art आर्ट् n.--- युक्ति, हिकमत, कला, कसब, कावा.
artefact = Artifact n.---
arterial आर्टिरिअल् a.--- नाडीचा, रक्तवाहिनीचा.
artery आर्टरि n.--- हृदयापासून शरीराच्या अन्य भागांकडे शुद्ध रक्त घेउन जाणारी रक्त वाहिनी. पहा: Vein.
arteriosclerosis आर्टिरिओस्क्लेराॅसिस् n.--- शरीरांतील रक्तवाहिन्यांचे आवरण (विशेषतः वार्धक्यामुळे) लवचिकताहीन व जाड होण्याचा विकार व रोग.
arteriotomy n.--- धमनीछेदन.
artery n.--- नाडी, धमनी, शीर.
artful आर्टफुल् a.--- कावेबाज, हिकमती, कारस्थानी.
artfulness आर्टफुल्नेस् n.--- कावेबाजी, धूर्तता.
artefact = Artifact आर्टिफॅक्ट् n.---
arthritic आर्थ्रायटिक् a.--- ‘Arthritis’ - च्या/-जन्य/-पीडित/-संबंधींच्या.
arthritis आर्थ्रायटिस् n.--- सांधेदुखी, संधिवात. “गठिया’ (in Hindi). Osteoarthritis - उतारवयामुळे सांध्यांत आलेल्या बंधकस्नायूंच्या जीर्णत्वामुळे (किंव्हा हाडांवरील पुटान्मुळे) होणारा संधिवात. Rheumatoid Arthritis - ‘Rheumatism’ मुळे होणारा संधिवात. Hypertrophic Arthritis - अवयवाच्या अनैसर्गिक वाढीमुळे होणारा संधिवात. Fibrositis Arthritis - संधिप्रदेशांतील तंतुमय भागाच्या दाहामुळे होणारा संधिवात. Arthritis due to gout - संधिप्रदेशांतील अनावश्यक द्रव्यांमुळे / द्रव्यप्रक्रियेतील बिघाडामुळे होणारा संधिवात.
articular आर्टिक्युलर् a.--- संधिसंबंधी.
articulate आर्टिक्युलेट् v.t.--- सांधणे, स्पष्ट बोलणे, उच्चारणे. a.--- स्पष्ट, सुव्यक्त, सुबद्ध, सांधलेला.
articulation आर्टिक्युलेशन् n.--- उच्चार, कांडे, पेर, सांधा, (भाषा इत्यादि मधील) स्पष्ट अभिव्यक्ति.
artifact = Artefact आर्टिफॅक्ट् n.--- मानवनिर्मित (कृत्रिम) वस्तु. शिल्प. (प्राचीन) (हस्त) शिल्प. (a.--- असंस्कृत आदिमानवाचे) (पहा : ecofact).
artifice आर्टिफिस् n.--- शक्कल, पेंच, क्लृप्ति.
artifices आर्टिफिसेस् n.--- छक्केपंजे, डांवपेंच.
artificer आर्टिफिसर् n.--- कारागीर, फसव्या.
artificial आर्टिफिशल् a.--- कृत्रिम, लफंगेपणाचे.
artillery आर्टिलरि n.--- तोफखाना, तोफा.
artisan आर्टिझन् n.--- कारागीर.
artist आर्टिस्ट् n.--- (जुना अर्थ: = Artiste) शोभेच्या कलेचा (fine art) व्यासंगी / व्यावसायिक (चित्रकार, मूर्तिकार, नक्षीकाम करणारा कलाकुसरतज्ज्ञ इत्यादि) कलाकार. a.--- कलात्मक, कारागीरीचा, अभिरुचिपूर्ण.
artiste आर्टिस्ट् n.--- कुशल कारागीर, कसबी कामकरी, शिल्पी, कलावंत, संगीत-/नाट्य- कलावंत.
artistical आर्टिस्टिकल् a.--- कारागिरीचा, खुबीदार.
artless आर्टलेस् a.--- निष्कपटी, भोळा, साधा.
aryans आर्यन्स् n.--- प्राचीनकाळचे सुधारलेले लोक.
as अॅझ् con.--- जसा, तसा, प्रमाणे, सारखा, म्हणून, जेंव्हा-तेंव्हा, जसा-तसा, जितका-तितका, जसें, उदाहरणार्थ.
as ever अॅझ् एव्हर् con.--- नेहमीप्रमाणे.
as if अॅझ् इफ् con.--- जणू काय, समजून.
as much as अॅझ् मच् con.--- म्हणून.
as soon as अॅझ् सून् con.--- लागलीच.
as to अॅझ् टू con.--- विषयी, म्हणाल तर.
as usual अॅझ् यूझ्वल् con.--- नित्यबरहुकूम.
as well as अॅझ् वेल् अॅझ् con.--- आणखी.
asafetida / Asafoetida अॅसफेटिडा n.--- हिंग, हिंगाचे झाड.
