M.C.C. “Merilbone Cricket Club” या लंडन येथील क्रिकेट-संस्थेच्या नावाचे संक्षिप्त रूप.
MFN = ‘Most Favored Nation’ चा संक्षेप = आंतरराष्ट्रीय संबंधात विशिष्ट दोन राष्ट्रांत घनिष्ठ दळणवळण स्थापण्यासंदर्भात योजली जाणारी शब्दसंहति. Eg. granting MFN status to India.
macabre मकाब्र / मकाबर् a.---भेसूर, भयंकर, भीषण.
macaroni मॅकरोनी n.--- एका गव्हाचा खाद्यपदार्थ. = Dandy.
mace मेस् n.--- सोडगा, छडी, काठी, अधिकारदर्शक दंड, जायपत्री.
macebearer मेस्बेअरर् n.--- चोपदार, भालदार.
macerate मॅसेरेट् v.t.--- रोडवणे, क्षीण करणे.
machet(t)e मॅचेट् = Matchet
macheto मॅचेटो = Matchet
machiavellian मॅकियवेलियन् a.--- स्वतःच्या उद्देश्य पूर्ण करण्यासाठी वाममार्गाचा, फसवेगिरीचा, चाणक्यनीतिचा वापर करणारा. स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाणारा. (Machiavelli (मॅकियवेली) ह्या राजकीय तत्वज्ञाच्या नावावरून आलेला शब्द).
machine मशीन् n.--- यंत्र, कळ, पायगाडी, हस्तक.
machinery मशिनरि n.--- कळसूत्र, यंत्रसाहित्य, यंत्रे.
machismo मकिझमो n.--- पुंस्वातिरेक, पौरुषातिरेक, मोकाट पौरुष.
macho मॅचो / मॅको a.--- वांड, दांडगा, धटिंगण, उद्दाम, अति-उत्साही.
macula मॅक्युला n.--- डाग, चट्टा, कलंक, सूर्यावरील काळा डाग.
mad मॅड् a.--- वेडा, वेडेपणाचा, कावलेला.
madam मॅडम् n.--- बाईसाहेब.
madcap मॅड्कॅप् n.--- वेडापीर, साहसी, मंत्रचळ्या.
madden मॅडन् v.t.--- वेडा करणे, पिसाळने.
made मेड् p.p.a.--- उत्पन्न केलेला, घडलेला. a.--- कृत्रिम, बनावट.
madman मॅड्मॅन् n.--- वेडा मनुष्य.
madness मॅड्नेस् n.--- वेड, खूळ, वेडेपणा, उन्माद, गाढवपणा, अनावर राग.
maelstrom मेलस्ट्रो(स्ट्र)म् n.--- मोठा (पाण्याचा) भोवरा, महावर्त.
mafia / Maffia मॅफिअ / माफिअ n.--- (एकवचनी / अनेकवचनी प्रयोग) --- गुंडगिरी, संघटित गुन्हेगारी, टगेगिरी, बदमाशांची टोळी, चांडाळचौकडी. (सिसिली / इटली / यू. एस. ए. इ. देशांत त्या क्रमाचे प्रचलित शब्द. मूळ अर्थ: बढाईखोर (bragging).
mafioso माफिओसो n.--- (pl. Mafiosi) ‘Mafia’ (गट / टोळी) च्या घटक / सदस्य, चांडाळचौकडीतील टग्या. (The former Prime Minister P.V. Narasimha Rao was aware about the shady dealings of the Animal Husbandary Deptt. Mafiosi in Bihar.)
magazine मॅगॅझीन् n.--- कोठार, वखार, मासिक, पुस्तक.
magenta मजेण्टा n.--- गर्द जाम्भळट तांबडा (रंग). (Table numbers are given alongside the destination stations in Magenta color.) (First identify starting station, then look for the table number in Magenta.)
maggot मॅगॉट् n.--- लहर, किडा, अळी.
magic मॅजिक् n.--- जादू, जादुगिरी, चेटुक.
magician मॅजिशिअन् n.--- जादूवाला, जादूगार.
magisterial मजिस्टिअरिअल् a.--- प्रतिभावंताचा, गुणाढ्य कलावंताचा, प्रतिभासंपन्न. ‘Magistrate’ संबंधीचा.
