R.S.V.P. --- फ्रेंच भाषेंतील ‘repondez, s’il vous plait’ (=Reply if you please) या शब्दांचे संक्षिप्त रूप (निमंत्रण पत्रिकेमध्ये उत्तर पाठविण्याचा पत्ता देताना वापरले जाणारे शीर्षक.)
RAM रॅम् n.--- ‘Random’ Access Memory’ चे संक्षिप्त रूप. संगणकात तात्पुरती ग्रथित, परिवर्तनीय, स्मृति / माहिती.
Rabbit रॅबिट् n.--- ससा.
Rabbit-warren रॅबिट् वॉरन् n.--- सशांच्या बिळांनी भरलेली (राखीव) जागा; सशांच्या बिळांप्रमाणे दालने असलेली इमारत.
Rabble रॅबल् n.--- (अनियंत्रित) जनसंमर्द, गर्दी, गावगन्ना लोक, बाजारबुणग्यांची गर्दी.
Rabblement रॅबल्मेंट् n.--- बाजारबुणगे, गर्दी.
Race रेस् v.i.--- धावणे, शर्यत करणे, दौड मारणे. n.--- शर्यत, दौड, प्रवाह, वंश, गोत, मेळा, लज्जत.
Raceme रॅसीम् n.--- एका लांब दांडीस लहान देठांनी लटकलेल्या अनेक फुलांची मालिका.
Racer रेसर् n.--- धावणारा, शर्यतीचा घोडा.
Rachis रेकिस् n.--- मुख्य दांडी, डहाळी / पीस यांतील मुख्य देठ (ज्याला उपदेठ फुटतात).
Rachitic रॅकाय्टिक् a.--- ‘Rachitis’- -ग्रस्त / -विषयक.
Rachitis रॅकाय्टिस् n.--- = Rickets (-चे शास्त्रीय / पारिभाषिक नाव).
Racial रेशल् a.--- वंशाचा, जातीचा, वर्णाचा.
Raciness रेसिनेस् n.--- झणझणीतपणा, सणसणीतपणा, लज्जत.
Rack रॅक् v.t.--- हाल करणे, विपर्यास करणे, ताणणे. n.--- यातना, मांडण, घोडा. हाल करण्याचे यंत्र / साधन. विनाश (विशे. ‘Rack and ruin’ या वाक्प्रचारांत).
Rack up (Injuries etc.) v.t.--- शारीरिक यातना देऊन / सोसून घडवून आणणे.
Racket रॅकेट् n.--- कल्लोळ, गलबल, टेनिसबॅट. लबाडीने चालविलेला धंदा. विनासायास भरपूर पैसा कमावण्याचा उद्योग. टेनिस, बॅडमिंटन इ. खेळांत चौकटीची दांडी (या अर्थी ‘raquet’ असे ही स्पेलिंग).
Raconteur रकोंटोर् / रॅकॉण्टर् n.--- कथाकथनपटु, गोष्टीवेल्हाळ.
Raconteuse रकोंटोझ् n.--- ‘Raconteur’ ची स्त्रीलिंग.
Racquet रॅकेट् n.--- टेनिस, बॅडमिंटन इ. खेळांत चेंडू / फूल फेकण्यास / झेलण्यास वापरायची जाळीच्या चौकटीची दांडी / बॅट. = Racket
Racy रेसी a.--- त्वेषपूर्ण, आवेशपूर्ण; लज्जतदार, चमचमीत.
Radiance रेडिअन्स् n.--- चकचकी, प्रभा, तेज, चमचमाट.
Radiant रेडिअन्ट् a.--- चकचकीत, तेजोमय, तेजस्वी.
Radiate रेडिएट् v.i.--- केंद्रापासून नीट निघणे, किरण पडणे, रूपाने येणे. a.--- किरण बाहेर टाकणारा.
Radical रॅडिकल् a.--- (वनस्पति आदि पदार्थ, भाषा किंवा कोणतेही शास्त्र / व्यवस्था / पद्धति -यांच्या) मुळाशी संबंधित. मौलिक, मूलभूत, सारभूत, स्वभावभूत, अंगभूत, पायाभूत, मूलगामी, मूलग्राही, मर्मस्पर्शी, पूर्ण, सर्वव्यापी, आमूलाग्र, क्रान्तिकारक, घातमूळ (घातसंख्येचे मूळ) असलेला. (भाषेतील) धातु-/क्रिया- शब्दांशी संबंधित. n.--- मूळ शब्द / अक्षर. मूलसंख्या, घातमूलांक. याची ‘ ’ अशी खूण. मूल पदार्थ (उदा. परमाणु, अणु, रेणु). मौलिक क्रान्ति / सुधारणा - यांचा पुरस्कर्ता.
Radical sign रॅडिकल् साइन् n.--- घातमूलदर्शक ‘ ’ अशी खूण. उदा. ‘ ४ ’ म्हणजे ४ चे वर्गमूळ. ३ ८ म्हणजे ८ चे घनमूळ.
Radical रॅडिकल् a.--- मूळचा, जातीचा, पूर्ण, आमूलाग्र, मौलिक, मूलभूत, सारभूत.
Radicalism रॅडिकलिझम् n.--- मूलभूत / मौलिक / मूलगामी धोरण / कार्य प्रतिपादणारा विचार / मठ / पंथ. ‘मूले कुठारः’ हे तत्व. व्यापक / सर्वंकष बदल प्रतिपादणारा पंथ.
Radio रेडिओ n.--- ध्वनीचे विद्युच्चुंबकीय लहरीत रूपांतर करून, ध्वनी दार पाठविणे व तो पुनः मूळ रूपांत आणून ऐकणे - या प्रक्रियेची यंत्रणा. आकाशवाणी. v.t.--- आकाशवाणी-पद्धतीने (संदेश इ.) पाठविणे / प्रक्षेपित करणे.
Radio-active रेडिओ-अॅक्टिव्ह् a.--- (‘रेडियम’ (Radium) प्रमाणे) सूक्ष्मकणरूपी किरणे आपोआप बाहेर टाकू शकणारा. किरणोत्सर्गशील, प्रक्षेप(ण) -शील / -प्रवण.
Radish रॅडिश् n.--- मुळा, मूलक, मुळ्याचे झाड.
Radium रेडिअम् n.--- एक किरणोत्सर्गी धातुरूप मूलद्रव्य (रासायनिक संक्षिप्त रूप : ‘Ra’)
Radius रेडिअस् n.--- त्रिज्या, व्यासार्ध. विशिष्ट त्रिज्येचे / व्यासाचे क्षेत्र / परिसर / विस्तार. (Pl. Radii रेडिआइ / Radiuses रेडिअसेस्)(Eg.--- Free entry is prohibited into the 2 kilometers radius of the station.)