Chl-Chr

Chloral क्लोरल् n.--- झोप आणणारे औषध.
Chlorate क्लोअरेट् n.---
Chloric क्लोअरिक् a.--- ‘Chlorine’ -विषयक / -मिश्रित.
Chloride (also ‘Chlorid’) क्लोअरिड् / क्लोराइड् n.--- क्लोरिन चे संयुग (compound).
Chlorinate क्लोअरिनेट् v.t.--- -वर ‘chlorine’ ने प्रभावित / संयुक्त करणे.
Chlorine क्लोअरीन् / क्लॉरीन् n.--- हिरवट पिवळ्या रंगाचे, उग्रगंधी, जड, क्रियाशील, वायुरूप, स्वच्छता-/निर्जन्तुकता -दायी मूलद्रव्य (संक्षिप्त संज्ञा : Cl).
Chlorophyll क्लॉरफिल् n.--- वनस्पतींच्या पानांस / देठांस हिरवा रंग आणणारे प्रकाशाच्या सहाय्याने कार्बनडायॉक्साइडचे हायड्रोकार्बनमध्ये रूपांतर(photosynthesis) करणारे द्रव्य. ( अन्य जीवांच्या रक्तातील हिमोग्लोबिन शी तुलनीय)
Chock चॉक् n.--- अडविणारा / अवरोधक ठोकळा / पाचर. ad.--- भरपूर, पूर्णपणे, भरघोसपणे.
Chocolate चॉक्लेट् n.--- भाजलेल्या ‘cacao’ बियांच्या चूर्णांत (‘cocoa’ मध्ये) गोड, सुगंधी मसाले घालून केलेले द्रव्य. हे द्रव्य (गरम) दुधात/पाण्यांत घालून केलेले पेय. गडद तपकिरी रंग.
Choice चॉइस् n.--- निवडण्याची मुकत्यारी, मर्जी, निवड. a.--- निवडक, शेलका.
Choir क्वायर् n.--- गाणाऱ्या मंडळींचा ताफा, गायकवृंद, वाद्यवृंद पथक. (चर्च मधील) गायकवृंदाची जागा. v.t./v.i.--- समूहाने गाणे/म्हणणे.
Choke चोक् v.t.--- गुदमरून मारणे, गुदमरविणे, दडपून टाकणे, गप्प बसविणे. v.i.--- गुदमरणे.
Chokefull चोक्फुल् a.--- तोंडोतोंड, सांडेसा.
Choker चोकर् n.--- गळयाभोवती लागून घालण्याचा (ममाल/पत्ता/लफ्फा/ठुशी या सारखा) एक दागिना.
Choler कॉलर् n.--- पित्त, पित्तप्रकृति, राग, क्रोध.
Cholera कॉलरा n.--- मोडशी, महामारी, एटकी, जरीमरी, थंडी आणि रेच इ. पचनक्रियेतील तीव्र विकृतीन्नी लक्षित, विशिष्ट एकपेशी सूक्ष्मजंतू (bacteria) मुळे होणारा साथीचा घातक रोग. (संस्कृत: विसू(पू) चिका, महामारी. ‘विषूचिका महामारी मराठ्यांपटकी च या आङ्ग्लायां कॉलरेयुक्तां शीतरेचनलक्षिता. (हिंदीः हैजा).
Choleric कॉलरिक् a.--- पित्तप्रकृति, तामसी, शीघ्रकोपी.
Cholesterol कलेस्टरोल् n.--- पित्तशयादि इंद्रियांद्वारा बनलेले एक शरीरोपयोगी द्रव्य ज्याच्या हानिकारक प्रकाराच्या आधिक्यामुळे रक्तवाहिन्यांची लवचिकता घटून ह्रुदयवेदना अर्धांग इ. विकार उद्भवू शकतात.
Chomp v.t./v.i.--- = Champ
Choose चूझ् v.t.--- निवडून घेणे, पसंत करणे.
Chop चॉप् v.t.--- तोडणे, छाटणे, कलम करणे.
Chopper चॉपर् n.--- लहान दांड्याची कुऱ्हाड/कोयता, ‘helicopter’ प्रकारचे विमान.
