Pesky पेस्की a.--- कटकट करणारा, त्रासाविणारा, उपद्रवी; तिरस्करणीय, किळसवाणा.
Pessimism पेसिमिझम् n.--- निराशावाद.
Pessimist पेसिमिस्ट् n.--- निराशावादी (व्यक्ति) कोणत्याहि स्थितीतील प्रतिकूल अंशास महत्व देणारा.
Pessimistic पेसिमिस्टिक् a.--- निराशावादी, ‘pessimism’ -विषयक / -स्वरूपाचा.
Pest पेस्ट् n.--- सांथ, जरीमरी, व्याधि, पीडा.
Pester पेस्टर् v.t.--- त्रासविणे, गांजणे, छळणे, (सतत) सतावणे.
Pestiferous पेस्टिफेरस् a.--- उपद्रवी, घातक, कुत्सित, सांथीचा.
Pestilence पेस्टिलन्स् n.--- प्राणघातक, सांथ, मरी.
Pestle पेसल् n.--- कुटण्याचा बत्ता / मुसळ. v.t.--- बत्त्याने कुटणे, पूड करणे.
Pet पेट् v.t. / v.i.--- (कामुकतेने) आलिंगणे / कुरवाळणे. लाड करणे, कुरवाळणे. n.--- रागाचा झटका. a.--- लाडका.
Petal पेटल् n.--- पाकळी, दल, दळ.
Petard पिटार्(ड्) n.--- विस्फोटक यंत्र / पेटिका. (पहा: Hoise).
Peter पीटर् (proper noun) --- एक विशेषनाम. मूळ अर्थ ‘दगड’ (et. ‘पत्थर’). Peter (out) --- लोपणे, नाहीसा होणे, संपणे, थांबणे. ‘To rob Peter to pay Paul’ --- एकाचे नुकसान करून दुसर्यास फायदा करणे; एक कर्ज घेऊन दुसरे फेडणे.
Petit पेटि a.--- लहान, क्षुद्र.
Petite पतीत् / पेटिट् a.--- छोटी लहान बांध्याची (स्त्री).
Petition पिटिशन् n.--- अर्ज, याचिका, आर्त / कळकळीची विनंती / प्रार्थना. v.t.--- -ला उद्देशून ‘petition’ करणे. अर्ज / प्रार्थना / विनंति करणे. v.i. (to, for) --- ‘petition’ सादर करणे.
Petitioner पिटिशनर् n.--- अर्जदार, अर्जीवाला.
Petrel पेट्रल् n.--- समुद्रावर दूरवर उडणारा पक्षिविशेष.
Petrify पेट्रिफाय् v.t.--- दगड करणे, कठोर करणे, खिळून जाणे, स्तंभित करणे.
Petticoat पेटिकोट् n.--- लहंगा, झगा, लुगडे, परकर.
Pettifog पेटिफॉग् v.i.--- कचेरीत / न्यायालयांत हलकी / क्षुल्लक कामे चालविणे. व्यर्थ / फुसका शब्दच्छल / वाद करणे.
Pettifogger पेटिफॉगर् n.--- हलका वकील.
Pettifoggery पेटिफॉगरी n.--- कोर्टकचेऱ्यांत हलकी / किरकोळ कामे चालविण्याचा व्यवसाय. वकिली / चलाखी / लंपटपंची. व्यर्थ / फुसका शब्दच्छल.
Pettish पेटिश् a.--- चिरडखोर, छांदिष्ट.
Petty पेटि a.--- लहान, हलका, क्षुल्लक, क्षुद्र, कोता.
Petulance पेचुलन्स् n.--- चिडकेपणा, तिरसटपणा.
Petulant पेचुलन्ट् a.--- चिडका, तिरसट.
