Equal ईक्वल् a.--- सारखा, बरोबरीचा, एकसारखा, जोडीचा, समान, समतोल, योग्य, पुरेसा.
Equality ईक्वालिटी n.--- समानता, सममूल्यता, बरोबरी, एकमूल्यता.
Equalize इक्वलाइझ् v.t.--- सारखे करणे.
Equally ईक्वलि ad.--- एकसारखा.
Equanimity इक्वानिमिटि / इक्वनिमिटी / एक्वनिमिटी n.--- समान वृत्ति-भाव.
Equanimous इक्वानिमस् a.--- समान प्रकृतीचा.
Equate इक्वेट् v.t.--- सम करणे, सरासरी काढणे.
Equation इक्वेशन् / ईक्वेझन् n.--- समीकरण, समानता, तुल्यता.
Equator इक्वेटर् n.--- भूमध्यरेषा, विषुववृत्त.
Equestrian इक्वेस्ट्रियन् a.--- अश्वविषयक, अश्वविद्याविषयक. अश्वारूढ-स्थितींतील /-रूपांतील.
Equiangular ईक्विअँग्युलर् a.--- समकोण, समकोणक.
Equidistant ईक्विडिस्टन्ट् a.--- सारख्या अंतराचा.
Equilateral ईक्विलॅटरल् a.--- सारख्या बाजूंचा.
Equilibrium ईक्विलिब्रिअम् n.--- समतोल.
Equine ईक्वाइन् a.--- घोड्याचा, घोड्यासंबंधी.
Equinoctical इक्वनॉक्शल् a.--- ‘Equinox’ संबंधीचा, विषुवीय. Equinoctical line - विषुवीय रेखा.
Equinox ई(ए)क्विनॉक्स् n.--- २१ मार्च च्या सुमारास व २३ सप्टेंबर च्या सुमारास प्रतिवर्षी दोनदा येणारी वेळ. जेंव्हा सूर्य विषुववृत्त ओलांडताना दिसतो व जेंव्हा जगांत दिनमान व रात्रिमान समान असते. Vernal equinox - (हिंदी: वासंतिक / वसंतकालीन) (संस्कृत: विषुवं, महाविषुव, हरिपदं). Autumnal equinox : शारदीय / शरत्कालीन विषुव.
Equip इक्विप् v.t.--- सजवणे, हत्यारबंद/सज्ज करणे.
Equipage इक्विपेज् n.--- युद्धसामग्री, लढाईचे सामान, लवाजमा, स्वारी, इतमाम.
Equipment इक्विप्मेंट् n.--- सरंजाम, साज.
Equipoise ईक्विपॉइझ् / एक्विपॉइझ् n.--- समतोल, समतुलना, समतोल साधण्यासाठी टाकलेली भर, लावलेला जोर. V.t.--- समतोलात धरणे/आणणे.
Equitable एक्विटेबल् a.--- रास्त, न्याय्य न्यायाचा.
Equities एक्विटीझ् n.--- व्यापारसंस्थे-(कंपनी-)तील समभाग भांडवल.
Equity एक्विटी n.--- न्याय, नीति, इन्साफ, व्यापार-संस्थेतील (कंपनीतील) (सम-)भाग/मूल्य.
Equivalent ईक्विव्हॅलेन्ट् a.--- एका मोलाचा, एकार्थाचा. N.--- बरोबरीचा पदार्थ/विषय, एकार्थाचा शब्द.
Equivocal ईक्विव्होकल् a.--- दोन अर्थाचा, दुटप्पी.
Equivocate ईक्विव्होकेट् v.i.--- दुटप्पी बोलणे.
Equivocation ईक्विव्होकेशन् n.--- दुटप्पी भाषण.
Equivoke ईक्विव्होक् a.--- श्लेष, वक्रोक्ति.
Era ईरा n.--- शक, सन; शकारंभ; युग, पर्व, कालाखंड.
Eradicate इरॅडिकेट् v.t.--- मुळासुद्धा उपटणे, समूळ नाश करणे.
Eradication इरॅडिकेशन् n.--- निर्मूलन, बीमोड.
Erasure इरेझर् n.--- खोडणे, लोप.
Ere एर् prep.--- अगोदर, पूर्वी.
Erect इरेक्ट् v.t.--- उभा करणे, उभारणे, बांधणे, रचणे. A.--- उभारलेला, खडा, उभा, नीट, ताठ.
Erection इरेक्शन् n.--- बांधणी, इमला, उभारणी, रचना, ताठ(र)ण्याची प्रक्रिया.
Eremitism एरिमिटिझम् n.--- एकांतवास, एकांतवासव्रत.
Erenow एअरनाउ ad.--- यावेळेपूर्वी.
Erewhile एअरव्हाइल् ad.--- काहीवेळापूर्वी.
Ergo अर्गो ad.--- यास्तव, म्हणून.