magistrate मॅजिस्ट्रेट् n.--- फौजदार.
magnanimity मॅग्नॅनिमिटि n.--- मनाचा मोठेपणा, दिलदारपणा.
magnanimous मॅग्नॅनिमस् a.--- मनाचा थोर-मोठा, दिलदार.
magnet मॅग्नेट् n.--- लोहचुंबक, विद्युच्चुंबक, चुंबक.
magnetic मॅग्नेटिक् a.--- लोहचुंबकाचा, आकर्षक, चुंबकीय.
magnetism मॅग्नेटिझम् n.--- आकर्षणशक्ति.
magnetise मॅग्नेटाईझ् v.t.--- आकर्षून घेणे, मोहून टाकणे.
magneto मॅग्निटो ‘चुंबकीय शक्तीचा / शक्तीपासून सिद्ध / बनलेला’ अशा अर्थाचे उपपद. उदा: Magneto-therapy, Magneto-meter.
magnificence मॅग्निफिसन्स् n.--- शोभा, आरास, उमदेपणा.
magnificent मॅग्निफिसन्ट् a.--- शोभिवंत, छानदार. भव्य व तेजस्वी, देदीप्यमान. आकृती व सौंदर्य यांनी भरपूर. अतिशय सुंदर व आकर्षक.
magnify मॅग्निफाय् v.t.--- वाखाणणे, मोठेपणा देणे.
magnitude मॅग्निट्यूड् n.--- लांबीरुंदी, परिमाण.
magnum Opus मॅग्नम् ओपस् n.--- महान साहित्य-/संगीत-/कला-/रचना- कृति.
maid मेड् n.--- कन्या, कुमारी, सहचारिणी. = handmaid.
maiden मेडन् n.--- अविवाहित स्त्री, कुमारिका. क्रिकेटमधील धावा ना मिळालेली ‘ओव्हर’. a.--- अविवाहित, अक्षतयोनी. मूळचा, पहिला.
maidenhead मेडन्हेड् a.--- कौमार्य, कौमारित्व, कोरेपणा.
mail मेल् n.--- डांक, टपाल, चिलखत, कवच.
maim मेम् v.t.--- अधू करणे. n.--- अधूपणा, व्यंगता.
main मेन् a.--- मोठा, प्रधान, अफाट, विस्तीर्ण. n.--- मोठा, भाग, महासागर. ad.--- अत्यंत, भारी.
mainframe मेन्फ्रेम् n.--- महासंगणक.
maintain मेन्टेन् v.t.--- राखणे, स्वाधीन ठेवणे, चालू ठेवणे, पोसणे, उदरनिर्वाह चालवणे.
maintenance मेन्टेनन्स् n.--- पालनपोषण, सांभाळ, उपजीविका. v.t.--- राखणे, चालू ठेवणे, निर्वाह करणे.
maize मेझ् n.--- मका.
majesty मॅजेस्टी n.--- राजतेज, ऐश्वर्य, वैभव, भव्यता, ढब, महाराज.
major मेजर् n.--- भूदलातील एक मध्यम दर्जाचा अधिकारी. (कायद्यानी) वयांत आलेला माणूस, सज्ञान, अभ्यासाचा मुख्य विषय. a.--- (संख्या, दर्जा, महत्व, इ. बाबतींत) अधिक मोठा / लक्षणीय / प्रभावी. v.--- Major in - (मुख्य विषय म्हणून) अभ्यासणे / शिकणे, -मध्ये पदवी मिळविणे.
majority मेजॉरिटी n.--- बहुमत, अधिकत्व, सज्ञानता.
make मेक् v.t.--- उत्पन्न निर्माण करणे, बनवणे, पोहोचणे. n.--- घडण. Make believe - ढोंग करणे. Make good - राखणे. Make oath - शपथेवर सांगणे. make of - मानणे. Make up - भर करणे, तडजोड करणे, जमवून घेणे. Make after - मागे लावणे. Make at - अंगावर जाणे. Make off - तोंड काळे करणे. make cut - यशस्वी होणे. Make for - -कडे जाणे, -ला दुजोरा देणे, -कडे नेणे, -वॉर हल्ला चढविणे, - कडे मोर्चा वळवणे.
makebelieve मेक्बिलीव्ह् n.--- ढोंग, थोतांड, लबाडी, सोंग.
