Express एक्स्प्रेस् v.t.--- बोलून दाखवणे, नक्कल करणे, सुचवणे, पिळून काढणे, दर्शविणे. a.--- मुद्दाम धाडलेला जासूद. a.--- साफ, चरचरीत, उघड, रीतीचा, मुद्दाम.
Expression एक्स्प्रेशन् n.--- उच्चार, उल्लेख, स्पष्टीकरण, वाक्य, शब्दप्रयोग, ठेवण, मुद्रा.
Expressive एक्स्प्रेसिव्ह् a.--- वाचक, बोधक, अर्थक, उद्देशक, द्योतक, जोराचा.
Expressly एक्स्प्रेस्लि ad.--- स्पष्ट, उघड, मुद्दाम, मुजरत.
Expropriate इक्स्प्रोप्रिएट् v.t.--- -ला लुबाडणे. -चा ताबा घेणे, हडपणे.
Expugn एक्स्पन् v.t.--- जिंकणे, हला करून घेणे.
Expulsion एक्स्पल्शन् n.--- घालवून देणे, बहिष्कार.
Expunge एक्स्पन्ज् v.t.--- पुसणे, खोडणे, मागमूस न राहू देणे, बोळा फिरविणे.
Expurgate एक्स्ट्रपर्गेट् v.i.--- आक्षेपार्ह भाग वगळून शुद्ध करणे / सुधारणे. बाहेर काढणे, काढून टाकणे.
Exquisite एक्स्क्विझिट् / इक्स्क्विझिट् n.--- अक्कडबाज, नखरेबाज.
Extant एक्स्टॅन्ट् a.--- उपलब्ध, विद्यमान, चालता, चालू.
Extemporal एक्स्टेम्परल्= Extempore = Extemporary a.--- पूर्वतयारीवाचून (आयत्या वेळी) तात्पुरत्या उपयोगार्थ असलेला / केलेला (विचार, लेख, उपाय, कृती, इ.).
Extemporaneous एक्स्टेम्परेनियस् = Extemporal, Extemporary, Extempore.
Extemporarily एक्स्टेम्पररिली ad.--- ‘extemporary’ रीतीने.
Extemporariness एक्स्टेम्पररिनेस् n.--- ‘extemporary’ पणा.
Extemporary एक्स्टेम्परेरि a.--- समयोचित, आयत्या, वेळेचा.
Extempore एक्स्टेम्परी ad.--- पूर्वविचाररहित. a.--- (Latin मध्ये, ‘out of time’, उत्स्फूर्त, (पूर्वतयारीवाचून) आयत्यावेळी जुलावालेला (लेख, विचार, कृति, इ.), आयत्या वेळी बोलणारा/करणारा/कर्ता (वक्ता इ.). ad.---
Extemporize / Extemposrise एक्स्टेम्पराइझ् v.i.--- समयोचित भाषण करणे. v.t. / v.i.--- ‘extempore’ करणे, बोलणे, इ..
Extend एक्स्टेन्ड् v.t.--- and v.i.--- ताणणे, वाढवणे, विस्तारणे, फैलावणे, देणे, लांबणे, पसरणे, पोहोचणे (विचार).
Extense एक्स्टेन्स् a.--- विस्तृत, पसरलेले.
Extension एक्स्टेन्शन् n.--- विस्तार, फैलाव.
Extensity एक्स्टेन्सिटी n.--- पसारा, व्याप. पहा: ‘Intensity’.
Extensive एक्स्टेन्सिव्ह् a.--- विस्तीर्ण, प्रशस्त, लांब-रुंद, विशाल, पसाऱ्याचा.
Extent एक्स्टेन्ट् n.--- विस्तार, लांबी, मर्यादा.
Extenuate एक्स्टेन्युएट् v.t.--- हलका/न्यून करणे.
Exterior एक्स्टीरिअर् a.--- बाहेरचा, बाहेरील. n.--- बाह्यांग, बाह्य प्रदेश, बाह्य स्वरूप.
Exteriority एक्स्टीरिआॅरिटी n.--- बाहेरचा भाग.
Exterminate एक्स्टर्मिनेट् v.t.--- समूळ नाश करणे, निःसंतान करणे, हद्दपार करणे, अंत करणे.
Extermination एक्स्टर्मिनेशन् n.--- समूळ नाश, निःसंतान, अंत,
Extern / Externe एक्स्टS(र्)न् a.--- = External n.---बाहेरील, अनिवासी व्यक्ति (विशे: शिक्षण संस्थेत शिकणारा छात्र). v.t.--- (शब्दकोशांत साधारणतः न आढळणारा पण प्रयोगांत आढळणारा अर्थ) -ला बाहेर काढणे/हद्दपार/तडीपार करणे. (The congress party office-bearer questioned the wisdom of according a red carpet reception to Baba Ramdev just 3 days before he was externed from the capital).
External एक्स्टS(र्)नल् a.--- बाहेरील, बाह्य बाजूस असणारा/दिसणारा. n.--- बाह्यांग, बाह्य बाजू, गौण भाग.
Exterritorial एक्स्टेरिटोरिअल् a.--- विदेशीय.
Extinct एक्स्टिन्क्ट् a.--- लुप्त, नष्ट, मावळलेला, नामशेष.
Extinction एक्स्टिन्क्शन् n.--- विनाश, निःपात, लोप.
Extinguish एक्स्टिंग्विश् v.t.--- मालावाने, विझवणे, नाश करणे, शांतवणे.
Extinguisher एक्स्टिंग्विशर् n.--- दिवा मालविण्याचे झांकण.