ascend अॅसेन्ड् v.t.--- वर चढणे, आरोहण करणे, उदय पावणे.
ascendable अॅसेन्डेबल् a.--- चढण्याजोगा.
ascendant अॅसेन्डन्ट् n.--- वर्चस्व, प्राधान्य. a.--- वरचढ, उदित, वर्चस्वी.
ascendency अॅसेन्डन्सि n.--- आरोहण, प्राधान्य.
ascent अॅसेन्ट् n.--- चढण, घाट, चढ.
ascertain अॅसर्टेन् v.t.--- निश्चित करणे, शोध करणे.
ascertained अॅसर्टेन्ड् a.--- निश्चित, खचित.
ascertainment अॅसर्टेन्मेंट् n.--- शोध, निर्णय, निर्धार.
ascetic अॅसेटिक् n.--- गोसावी, सन्यासी,जोगी, तपस्वी. a.--- विरक्त, तपोनिष्ट.
ascites अॅसाइटीस् n.--- उदररोग, जलोदर.
ascribe अस्क्राइब् v.t.--- कडे लावणे, आरापणे, कुणावर किंवा कशावर तरी खापर फोडणे, एखाद्या माणसाशी किंवा गोष्टीशी संबंध जोडणे.
ascribed अॅस्क्राइब्ड् a.--- ठेवलेला, आरोपलेला.
ascription अॅस्क्रिप्शन् n.--- आरोपणे, लावणे.
aseptic एसेप्टिक् a.--- न कुजणारा, कुजण्याच्या प्रक्रियेपासून मुक्त; निर्विकार.
ash अॅश् n.--- राख, एक प्रकारचे झाड.
ashamed अशेम्ड् a.---लाजलेला, ओशाळलेला.
ash-colored अॅश-कलर्ड् a.--- भस्मी रंगाचा.
ashen अॅशन् a.--- राखेसंबंधी, राखेच्या रंगाचा, पांढरा फटफटीत. भयंकर फिक्का.
ashes अॅशेस् n.--- भस्म, राखाडी.
ashgourd अॅशगूर्ड् n.--- कोहळा.
ashore अशोअर ad.--- किनाऱ्यास, तडीस.
ash-Wednesday अॅश्-वेन्स्डे n.--- ख्रिश्चन धर्माच्या ‘Lent(en) season चा पहिला दिवस.
ashy अॅशी a.--- भस्मी रंगाचा.
asinine अॅसिनाइन् a.--- गाढवा संबंधीचा, गाढवासारखा, आडमुठा, मूर्ख, गाढव.
ask आस्क् v.t.--- विचारणे, पुसणे, मागणे, विनंती करणे.
askance अस्कान्स् ad.--- तिरके, तिरकसपणे. a.--- तिरपा, बाजूला. To look/toeye/to view askance = संशयाने / तुच्छतेने / मत्सराने पाहणे.
askew अॅस्क्यू ad.--- तिरकस, आडवे, ओझरते.
asleep अस्लीप् a.--- झोंप लागलेला, सुप्त, झोपेत.
aslope अस्लोप ad.--- उतरता, ढळता, कलता.
asp अॅस्प् n.--- एक जातीचा भयंकर विषारी साप.
aspect अॅस्पेक्ट् n.--- आकार, रोख, प्रकार, चेहरा, दृष्टि.
asperity अॅस्पेरिटी n.--- कडकपणा, कर्कशपणा, रखरखीतपणा, आंबटपणा, तिखटपणा.
asperse अॅस्पर्स् v.t.--- बाळंट घेणे, कलंक लावणे.
asperser अॅस्पर्सर् n.--- आळ घेणारा.
aspersion अझ्पर्शन् n.--- तूफान, तोहमत, किंटाळ, निंदा, नालस्ती, अपमानास्पद टीका, बदनामी.
asphyxia अ(अॅ)स्फिक्सिअ n.--- प्राणवायूच्या अभावामुळे येणारी बेशुद्धि, गुदमरण्याची प्रक्रिया, श्वासावरोध.
asphyxiate अ(अॅ)स्फिक्सिएट् v.t.---’Asphyxia’ ने बाधित करणे, गुदमरविणे.
asphyxiation अ(अॅ)स्फिक्सिएशन् n.--- गुदमरविण्याची प्रक्रिया, गुदमरून गेल्याची स्थिति.
aspirant अॅस्पिरंट् a.--- आकांक्षासंपन्न, उमेदीचा (संस्कृत: आशिष्ठ).
aspirate अॅस्पिरॆट् v.t.---(वायु इ.) बाहेर काढणे / आत फेकणे, जोराने निःश्वासपूर्वक उच्चारणे. n.--- महाप्राण.
aspiration अॅस्पिरेशन् n.--- महत्वाकांक्षा, हांव; उमेद.
aspire अॅस्पायर् v.i.--- आशा धरणे, उमेद बाळगणे.
aspirin अॅस्पिरिन् n.--- एक रासायनिक द्रव्य.