Pew प्यू n.--- (वक्ता, नेता, इ. साठी) (व्यास)पीठ, उंचवट्याची जागा, मंच, कठडा. (विशेष व्यक्तीकरता) (नाट्यगृह, चर्च इ. ठिकाणची) उंच, बंदिस्त जागा. v.--- बंदिस्त जागेत बंद करणे / असणे, बंदिस्त जागेने युक्त करणे.
Pewter प्यूट(र्) n.--- कथिल (Tin) व शिसे (Lead) यांचा मिश्रधातु. अशा मिश्रधातूचे भांडे / पात्र.
pH पी-एच् (‘p’ for power. ‘H’ for hydrogen) n.--- एखाद्या द्रावणांतील उज्जमूलकांच्या (hydrogen ions) घनतेची / दाटीची मात्रा, जी त्या द्रावणाच्या अम्लतेची (acidity) वा क्षारतेची (alkalinity) मात्राही सांगते. मात्रांक ० पासून १४ पर्यंत (द्रावणातील, ‘moles’ मध्ये मोजलेल्या, प्रतिलिटर उज्ज-मूलक-घनतेच्या आधाराने काढलेले) असतात. ० मात्रांक म्हणजे सर्वोच्च अम्लता. १४ मात्रांक म्हणजे सर्वोच्च क्षारता. ७ मात्रांक म्हणजे बलहीनता (neutrality). ‘Litmus paper’ सारखा ‘universal indicator paper’ द्रावणांत बुडवूनही, त्याच्या बदललेल्या रंगावरून अम्लता / क्षारता कळते.
Phagocyte फॅगसाइट् n.--- अनिष्ट द्रव्ये गिळून टाकणारी रक्षक पेशी.
Phalanx फॅलॅन्क्स् n.--- फौजेची रचना, सैन्य, व्यूह, सैन्याची फळी.
Phallic फॅलिक् a.--- ‘phallus’ विषयक, ‘phallus’ स्वरूपी.
Phallus फॅलस् n.--- पुरुषलिंग, शिश्न, शिश्नचिन्ह. (pl. Phalli or phalluses).
Phantasmagoria फँटॅझ्मगोरिया n.--- भ्रमांत / धुंदीत भासमान होणारी चित्रविचित्र दृश्ये / दृश्यमाला.
Phantasy फँटसी =Fantasy
Phantom फॅन्टम् n.--- भास, भूत, कल्पना, आभास.
Pharaoh फेअरो n.--- प्राचीन इजिप्तचा शासक.
Pharmaceutical फामस्यूटिकल् a.--- औषधोत्पादनासंबंधीचा, औषधोत्पादक. n.--- औषधद्रव्य.
Pharmacist फा(र्)मसिस्ट् n.--- औषधे बनविणारा / विकणारा.
Pharmacology फा(र्)मकॉलजी n.--- औषधशास्त्र.
Pharmacopoeia फा(र्)मकपीअ n.--- औषधांचे वर्णन करणारा ग्रंथ.
Pharmacy फार्मसि n.--- औषधे तयार करण्याची विद्या, औषधे तयार करून विकण्याचे दुकान, गंध्याचा धंदा.
Pharyngal / Pharyngeal फॅरिंगल् / फॅरिंजियल् a.--- ‘Pharynx’ विषयक.
Pharyngo- ‘Pharynx’ चे समासातील रूप.
Pharynx फॅरिंक्स् n.--- नाक, तोंड, व गळा यांना जोडणारी नाकामागील पोकळी, कंठकहर.
Phase फेझ्, Phasis फेसिस् n.--- चंद्र वगैरे ग्रहांचा प्रकाशित भाग, दर्शन, स्वरूप.
Pheasant फेझण्ट् n.--- एक पक्ष्याची जात / त्या जातीचा पक्षी.
Phenix फिनिक्स् n.--- एक कल्पित पक्षी, प्रस्थ.
Phenomenal फिनॉमिनल् a.--- दृश्य (इंद्रियगोचर) जगासंबंधीचा / स्वरूपाचा, अलौकिक, असामान्य, असाधारण.
