान रूपाची व्यक्ति.
Close क्लोज् n.--- शेवट,समाप्ति, आवार, रमणा. a.--- घट्ट, घनदाट, निकट, समीप, बरहुकूम, गुप्त. v.t.--- बंद करणे, आटपणे. v.i.--- संपणे. ad.--- गुपचीप रीतीने.
Closely क्लोजली ad.---दाट, गच्च, पाठोपाठ.
Closet क्लॉझेट् n.--- एकांत स्थळ, कपाट. v.t.--- एकांतात भेटणे.
Closing क्लोझिंग् n.--- समाप्तीचा, अखेरचा.
Closure क्लोझर् n.---बंद अवस्था, बंद करण्याची प्रक्रिया. थांबविण्याची प्रक्रिया/कारवाई, समाप्ति.
Clot क्लॉट् v.i.--- गोठणे, डिखळी होणे, जाता होणे. n.--- गुठळी.
Cloth क्लॉथ् n.--- विशिष्ट कामास येणारा कापडाचा तुकडा. विशिष्ट व्यवसायासाठी धारण करावयाचा पोषाख/वेश. (अशा पोषाखाने/वेशाने/कापडाने निर्दिष्ट)व्यवसाय; कापड, चिरगुट.
Clothe क्लोद् v.t.--- पांघरूण घालणे, वस्त्र नेसविणे.
Clothing क्लोदिंग् n.--- पांघरुणे, कपडालत्ता.
Clothes क्लोद्स् n.--- वस्त्रप्रावर्ण, चिरगुट, पांघरूण.
Clothier क्लोदिअर् n.--- कापड करणारा, कापडविक्या.
Cloud क्लाउड् n.--- ढग, मेघ, डाग, काळोखी, भय. v.t.--- ढगांनी भरणे, काळोखी आणणे, चित्रविचित्र करणे.
Cloudiness क्लाउडिनेस् n.--- अभ्र, मळभ.
Cloudless क्लाउड्लेस् a.--- निरभ्र, स्वच्छ, निवळ.
Clout क्लाउट् n.--- ठिगळ, फडके, (लोकांमधील) प्रभाव व राजकीय ताकत.
Clove क्लोव्ह् n.---लवंग, कांडी, कुडे, पाकळी (लसूण इ. ची).
Clover क्लोव्हर् n.---मुख्यतः जनावरांचा चारा म्हणून लावली जाणारी एक वनस्पति. ‘To live (or be) in clover :Clover च्या शेतांतील जनावराप्रमाणे) चैनीत/ऐषारामात राहणे. (past participle: Cloven)
Clown क्लाउन् n.--- खेडवळ, गावंढळ, विदूषक.
Clownish क्लाउनिश् a.--- गबाळ, गावंढळ.
Cloy क्लॉय् v.t.--- वीत आणणे, मिठी बसविणे.
Club क्लब् n.--- जूट, आखाडा, मंडळी, सोटा, गदा.
Cluck क्लक्n./v.i.--- खुटखुट करणे, खुटखुटणे, कोंबडीचा विशिष्ट आवाज काढणे, आश्चर्य/कुतूहल/काळजीदर्शक हलका उद्धार काढणे. n.--- कोंबडीचा विशिष्ट आवाज; आश्चर्य/कुतूहल/काळजीदर्शक हलका उद्धार.
Clue/Clew क्लू n.--- समस्येचे उत्तर / अडचणीतून सुटण्याचा मार्ग इ. सुचविणारी / गुंतागुंतीचा उलगडा करणारी गोष्ट/तत्व; सुताची गुंडी, पत्ता, संकेत, खूण.
Clump क्लम्प् n.--- ठोकळा, करांडा, दाटी (झाडाची), बेट.
Clumsy क्लम्झी a.--- बेढब, बेडौल, अडाणी, आडमुठ्या.
Cluster क्लस्टर् n.--- घोस, गुच्छ, पुंजका. v.i.--- घोस लागणे, पुंजका जमणे.
Clutch क्लच् n.--- तावड, पक्कड. v.t.--- धरणे, मुठीत धरणे.
Clutter क्लटर् v.i.---(विविध वस्तूंचे इ.) गोळा होणे, गर्दी करणे, (विविध गोष्टींनी) भरून टाकणे, सैरावैरा धावणे, खडखडणे, थडथडणे, टपटपणे.(उदा: ‘Dark clouds have started cluttering economic and political horizons’.) n.--- खडखडाट, थडथड, टपटप, (सामान इ. ची) गर्दी/पसारा. v.t.--- -ला व्यापणे/भरून टाकणे, (-ने (अशा अर्थाने) ‘with’ सह) -ला गडबडीने/गोंधळाने उच्चारणे.
