Wave वेव्ह् v.i.--- हेलकावणे, दिवा ओवाळणे, परजणे, खूण करणे, घुटमळणे. n.--- लाट, तरंग.
Waver वेव्हर् v.i.--- हेलकावणे, कांकूं करणे, डोलणे.
Wavy वेव्ही a.--- लाटांचा, नागमोडीचा.
Wax वॅक्स् v.i.--- एकएक कला वाढणे. n.--- मेण, लाख. Earwax --- कानातील मळ. Wax-candle --- मेणबत्ती. Wax cloth --- मेणकापड. Wax work --- मेणकाम.
Waxen वॅक्सन् a.--- मेणाचे.
Way वे n.--- वाट, रस्ता, पल्ला, प्रकार, उपाय.
Wayfarer वेफेरर् n.--- वाटसरू, मार्गस्थ.
Waylay वेले v.t.-- -ची वाट मारणे, -ला वाटेत गाठून पकडणे.
Waylayer वेलेअर् n.--- वाटमाऱ्या.
Wayward वेवर्ड् a.--- स्वच्छंदी.
Waywardness वेवर्ड्नेस् n.--- स्वच्छंदीपणा.
We वी pron.--- आम्ही.
Weak वीक् a.--- अशक्त, दुबळा, हलक्या मनाचा, रोगी.
Weakness वीक्नेस् n.--- अशक्तपणा, दुबळेपणा.
Weakly वीक्ली ad.--- निर्बळ.
Weaken वीकन् v.t.--- अशक्त / दुबळे करणे, लुळा पाडणे.
Weal वील् n.--- कल्याण, कुशल, भरभराट, सुख. (फटक्यामुळे अंगावर उठलेला) वळ.
Wealth वेल्थ् n.--- संपत्ति, दौलत.
Wealthy वेल्थि n.--- संपत्तिमान.
Wean वीन् v.t.--- मन उठवणे, दूध तोडणे, -ला स्तनपानापासून तोडणे. (from) --- (सवय, लळा, ओढ, इ.) -पासून (हळूहळू) परावृत्त करणे.
Weapon वेपन् n.--- हत्यार, शस्त्र.
Wear वेअर् v.t.--- वहिवाटणे, झिजणे, झिजवणे, वापरणे, घालणे. चालणे, सरकणे. (past tense: ‘wore’, past participle: ‘worn’). n.--- झीज, वहिवाट, पोळ. Wear on/away --- सावकाश / कंटाळवाणेपणाने पुढे सरकणे / चालू राहणे / ढळणे. Wear out (away) --- झिजविणे, दमविणे, शक्तिहीन करणे, दमछाक करणे; (विरोधून / प्रतिकार करून) बोथट / दुर्बल करणे. v.i.--- खर्च होणे, खपणे, झिजणे, संपणे, क्षीण होणे. v.t.--- (वापर, घर्षण इ. मुळे) झिजविणे / खराब करणे. Wear and tear --- वापरामुळे होणारी झीज, बिघाड इ.. Wear through --- -ला कसेबसे निभावून नेणे, -मधून कसाबसा मार्ग काढणे.
Weariness वेअरिनेस् n.--- शीण, त्रास, कंटाळा.
Wearing वेअरिंग् a.--- दमविणारा, खेदकारी.
Wearisome विअरिसम् a.--- श्रमाचा, कष्टाचा, कंटाळवाणा.
Weary वीअरी v.i.--- शिणणे, त्रासणे, कंटाळा येणे, शिणविणे, त्रासविणे. a.--- त्रासलेला, कंटाळा आलेला, बेजार, त्रस्त.
Weather वेदर् n.--- हवा. v.t.--- हवेवर ठेवणे, पार पडणे, निभावणे. Weather-cock --- वायुगतिदर्शक यंत्र.
Weave वीव्ह् v.t.--- विणणे.
Weaver वीव्हर् n.--- कोष्टी, विणकरी.
Weaver’s shuttle व्हीवर्स् शटल् n.--- विणकराचा धोटा.