Gar-Gea

Garret गॅरि(र)ट् n.--- छपरास लागून असलेली (माळ्याची) खोली.
Garish गॅरिश् a.--- भडक, बटबटीत, उत्तान.
Garrison गॅरिसन् n.--- तटबंदीच्या / गावाच्या किल्या, (तटबंदीने) बंदिस्त सैन्य/शिबीर / लष्करी ठाणे. v.t.--- तटबंदी करून रखवालीस सैन्य ठेवणे. ‘Garrison(s)’ = अशा ठाण्यातील / शिबिरातील सेना. अशा प्रकारची संघटना / तीमधील कार्यकर्ते.
Garrison(s) n.---
Garrulity गॅरुलिटि n.--- वाचाळता, वटवटेपणा.
Garrulous गॅरूलस् a.--- वाचाळ, बडबड्या, वटवट्या.
Garter गार्टर् n.--- पायमोजे, बांधण्याची पट्टी, मोजेबंद.
Gas गॅस् n.--- वायु, धूर, गॅस्. = Gasoline.
Gaseous गॅ/गे-सिअस् / गॅशस् a.--- वायुरूप, पोकळ, वातरूप. ‘Gas’ -संबंधित.
Gash गॅश् n.--- जखम, धाय, वार. v.t.--- जखम करणे, बाभाडा काढणे.
Gasket गॅस्केट् n.--- यंत्ररचनेतील जोड हवाबंदपणे चिकटवून धरणारा विशिष्ट आकाराचा सुटा भाग. पिधान, पिधानांग, पिधानावयव.
Gasolene गॅसोलीन् n.--- पेट्रोल, खनिज तेल. = Gasoline.
Gasp गॅस्प् n.--- धापा, दम.
Gastric गॅस्ट्रिक् a.--- जठराचा, उदरसंबंधी.
Gastric-juice गॅस्ट्रिक्-ज्यूस् n.--- जठराग्नि.
Gastroenteritis गॅस्ट्रोएंटराइटिस् n.--- जठर, व आतडे यांचा अंतरांचा दाह व तद्दुभव रेच/अतिसार.
Gate गेट् n.--- फाटक, वेस, झडण.
Gatekeeper गेट्कीपर् n.--- वेसकर, द्वारपाल.
Gateway गेट्वे n.--- दरवाजा, देवडी.
Gather गॅदर् v.t.and v.i.--- जमणे, गोळा होणे, एकवटणे, वेंचणे, तोडणी करणे, अनुमान करणे, उकळणे, वसूल करणे, सुरकुतणे. n.--- सुरकुती.
Gathering गॅदरिंग् n.--- जमाव, संमेलन, संग्रह, तोंड.
Gauche गॉश् / गोश् a.--- बेढब, आडगा, अजागळ, बावळा, गबाळ, आचरट.
Gaucherie गॉशरी a.--- आडगेपणा, बेढबपणा; गबाळग्रंथी कारभार आचरटपणाचा प्रकार.
Gaucho गाउचो n.--- (अमेरिकेतील इ.) शेती - पशुपालन - व्यवसायातील (शेतावरील) कामकरी.
Gaudiness गॉडिनेस् n.--- छानछुक, भपका.
Gaudy गॉडी a.--- छानदार, भपकेदार.
Gauge गेज् v.t.--- मोजणे, मापणे. n.--- माप, प्रमाण, व्याप्ति, जाडी.
Gaunt गॉन्ट् a.--- रोडका, हडकुळा.
Gauntlet गॉन्ट्लेट् n.--- लोखंडी मूठ, दास्ताना, हस्तत्राण. ‘To throw down the gauntlet’ (युद्धास/संघर्षास) आव्हान देणे. ‘To take up the gauntlet’ : (युद्धाचे / संघर्षाचे) आव्हान स्वीकारणे.
Gauze गॉझ् n.--- सुती/रेशमी/ अन्य बारीक धाग्याचा पातळ-पारदर्शक कपडा; पातळ/पारदर्शक पटल.
Gawk गॉक् v.i.--- तक लावून / रोखून / आ वासून / पाहणे. वेडपटासारखे पाहणे. n.--- आडमुठा, आडाणी, वेडपा.
Gawky गॉकी a.--- बावळा, गडबडलेला, गोंधळलेला, बावरलेला, बावरा.
Gay गे a.--- आनंदी, रंगेल, मजेदार, छानदार. = homosexual. भडक रंगाचा.
Gaze गेझ् v.t.--- तक लावून बघणे, ठुकठुकणे. n.--- टक.
Gazette गॅझिट् v.t.--- वर्तमानपत्र छापणे. n.--- वर्तमानपत्र.
Gazetter गॅझिटीअर् n.--- वर्तमानपत्र.
Gazingly गेझिंग्लि ad.--- टक लावून.
Gear गीयर् n.--- सरंजाम, सामान.