make weight मेक्वेट् n.--- पासंग. n./a.--- काल्पनिक सोंगाडेपणा(चा).
mala fide माला फीडॅ / मेले फायडी ad.---
mala fides दुष्ट बुद्धी, लबाडी.
maladministration माल्अॅड्मिनिस्ट्रेशन् n.--- गैरअंमल.
malady मॅलडि n.--- रोग, आजार, विकार.
malaise मलेझ् n.--- आजारपणाची भावना. मानसिक / नैतिक अस्वस्थता.
malaria मलेअरिअा n.--- अंतरा-अंतराने पुनः पुनः थंडी वाजून येणारा ताप, हिंवताप, थंडीताप. (हिंदी: जूडी). दूषित हवा / वातावरण. हिंवताप उत्पन्न करणारी हवा, विषारी जंतू.
Malay मले / मेले n.--- मलेशिया व इंडोनेशिया या देशांतील रहिवासी. a.--- मूळचा मलेशिया किंवा इंडोनेशिया या देशांचा.
malcontent मॅल्कंटेंट् a./n.--- असंतुष्ट (व्यक्ति).
malcontented मॅल्कंटेंटेड् a.--- = Malcontent.
male मेल् a.--- पुरुषजातीचा, मर्दानी. n.--- नर, पुरुष.
malediction मॅलीडिक्शन् n.--- शाप, अभिशाप, खुनशी.
malefactor मॅलिफॅक्टर् n.--- गुन्हेगार, अपराधी, पापकर्मा, दुष्ट, दुराचारी.
malefic मलेफिक् a.--- = Maleficent
maleficent मलेफिसण्ट् a.--- घातक, अपायकारक, दुष्ट, पापदृष्टि, पापवृत्ति.
malevolent मलेव्हलण्ट् a.--- दुष्ट, वाईटाची इच्छा धरणारा.
malfeasance मॅलफीझन्स् n.---दुष्कर्म, दुराचार. अपराध, गुन्हा.
malice मॅलिस् n.--- द्वेष, वैर, आकस. द्वेषबुद्धीचे कर्म / वर्तन.
malice Prepense मॅलिस् प्रिपेन्स् n.--- हेतुपुरस्सर केलेले द्वेषबुद्धीचे कृत्य / वर्तन. पद्धतशीर खोडसाळपणा.
malicious मॅलिशस् a.--- द्वेषभावाचा, आकसाचा.
malign मॅलाइन् a.--- खडतर, दुर्धर, द्वेषी, अपायकारक, इजाकारी, घातक.
malignancy मलिग्नन्सी n.--- इजाकारकता, घातकता, हानिकारकता. यांच्या फलिताचा प्रकार, (सज्जनांबद्दल) दुर्भावना, दुष्टता, वैर. वक्रदृष्टि, क्रूरदृष्टि. घातक / तीव्र रुग्णावस्था.
malignant मॅलिग्नंट् a.--- हानि-/इजा- कारक, घातक.
malignity मॅलिग्निटि n.--- द्वेष, हाडवैर.
malinger मलिंगर् v.i.--- आजारीपणाचे सोंग आणून कामचुकारपणा करणे, खोट्या आजाराच्या सबबीवर गैरहजर राहणे / काम टाळणे.
mall मॅल् / माल् n.--- दुतर्फ़ा झाडे / स्तंभ / कमानी असलेला सार्वजनिक रस्ता. पेठ, व्यापारकेंद्र, बाजार (विविध सोयींनी युक्त मोठे) आपणसकुल.
malleable मॅलिएबल् a.--- धनवर्धनीय.
mallet मॅलेट् n.--- धोकणी, मोगरा, लांकडी, हातोडा.
malpractice माल्प्रॅक्टिस् n.--- गैरचाल, गैररीत.
malt मॉल्ट् v.--- (धान्यास) भिजवून मऊ करणे / मोड आणणे व भाजणे / वाळविणे. ‘Malt’ ने संस्कारित करणे. n.--- वरीलप्रमाणे प्रक्रिया केलेले धान्य / पीठ.
malversation मॅल्व्हर्झेशन् n.--- (परद्रव्याचा) दुर्व्यवहार, गैरवापर, गैरव्यवहार, गैरकारभार, अधिकाराचा दुरुपयोग.