Phenomenon फिनॉमिनॉन् n.--- चमत्कार, देखावा, अद्भुत, दृश्य. इंद्रियगोचर वस्तु / घटना. आविष्कारदृश्य जगत्, अलौकिक / लोकोत्तर / आश्चर्यकारक गोष्ट. (pl. phenomena).
Phenyl फी(फे)निल् n.--- एक कीटकनाशक रसायन.
Phew फ्यू excl.--- चीड, किळस, कंटाळा इ. व्यक्त करणारा उद्गार शब्द. ‘शी!’
Phial फायल् n.--- कुपी, शिशी. v.t.--- कुपीत ठेवणे.
-Phil / -Phile फिल् / फाइल् … -चा चाहता / प्रेमी / वेडा अशा अर्थाचे (विशेषनामांस / व्यक्तीनांवास विशेषतः लावण्यात येणारे) उपपद.
Philander फिलँडर् v.i.--- प्रेमिक, प्रेमचेष्टा करणे, स्त्रियांभोवती घोटाळणे.
Philanderer फिलँडरर् n.--- इष्कवेडा, प्रेमवेडा, प्रेमचाळे करणारा, स्त्रीलंपट.
Philanthropist फिलॅन्थ्रॉपिस्ट् n.--- परोपकारी, लोकहितार्थी दानशूर.
Philanthropy फिलॅन्थ्रोपि n.--- लोकोपकारबुद्धि, भूतदया, लोककल्याणासाठी दान.
Philatelist फिलॅटलिस्ट् n.--- टपाल - तिकिटांचा संग्राहक / अभ्यासक.
Philately फिलॅटली n.--- टपालतिकिटांचा संग्रह / अभ्यास करण्याचा छंद / नाद / षोक.
Philippie फिलिपिक् n.--- भर्त्सनात्मक भाषण.
Philippine(s) (Republic) इंडोनेशियाच्या उत्तरेस व व्हिएटनामच्या पूर्वेस पॅसिफिक महासागरांत दक्षिणोत्तर पसरलेल्या द्वीपसमूहाचे एक राष्ट्र (गणराज्य). (राजधानी : Quezon City). (पहा: Filipino).
Philistine फिलिस्टाइन् n.--- बौद्धिक वा कलात्मक विषयांत रस नसलेला. अरसिक.
Philologic फिलॉलॉजिक् a.--- भाषाशास्त्रविषयक.
Philological = Philologic.
Philologist फिलॉलजिस्ट् n.--- भाषाशास्त्री.
Philology फिलॉलजि n.--- भाषाशास्त्र, भाषाध्ययन.
Philomathy फिलॉमाथि n.--- विद्याभक्ति.
Philosopher फिलॉसॉफर् / फिलॉसफर् n.--- तत्वज्ञानी, तत्वज्ञ.
Philosopher’s stone फिलॉसफर्स् स्टोन् n.--- परीस / परिस, चिंतामणि. कोणत्याही धातूचे सोन्यात रूपांतर करू शकणारे द्रव्य.
Philosophic फिलॉसॉफिक् a.--- तत्वज्ञानी, तात्विक.
Philosophize फिलॉसॉफाइझ् v.i.--- तत्व-शोध करणे
Philosophy फिलॉसफि n.--- तत्वज्ञान. Logical philosophy--- न्यायशास्त्र. Neutral philosophy --- नीतिशास्त्र. Natural philosophy --- पदार्थविज्ञानशास्त्र.
Philter फिल्टर् v.t.--- वॉश करणे, मोह घालणे.
Phimosis फाय्मोसिस् n.--- शिश्नाच्या पुढील कातडी आवरणाचे तोंड अरुंद असण्याची विकृति (ज्यायोगे ते आवरण पुरेसे मागे सरकू शकत नाही). शिश्नौष्ठसंकोच.