cony-cora

con(e)y कोनी n.--- ससा.
coo कू v.i.--- घुमणे, घू घू करणे (पारव्याचे), गुलगुल गोष्टी करणे.
cook कुक् v.i.--- स्वयंपाक करणे, भाजणे. n.--- आचारी.
cook an account कुक् अॅन् अकाउंट् v.i.--- हिशेब खोटा बनविणे.
cook-room कुक् रूम् n.--- स्वयंपाकघर, पाकशाला.
cool कूल् n.--- थंडावा. a.--- शीतल, थंड, शांत, उदास, मंद, निलाजरा. v.t.--- थंड करणे, शांत करणे.
coolness कूल्नेस् n.--- थंडपणा, सावकाशी, अनास्था.
cooly, Coolie कूलि n.--- ओझेवाला, हमाल, हेलकरी, मजूर.
coomb कूूम्/कोम् n.--- डोंगरांतील गुहा.
coop (up/in) कूप् v.t.--- कोंडणे. n.--- कोंडवाडा, खुराडे.
cooper कूपर् n.--- पिपें करणारा.
co-operate कोआॅपरेट् v.i.--- मिळून/सोबतीने काम करणे.
co-operator कोआॅपरेटर् n.--- सहकारी.
co-operation कोआॅपरेशन् n.--- सहकार, सहक्रिया.
co-opt कोआॅप्ट् v.t.--- सभासदांनी आपल्यापैकीच निवड करणे.
co-partner कोपार्ट्नर् n.--- भागीदार, पातीदार.
co-partnership कोपार्ट्नर्शिप् n.--- भागी, पाती.
cope कोप् v.t./v.i.--- काळ कंठू शकणे, नांदू शकणे, जीवन चालविणे, निभावणे,टक्कर देणे, झुंजणे, लढणे, तोंड देणे.
coping कोपिंग् n.--- मुन्ढेरी, भिंतीचा उतरता भाग.
copious कोपिअस् a.--- भरपूर, पुष्कळ, विपुल, मनस्वी.
copper कॉपर् n.--- तांबे, तांब्याचे नाणे/बंब.
copperas कॉपरॅस् n.--- हिराकस.
copper-plate कॉपर्प्लेट् n.--- ताम्रपट.
copper-smith कॉपर्स्मिथ् n.--- तांबट, कासार.
coppery कॉपरी a.--- ताम्र, तांब्याचे.
copse कॉप्स् n.--- झाडीझुडी, माळरान.
copula कॉप्युला n.--- उद्देश व विधेय यांस जोडणारा शब्द.
copulate कॉप्युलेट् v.i.---जुगणे, संभोग करणे.
copulation कॉप्युलेशन् n.--- मैथुन, रति.
copulative कॉप्युलेटिव्ह् n./a.--- जोडणारा, उभयान्वयी.
copy कॉपी n.--- नक्कल, प्रत, नमुना, कित्ता, मूळप्रत, पुस्ती, अनुलिपि, प्रतिलिपि, प्रतिलेख, लिपि. v.t.--- नक्कल करणे, कित्ता घेणे, अनुकरण करणे, उतरून घेणे, उतरणे.
copyist कॉपिस्ट् n.--- नक्कल/प्रत करणारा, लेखक, लिपिकार,लिपिकर.
copyright कॉपिराइट् n.--- ग्रन्थावरचा हक्क, साहित्य, संगीत, कला इ. विषयांवरील कृतींच्या/रचनांच्या प्रती काढणे, त्या विकणे, त्यांची भाषांतरे करणे इ. बद्दलचे काळबद्ध, आरक्षित अधिकार. साहित्यकृति-/कलाकृति-संबंधीचा स्वामित्वाधिकार. v.t.--- असा अधिकार मिळविणे/राखून ठेवणे.
coquet कॉकेट् v.t./v.i.--- नखरा/हावभाव करणे.
coquetry कॉकेट्री n.--- नखरा, हावभाव, उथळ, तात्पुरता.
coquette कॉकेट् n.--- नखरेदार बायको, चाळक भवानी, खट्याळ मैना.
coquettish कोकेटिश् a.--- दिखाऊ मोहक, खट्याळ, उन्मादक (हावभाव, वचन, इ.)
coral कॉरल् n.--- पोंवळे, प्रवाळ, विशिष्ट छोट्या सागरी प्राण्यांची एक वसाहत. ह्या प्राण्यांपासून निघणाऱ्या स्रावाचा साठा. अशा विविध रंगी स्रावद्रव्याचा (भारताच्या अंदमान-द्वॆपाञ्च्या परिसरात, वेस्ट इंडीज बेटांच्या जवळपास समुद्रातळी सापडणारा) तुकडा/खडा. (मूंगा: हिंदी), गडद नारिंगी/गुलाबी रंग, अंगारमणि. (संस्कृत: प्रबालः/प्रबालम्). a.--- ‘coral’ -चा/-विषयक, गडद नारिंगी/गुलाबी/भगव्या रंगाचा. (हिंदी: मुंगिया).