Esoteric एसोटेरिक् a.--- गुप्त, गूढ, दुर्बोध, अनाकलनीय.
Espalier एस्पॅलिअर् n.--- बागेसभोवती लावलेली झाडांची रांग, वेळ चढण्याकरता लावलेली ताटी.
Especial एस्पेशल् a.--- विशेष, मुख्य, नेमका.
Espionage एस्पिअनाज् n.--- हेरगिरी, गुप्तहेरांचा गुप्त माहितीसाठी वापर.
Espousal एस्पाउझल् n.--- वाङ्निश्चय, विवाह, कैवार, पुरस्कार.
Espouse एस्पाउझ् v.i.--- पाणिग्रहण करणे, वाङ्निश्चय करणे, स्वीकारणे, कैवार घेणे, आपलासा करणे, पुरस्कार करणे. Espouse (one) (to) v.t.--- विवाहाने (वधू / वर म्हणून) देणे.
Espy एस्पाय् v.t.--- हेरणे, दुरून पाहणे.
Esquire एस्क्वायर् n.--- सभ्य मनुष्याचे नावापुढे लिहिण्याचा किताब.
Essay एसे n.--- निबंध, लेख, प्रयत्न. v.t.--- प्रयत्न करणे.
Essence एसेन्स् n.--- अर्क, काढा, सत्व, तात्पर्यार्थ.
Essential एसेन्शिअल् a.--- स्वाभाविक, आवश्यक, तात्विक. n.--- जरूरीची गोष्ट.
Establish एस्टॅब्लिश् v.t.--- स्थापना करणे, सिद्ध करणे, नेमणे.
Established एस्टॅब्लिश्ड् p.p.a.--- स्थापित-कायम केलेला.
Establishment एस्टॅब्लिश्मेन्ट् n.--- स्थापना, नेमणूक, कारखाना.
Estate एस्टेट् n.--- मालमत्ता, जिंदगी, वतन, वृत्ति, स्थावरमत्ता. Real Estate -
Esteem एस्टीम् v.t.--- चांगला समजणे, गणणे, पूज्य मानणे, लेखणे. N.--- मान्य, आदर, प्रीति, योग्यता.
Esteemed एस्टीम्ड् a.--- मान्य, बहुमानित, योग्य.
Ester एस्ट् n.--- अम्ल (acid) व मद्यार्क (alcohol) यांच्या मिश्रणाने होणारे (सुगंधी) द्रव्य.
Estimate एस्टिमेट् v.t.--- अजमास करणे, सुमार पाहणे, तोलणे. n.--- अजमास, आकार, मोजणी.
Estimation एस्टिमेशन् n.--- अंदाज, अजमास.
Estimator एस्टिमेटर् n.--- अंदाज करणारा.
Estival एस्टिवल् a.--- ग्रीष्मकालाचा, ग्रीष्मकालीन.
Estrange एस्ट्रेन्ज् v.t.--- स्नेह तोडणे, परकी करणे, -पासून दूर/विरक्त करणे.
Estranged एस्ट्रेन्ज्ड् a.--- दूर केलेला, वेगळा/विभक्त झालेला, दुरावलेला.
Estuary एस्चुअरि n.--- खाडी, नदीमुख.
Et al एट् अॅल्
Et. seq. “Et sequentia” (म्हणजेच ‘and the following (pages etc)) या latin शब्दसंहतीचे संक्षिप्त रूप : आणि पुढील भाग, इत्यादि.
Etcetera एट्सेट्रा n.--- आणि अवांतर दुसऱ्या गोष्टी. (संक्षिप्त रूप: etc.)
Etch एच् v.i.--- कोरणे, कोरीव काम करणे, कोरून (आकृति/चित्र/अक्षर) उमटविणे.
Eternal इटर्नल् a.--- सनातन, शाश्वत, अनादि.
Eternalist इटर्नॅलिस्ट् n.--- अनादि तत्व मानणारा.
Eternity इटर्निटि n.--- शाश्वति, अनादिसिद्धि.
Ethanal एथनॉल् n.--- ऊस, तांदूळ, इ. धान्य, बटाटे, इ. पासून बनणारा एक मद्यार्क (इंधन म्हणूनही उपयुक्त. अन्य नाव: ethyl alcohol).
Ether ईथर् n.--- फार पातळ व हलकी हवा, अवकाशांत सर्वत्र व्याप्त एक लवचिक, सूक्ष्म, काल्पनिक द्रव्य (प्रकाश-लहरींना पसरविणारे); एक रंगहीन, हलके, बाष्पीभवनशील रासायनिक द्रव्य (CH3–CH2–O–CH2–CH3).
Ethereal / Etherial इथीरिअल् a.--- दिव्य दैविक, स्वर्गाचा, हलका, सूक्ष्म, विरल.
Etherialness / Etherealness इथीरिअलनेस् n.--- विरलता, सूक्ष्मता, पारदर्शिता.
Ethic एथिक् a.--- नीतिविषयक, नीतिशास्त्रसंबंधी, नैतिक.
Ethical एथिकल् a.--- नैतिक, नीतिविषयक.