L’ affaire = La affaires
L.C.M. ‘Lowest Common Multiple’ चे संक्षिप्त रूप. ल. सा. वि. (लघुतम साधारण / सामाईक विभाज्य).
L.S.D. भ्रम उत्पन्न करणारे / विलक्षण अनुभव घडविणारे एक रसायन / औषध.
la ला exclamatory… वा! (जोर देणारे / आश्चर्यवाचक).
la Affaires ला अफेअर् n.--- ते प्रसिद्ध प्रकरण. गाजलेले प्रकरण. (उदा: In L’affaire Bofors, the media had to wage a battle on two fronts : with beneficiaries and the CBI).
label लेबल् n.--- चकती, खूणचिठ्ठी, अंकपट्टी, बीजक.
labial लेबियल् a.--- ओठाचा, ओष्ठ्य. n.--- ओष्ठ्यवर्ण.
labour लेबर् v.t. and v.i.--- कष्ट करणे, खपणे, श्रम करणे, अवघडणे, वेदना होणे. n.--- श्रम, मेहनतीचे काम, प्रसूतिवेदना, कष्ट, क्लेश, उद्योग, मेहनत.
laboratory लॅबोरेटरि n.--- शास्त्रीय प्रयोगशाला.
laboured लेबर्ड्
labourer लेबरर् n.--- श्रम करणारा, खपणारा, गडी, हमाल, मजूर, कामकरी, श्रमिक.
laborious लेबोरिअस् a.--- कष्टाचा, श्रमाचा.
laburnum लॅबर्नम् n.--- (लिंबाच्या) पिवळ्या रंगाच्या फुलांच्या लांब घोसांचा बहार उन्हाळ्यांत धारण करणारा, लांब शेंगा देणारा, एक वृक्ष, बहावा / बाहवा / भावा वृक्ष (हिंदी: अमलतास) (संस्कृत: लोध्र) (इंग्लिश मध्ये golden shower म्हणूनही ज्ञात.
labyrinth लॅबिरिन्थ् / लॅबरिथ् n.--- चक्रव्यूह, गूढ, कूट, गुंतागुंतीची रचना, वळसेदार मालिकांची रचना; कानाची अंतर्गत रचना.
labyrinthine लॅबरिन्थिन् a.--- वाकड्यातिकड्या नळ्यांनी भरलेला, गुंतागुंतीचा, वेड्यावाकड्या रचनांनी युक्त.
lac लॅक् n.--- लाख, लक्ष संख्या, लाखो, पुष्कळ.
lace लेस् v.t.--- विणणे, जरीकांठ-फीत लावणे. n.--- चोळी, कलाबतू, फीत. Golden lace - सोनेरी कालाबतु.
laceman लेस्मन् n.--- जर-फीत विकणारा, जरावाला.
lacerate लॅसरेट् v.t.--- फाडणे, टरकावणे, ओरखडणे.
lack लॅक् v.t.--- उणे/कमी असणे. n.--- उणीव, वाण.
lack-lustre लॅक्-लस्टर् a.--- निस्तेज, फिका, तेजोहीन, विशेष चमक / उठाव / वेधकता नसलेला, सुमार.
lackadaisical लॅकडेझिकल् a.--- विव्हळणारा, विव्हळत पडणारा, कार्यविमुख, निरुत्साह.
lackaday लॅकाडे int.--- हायहाय, केवढा दुर्दिन.
lacker लॅकर् v.t.--- रोगण देणे. n.--- रोगण, लाख.
lackey लॅकि n.--- खिजमतगार, पोऱ्या, हुजऱ्या.
laconic लॅकॉनिक् a.--- थोडकेपण, अर्धपूर्ण, लघुपद, थोडका, अल्पाक्षर.
lactage लॅक्टेज् n.--- दुभते, गोरस.
lactant लॅक्टन्ट् a.--- स्तनपान करविणारी.
lactation लॅक्टेशन् n.--- थान पाजणे, पान्हा (सोडणे / फुटणे).
lacteal लॅक्टील् a.--- दुधाचा, दुधासारखा, अन्नरसवाहक, दुग्धमय. n.--- अन्नरसवाहिनी.
lad लॅड् n.--- पोरगा, पोऱ्या, गडी, जवान, किशोर.
ladder लॅडर् n.--- शिडी, पायरी, निसण.
lade लेड् v.t.--- ओझे लादणे (past tense : laded; past participle : laded or laden).
laden लेडन् p.p.a.--- ओझे लादलेला. ‘Lade’ चे past participle. भाराक्रान्त, -ने (with) दबलेला / कष्टलेला/व्यथित / ग्रस्त. समासांत प्रचलित प्रयोग; उदा: In an emotion- laden voice.
ladle लॅडल् v.t.--- पळ्याने काढणे. n.--- पळा, पळी, ओगराळे.
lady लेडि n.--- गृहिणी, कुलस्त्री, कुलवधू, बाई.
lady-day लेडी-डे n.--- जीससच्या अवताराच्या ग्रॅब्रिएलकृत घोषणेचा दिवस (२५ मार्च) (पहा: Annunciation).
ladybird लेडिबर्ड् n.--- सोनकिडा, इंद्रकीट.
ladylike लेडिलाइक् a.--- नाजूक, कोमल, कुलवधूसारखा.