Chopping knife चॉपिंग् नाइफ् n.--- सुरा, सुरी.
Choppy चॉपी a.--- खळखळणारा, खळाळणारा (समुद्र), ऊर्मिल, विलोल-जंघाल.
Choral कोरल् a.--- गाणाऱ्या मंडळींचा.
Chord कॉर्ड् n.--- तार, तंतू, ज्या, जीवा, (भूमितीत).
Chore चोअर् n.--- काम, दैनंदिन कामकाज, कष्टाचे/कंटाळवाणे काम. Chores= घरकाम, घरगड्याचे काम.
Choreograph कोरिओग्राफ् / कॉरिअग्रॅफ् v.t.--- नाट्यरूपाने दर्शविणे/सादर करणे, अभिनीत करणे, दिग्दर्शन करणे.
Choreographer कोरिओग्राफर् / कॉरिअग्रॅफर् n.--- नृत्यदिग्दर्शक, नृत्यनाट्यकार, मूकनाटककर्ता.
Choreography कोरिओग्राफ् / कॉरिअग्रफी n.--- नृत्यनाट्यकला, मूकनाट्य, अभिनयविद्या.
Chorister कॉरिस्टर् n.--- गायकवृन्दातील एक गायक.
Choroid coat कोअराइड् कोट n.--- नेत्रगोलाच्या बाह्य आवरणाच्या आणतील काळ्या रंगाने भरलेले एक आवरण.
Chortle चॉर्टल् v.i.--- तुच्छतेने स्मित करणे.
Chorus कोरस् n.--- गाणारी मंडळी, ध्रुपद, समूहाने म्हणायचा गीताचा भाग (संस्कृत: प्रस्तारपंक्ति).
Christ क्राइस्ट् n.--- येशू ख्रिस्त.
Christen क्रिस्टन् / क्रिसन् v.t.--- बाप्तिस्मा देणे, नांव ठेवणे.
Christendom क्रिसन्डम् n.--- ख्रिस्ती लोकांचा देश. = christianity = ख्रिस्तीधर्म, ख्रिस्तीपणा, ख्रिस्तीसमाज.
Christian क्रिश्चियन् n.--- ख्रिस्ती धर्मातला मनुष्य.
Christian name क्रिश्चियन् नेम् / क्रिस्टियन् नेम् n.--- वैयक्तिक नांव, पालन्यातले नांव.
Christianity क्रिश्चियानिटि n.--- ख्रिस्ती धर्म.
Christmas क्रिस्ट्मस् n.--- नाताळ.
Christology क्रिस्टॉलजी n.--- ख्रिश्चन धर्माचे तत्वज्ञान, ख्रिश्चनधर्मशास्त्र.
Chromosome क्रोमोसोम् n.--- शरीरातील पेशीच्या केंद्रातील जुनाके (genes), ‘DNA’- अम्ले इ. धारण करणारा, धाग्याच्या आकाराचा व दोन सामानारूप धाग्यांच्या जोड्यांच्या स्थितीत राहणारा, शरीरधारी प्राण्याच्या वर्गानुसार (species) प्रत्येक पेशींत निश्चित संख्येत राहणारा, पेशींच्या विभाजनसमयींच सामान्यतः दृष्टिगोचर असा पदार्थ/वस्तु/अवयव.
Chronic(al) क्रॉनिक् / क्रॉनिकल् a.--- फार दिवसांचा, जुनाट, रेंगाळणारा, टिकून राहणारा, मुरलेला (आजार इ.), (‘acute’ नव्हे तो)
Chronicle क्रॉनिकल् n.--- कालक्रमवृत्तांत.
Chronologist क्रॉनॉलॉजिस्ट् n.--- कालक्रमविद्या जाणणारा.
Chronology क्रॉनॉलॉजी n.--- कालमानविद्या.
Chronometer क्रोनोमीटर् n.--- कालमापक यंत्र.
Chrysalis क्रिसलिस् n.--- फुलपाखरू होण्यापूर्वी सुप्तावस्थेतील किडा(pupa)-अशा किड्याचे वेष्टन जीविताची सुरक्षित अवस्था.
Chrysolite क्रिसोलाइट् n.--- एक प्रकारचा पाषाण.