Cluttered क्लटर्ड् a.---
Coach कोच् n.--- गाडी, आगगाडीचा (उतारू बसण्याचा) डबा. v.t.--- गाडीतून नेणे.
Coach-maker कोच्मेकर् n.--- गाडी करणारा.
Coachman कोच्मन् n.--- गाडी हांकणारा, सारथी.
Coadjutor कोअॅजिटर् n.--- मदतनीस, सहकारी.
Coagulate कोअॅग्युलेट् v.t.--- विरजविणे, गोठविणे, भिजविणे, आतविणे. v.i.--- विरजणे, पुरविणे, गोठणे, सारविणे, थिजणे, आटणे. a.--- (Coagulated) = Congealed.
Coal कोल् n.--- दगडी कोळसा, खाणीतला कोळसा. v.t.---
Coalesce कोअलेस् v.i.--- जमणे, एक गोत होणे, मिसळून जाणे, मिसळणे. एकजीव होणे, संपृक्त होणे.
Coalescence कोअलेसन्स् n.--- मिलन, मेलन, एकीभूतता, एकजीव होण्याची क्रिया, सन्निकर्ष, संहिता, संधि.
Coalition कोअॅलिशन् n.--- समागम, संयोग.
Coarse कोर्स् a.--- खरखरीत, दणगट, ओबडधोबड, दांडगा, धसकट, भरभरीत, रांगडा.
Coarsen v.t.--- रांगडा बनविणे.
Coast कोस्ट् n.--- समुद्र किनारा. v.i.--- किनार्याने जाणे.
Coat कोट् n.--- अंगरखा, पदर, पडदा, लेप, पूट.
Coax कोक्स् v.t.--- लाडीगोडी लावणे, गोंजारणे.
Cob कॉब् n.--- (नर) हंस, मका इ. धान्याचे कणीस.
Cobble कॉबल् v.i.--- जोडा सांधणे-शिवणे.
Cobbler कॉब्लर् n.--- जोडे सांधणारा, चांभार, दगडघाशा.
Cobweb कॉब्वेब् n.--- कोळिष्टक.
Coca कोक् n.--- एक दक्षिण अमेरिकी वनस्पति (झुडूप). त्याची कोकेन (‘cocaine’) धारण करणारी वाळवलेली पाने.
Cocaine कोकेन् n.---
Cochlea कॉक्लिअ n.--- कानाच्या आंतील गुंडाळी/चक्राकार नलिका यांनी बनलेला द्रवापूर्ण भाग (ज्यातून ध्वनिलहरी ध्वनिमज्जानाडीकडे जातात). (pl.: cochleas/cochleae)
Cochineal कोचिनील् a.--- किरमिजी. n.--- एक किडा.
Cock कॉक् n.--- कोंबडा, कांटा (तराजूचा), तोटी, पुढारी, नर, बंदुकीचा घोडा. v.t.--- टवकारणे, मुरडणे, घोडा चढविणे, उभारणे, उभे करणे, उंचावणे.
Cock-a-hoop कॉक्-अ-हूप् a.--- विजयोन्मादयुक्त, आनंदोत्सवात दंग, आल्हादित.
Cockade कॉकेड् n.--- लष्करी लोकांच्या टोपीची फीत.
Cockatoo कॉकटू n.--- एक जातीचा राघू, काकाकुवा.
Cockcrow कॉक्क्रो n.--- कोंबडे पहाट, कोंबडे अरवणी.
Cockle कॉकल् n.--- शिंप, शिंपी, दुपुटाचा शिंपला.
Cockpit कॉक्पिट् n.--- (कोंबड्यांच्या झुंजीचे) मैदान; आखाडा; मंच, रंगमंच.
Cockroach कॉक्रोच् n.--- झुरळ, बांगुरडा.
Cockscomb कॉक्स्कोम् n.--- कोंबड्याची शेंडी, एक फूल, अक्कडबाज, नटवा, कुर्रेबाज.
Cocktail कॉक्टेल् n.--- विविधमद्यमिश्रित पेय, (वैविध्यपूर्ण) मिश्रण.
Cocky कॉकी a.--- उर्मट, उद्धट.
Cocoa कोको n.--- ‘cacao’ (पहा) वृक्ष. या वृक्षाच्या भाजलेल्या बियांचे पीठ/चूर्ण. हे चूर्ण (गरम) दुधात मिसळून बनविलेले पेय.
Coconut कोकोनट् n.--- नारळ.
Cocoon ककून् n.--- रेशमाच्या किड्याचे स्वतःभोवती बनविलेले रेशमी तंतूंचे वेष्टन/कोष. अशा तऱ्हेचे अन्य वेष्टन/सुरक्षित स्थान/अवस्था. v.t.--- -ला कोष इ. ठिकाणी घट्ट बंद करणे.