Shock n.--- शॉक् n.--- (केस इ. चा) पुंजका.
Shoddy शॉडी n.--- जीर्ण लोकरीच्या कपड्यापासून बनविलेली लोकर. a.--- दिखाऊ, तकलुपी, आकर्षक. घाईने / गलथानपणे केलेला. हीन / हलक्या दर्जाचा.
Shoe शू
Shore (up) v.t.--- -ला आधार देणे, टेकू देणे, -ला ताणून / आवळून घेणे.
Shorn शॉर्न् p.p.a.--- भादरलेले, कातरलेले, लुबाडलेला, ताडलेला, तुटका.
Short शॉर्ट् a.--- आंखूड, लहान, अपुरा, थोड्या काळाचा, ठेंगणा, संक्षिप्त, उणा, तुटपुंजा, ह्र्स्व, तुटीप.
Short-hand शॉर्ट्-हॅण्ड् n.--- प्रचलित अक्षरांपैकी छोटी चिन्हे / प्रतीकें / खुणा वापरून शीघ्र लेखन करण्याची लिपि. लघुलिपि. संक्षिप्त / प्रतीकात्मक / संक्षिप्तार्थ / प्रतिकार्थ अभिव्यक्ति. (Where 2 G was once short-hand for second-generation reforms, it now symbolises brazen corruption.)
Shorten शॉर्टन् v.t.--- आंखूड / लहान करणे, आंखडणे.
Shortly शॉर्ट्लि ad.--- थोडक्यात, थोड्या वेळाने, लौकर.
Shortsight शॉर्ट्साइट् n.--- लघुदृष्टि.
Shortspoken शॉर्ट्स्पोकन् a.--- मितभाषी.
Shot शॉट् v.t.--- गोळी भरणे. n.--- गोळी, छरा, पल्ला.
Should शुड् v.t.--- ‘should’ चा भूतकाळ.
Shoulder शोल्डर् v.t.--- खांद्यावर ठेवणे / घेणे. n.--- फरा, खांदा. Shoulder belt --- पडदळ. Shoulder joint --- खवाटा.
Shout शाउट् v.t.--- आरोळी मारणे, पुकारा करणे. n.--- आरोळी.
Shove शोव्ह् v.t.--- रेटणे, लोटणे. n.--- धक्का.
Shovel शॉव्हेल् n.--- खोरे, पावडे.
Show शो v.t.--- दाखविणे, शिकविणे, कळविणे. n.--- तमाशा, थाटमाट, सोंग, डौल, आकार.
Shower शॉवर् n.--- सर, वृष्टि. v.t.--- पाऊस पडणे.
Showy शोई a.--- देखणा, टुमदार, भपकेदार.
Shred श्रेड् n.--- चिंधी, चिरफळी. v.t.--- चिरफळ्या करणे.
Shrewd श्रूड् a.--- हुशार, धूर्त.
Shrew श्रू a.--- कर्कशा.
Shreik श्रीक् v.i.--- किंकाळी फोडणे. n.--- किंकाळी.
Shrift श्रिफ्ट n.--- अपराधस्वीकरण; (पापांची धार्मिक) कबुली; प्रायश्चित्त विधि. To make short shrifts of / to give short shrifts to --- निकाल लावणे, थोडक्यांत संपविणे.
Shrill श्रिल् v.i.--- किंकाळणे. a.--- कर्कश, किर्र, कडक.
Shrimp श्रिम्प् n.--- झिंगा, झिंगरू, (दशपाद कवचधारी समुद्रजीव). वामनमूर्ति.
Shrine श्राइन् n.--- देव्हारा, पवित्रस्थान. v.t.--- पवित्र वस्तु धारण करणे.
Shrink श्रिंक् v.i.--- चिरमुटणे, आंखुडणे, कच खाणे. आकसणे, आटणे. n.--- आकुंचन, अलिप्तता, औदासीन्य, लज्जा.
Shrivel श्रिव्हल् v.t.--- सुरकुत्या पाडणे / पडणे, आवळणे. v.i.--- सुरकुतणे.
Shroud श्राउड् v.t.--- बुरखा / पडदा घालणे, झांकणे. n.--- आश्रय, वस्त्र, प्रेतवस्त्र, कफन, आवरण.
Shrub श्रब् n.--- झुडूप, एक मादक पेय.
Shrubbery श्रबरि n.--- उपवन. झुडुपांची झाडी.
Shudder शडर् v.i.--- (थर-)कापणे, कंप पावणे, थरथरणे, थरारणे. n.--- थरकाप, कंप, थरार, थरथर.
Shuffle शफल् v.t.--- गोंधळ करणे, गल्लत करणे, फिरवाफिरव करणे, इकडे तिकडे हालविणे / फिरविणे, खुळखुळणे.
Shrug श्रग् n.--- खेच, ओढ. (उपेक्षा, तिरस्कार, विवशता इ. दर्शक) खांदे उडविण्याची / आखडण्याची क्रिया. v.--- (वरील भावदर्शक) खांदे उडविणे / आखडणे. Shrug off --- उपेक्षूं टाकणे; -पासून नामानिराळे होणे; -बद्दल असमर्थन व्यक्त करणे.