lag लॅग् v.i.--- मागसणें, मागे पडणे. n.--- गाळ, गदळ. आगेमागेपणा, तीव्रवेगाने प्रवास केल्याने शरीराचे वेळापत्रक व घड्याळांतील स्थानिक वेळा यांत येणारा आगेमागेपणा / तफावत. गतिविसंवाद या आगेमागेपणामुळे झोप आदि शरीरधर्मात येणारी अनियमितता. (उदा: Jet - lag)
laggard लॅगर्ड् a.--- मंदगति, संथ, रेंगाळणारा, अळम्टळम् करणारा, जड.
lagoon लगून् n.--- समुद्रालगतचे खारे सरोवर.
laissez-faire लेसे-फेअर n.--- (= let (people) do (as they think best)) मुख्य उद्योगधंद्याचे तत्व. उद्योग व व्यापारादि हालचाली सरकारी नियंत्रणातून जास्तीत जास्त मुक्त ठेवण्याचे धोरण. नियमनविमुखता. a.--- किमान-नियंत्रणावादी. ढवळाढवळीपासून अलिप्त राहण्याच्या स्वरूपाचा. नियमन-विमुखताप्रवण.
laity लेइटी n.--- गृहस्थ मंडळी, अनभिज्ञ लोक, धर्मसमुदायातील पुरोहितेतर जन.
lamb लॅम्ब् n.--- कोकरू, मेंढीचे पिल्लू
lambaste लॅम्बास्ट् v.i.--- ठोकून काढणे, बडविणे, चोप देणे; तीव्र निर्भत्सना करणे.
lambative लॅम्बेटिव्ह् a.--- लेह. n.--- चाटण, लेह.
lambent लॅम्बेन्ट् a.--- लाकलकणारा, चमकणारा.
lame लेम् v.t.--- लंगडा करणे. a.--- लंगडा, लेचापेचा.
lameness लेम्नेस् n.--- लंगडेपणा, पंगुत्व.
lament लॅमेन्ट् v.t.--- शोक करणे, रडणे. n.--- दुःख, शोक.
lamentable लॅमेन्टेबल् a.--- शोकास्पद, शोचनीय, उदास.
lametta लामेट्टा n.--- सोन्याची/रुप्याची तार, वर्ख.
lamina लॅमिना n.--- पडदा, पदर, कवच, पापुद्रा, पटल, पत्रा.
laminate लॅमिनेट् v.t.--- (धातु इ.) ला पातळ पत्र्याचे रूप देणे, ला वेगळ्या पातळ थरात विभागणे, पातळ थर चढवून बनविणे, -वर (प्लॅस्टिक इ. चे) आवरण चढविणे. a.--- पातळ पत्र्याच्या / थराच्या स्वरूपाचा.
lamp लॅम्प् n.--- दिवा, दीप, दीपक.
lampblack लॅम्प्ब्लॅक् n.--- काजळ, मसीर, मशेरी.
lampoon लॅम्पून् n.--- निंदाव्यन्जक लेख / व्यङ्ग / विडंबन. v.--- अशी विडंबना करणे.
lanary लेनरि n.--- लोकरीची वखार.
lance लान्स् v.t.--- भाला/बरची फेकणे. n.--- भाला, तराजूच्या पारडे, बरची.
lancer लान्सर् n.--- भालेकरी, बरचीवाला.
lancet लान्सेट् n.--- फाडण्याचे शस्त्र.
land लॅन्ड् v.t.--- किनाऱ्यास लागणे, पकडून हस्तगत करणे, मिळविणे, पटकावणे. n.--- जमीन, देश, भूमि.
land-holder n.--- जमीनदार. Landing place - बंदर.
land-lady n.--- घरधनीण. Landlord - जमीनदार, खोत.
landmark लँड्मा(र्)क् n.--- शिवाची खूण/निशाणी, सीमादर्शक स्थिर ठळक चिन्ह. विशिष्ट क्षेत्राची / परिसराची ओळख पटविणारी डोळ्यांत भरणारी स्थिर वस्तु / खूण / निशाणी. एखाद्या विषयाच्या विकासांतील नवीन / क्रान्तिकारक घटना / विचार.
landscape लँड्स्केप् n.--- डोळ्यांच्या टप्प्यातील प्रदेश, (विशिष्ट) प्रदेशाची निसर्गशोभा, अशा सृष्टिशोभेचे चित्र. v.t.--- (विशिष्ट) ‘Landscape’ -चा दर्जा वाढविणे / सुधारणे.
land-survey n.--- जमिनीची मोजणी. Land-tax- जमीनकर.
lane लेन् n.--- बोळ, गल्ली, आळी, बोळकुंडी.
language लँग्विज् n.--- भाषा, बोली, वाणी.
languid लँग्विड् a.--- सुस्त, म्लान, उदास, मंद.
languish लँग्विश् v.i.--- ग्लानि येणे, लंघणे, गळणे.
languor लँगर् n.--- सुस्ती, ग्ला नि, शैथिल्य, तंद्री.
lank लॅङ्क् a.--- सडसडीत, सडपातळ, रोड, लांब, सरळ व सडपातळ.
lanky लँकी a.--- लांब / उंच आणि किडकिडीत, लांबट.
lantern लॅन्टर्न् n.--- कंदील, फाणस, कंद्या. (घेर, ओटी, मांडी, पदर).