Lei-Lib

Leisure लीझर् n.--- फुरसत, रिकामपण, अवकाश.
Leitmotiv / Leitmotif लाईटमोटीफ् n.--- मुख्य सूर, मुख्य रसविशेष, प्रधान वैशिष्ट्य.
Leman लीमन् n.--- प्रिया, प्रियकरणी, प्राणसखा.
Lemma लेमा n.--- मुद्दा, विषय, शीर्षक.
Lemming लेमिङ् n.--- एक विशेष (उत्तरध्रुवी) उंदीर.
Lemon लेमन् n.--- लिंबू, लिंबुणी, निंबू, लिंबी.
Lemonade लेमोनेड् n.--- लिंबाचे सरबत, पन्हे.
Lend लेन्ड् v.t.--- उसना / कर्जाऊ देणे, व्याजी देणे.
Lender लेन्डर् n.--- उसने देणारा, सावकार, धनको.
Length लेन्थ् n.--- लांबी, अंतर, अवकाश.
Leniency लीनिअन्सि a.--- सौम्यता, नरमपणा, दया.
Lenient लीनिअन्ट् a--- नरम, सौम्य, सदय, दयार्द्र.
Leniently लीनिअन्ट्लि ad.--- सौम्यतेने, सामोपचाराने.
Lenity लेनिटी n.--- मवाळपणा, नरमाई, सौम्यत्व.
Lens लेन्झ् n.--- पारदर्शक काच इ. ना गोलाकार देऊन बनविलेले, वस्तु स्पष्ट, मोठी व लहान करून पाहण्याचे यंत्र. भिंग, (काचः संस्कृत). Convex lens - मध्योन्नतकाचः (संस्कृत). Concave lens - मध्यनिम्नकाचः (संस्कृत). Contact lens - गुप्तोपनेत्र, चिकटभिंग.
Lent / Lenten Season लेन्ट् प्रतिवर्षी फेब्रुवारी ते एप्रिल या काळांत पडणारा ख्रिश्चन-धर्मीयांचा Ash Wednesday पासून Easter [पर्यंतचा, ४७ दिवसांचा व्रतकाल / प्रायश्चित्तकाल / तपश्चरणकाल. ख्रिश्चन धर्मातील प्रायश्चित्तविधिसत्र.
Lentil लेन्टल् n.--- खाण्याच्या शेंगा धारण करणारी वनस्पति / तिचे धान्य, कडधान्य. मसूर, मसुराची डाळ.
Leonine लिओनाइन् a.--- सिंहासारखा, सिंहाचा.
Leopard लेपर्ड् n.--- चित्ता, खड्या/दिवट्या वाघ, बिबळ्या वाघ, ठिपक्याचा किंवा काळा आशियाई वा आफ्रिकी वाघ. (द्वीपिन् : संस्कृत). = Panther (of smaller size). American leopard = Jaguar. Hunting leopard = Cheetah. Sea leopard = Leopard-seal. Snow leopard = ‘ounce’ नावाने ओळखली जाणारी एक बिबळ्या वाघाची जात. (स्त्रीलिंग: Leopardess).
Leper लेपर् a.--- कोड्या, महारोगी, रक्तपित्या.
Leprosy लेप्रसि n.--- कोड, रक्तपित्ती, महारोग, कुष्ठ.
Lepto- लेप्टो- --- बारीक, लहान, नाजूक या अर्थाचे शब्दारंभी येणारे उपपद.
Leptospirosis लेप्टोस्पायरोसिस् n.--- थंडी भरून येणाऱ्या तीव्र तापाचा एक प्रकार. उंदीर वा पाळीव प्राण्यांच्या शरीरांत वाढून अन्यत्र पसरणाऱ्या (विशेषतः पाण्याद्वारे) विशिष्ट जंतूंमुळे उद्भवणारा, तीव्र डोकेदुखी, मळमळ, ओकाऱ्या, पाठ-पॉट-पोटऱ्या यांचे स्नायु दुखणे ही अन्य लक्षणे. रोगग्रसतांपैकी ५-१० टक्के लोक या रोगाच्या ‘वाइल्झ डिझीझ’(Weil’s Disease) या जीवघेण्या प्रकाराने बाधित होऊ शकतात.
Lesbian = sapphist
Lesbianism = sapphism
Lesion लीजन् n.--- इजा, अपाय, रोग, व्रण.
Less लेस् a.--- कमी, थोडा, न्यून, अल्प, लहानगा.
Lessen लेसन् v.t. and v.i.--- कमी होणे/करणे, ऱ्हास होणे, उतरणे, खालावणे, बसणे, मंदावणे. n.--- धडा, उपदेश.
Lest लेस्ट् con.--- कदाचित ना जाणो, यदा कदाचित, नको/नये म्हणून.
Let लेट् v.t.--- मोकळीक/परवानगी देणे, भाड्याने देणे, अडथळा.
Let - up n.--- विराम, विरति, शमखण्ड, शिथिलीकरण, ढिलाई, शैथिल्य.
Lethal लीथल् a.--- प्राणनाशक, प्राणहारक.
Lethargy लेथार्जी n.--- गाढनिद्रा, झापड, झाप.
Letter लेटर् v.t.--- अक्षर लिहिणे. n.--- पत्र, अक्षर, चिठ्ठी, पत्रिका, लिखित अक्षराचा ठसा. Letter by Letter - अक्षरशः.
Lettered लेटर्ड् p.p.a.--- विद्वान, शिकलेला.
Leukaemia / Leuchaemia ल्यूकीमिया n.--- पांढऱ्या रक्तपेशींच्या अत्यंत वाढीने होणारा (कर्क-) रोग.
Leuco - ल्यूको- ‘पांढरा’ अशा अर्थाचे उपपद.
Leucoderma ल्यूकोडर्मा n.--- कातडीवरील पांढऱ्या डागांचा रोग, एक प्रकारचे रोग.
Levee लेव्हि n.--- दरबार, कचेरी, सभा.
Level लेव्हल् n.--- सपाट, सारखा, जोडीचा, समान, सरळ, क्षितिजसमांतर पातळी निश्चित करण्याचे यंत्र / उपकरण. पाणसळ. क्षितिजसमांतर अवस्था / स्थिति / स्टार / रेषा / पातळी. सपाट प्रदेश. उंची, श्रेणी, पद, स्तर. v.t.--- सारखा करणे, जमिनीस मिळविणे, -ला क्षितिजासमांतर / सपाट करणे, -ला विशिष्ट स्तरावर आणणे, -ना एका स्तरावर आणणे, ला भूमीच्या स्तरावर आणणे, जमीनदोस्त करणे, भुईसपाट करणे. v.i.--- विशिष्ट स्तरावर येणे. a.--- क्षितिजासमांतर, सपाट, समस्तरीय, एकस्तरीय, स्थिर.
Lever लीव्हर् n.--- तरफ, तीर, उटाळी, टेंका.
Leverage लीव्हरिज् n.--- तरफेची प्रति प्रभावित करण्याची शक्ति, नियंत्रणाचे साधन.
Leviathan लिव्हाय्अथन् n.--- (हिब्रू काव्यातील) जलराक्षस, समुद्रातील भूत, अवाढव्य प्राणी, प्रचंड संपत्तीचा अधिपति, कुबेर.
Levitate लेव्हिटेट् v.i.---
Levity लेव्हिटि n.--- हलकटपणा, छचोरपणा, विनोद, लघिमा, हलकेपणा, चांचल्य, चापल्य.
Levy लेव्हि n.--- जमा, जमाबंदी, कर, पट्टी. युद्धासाठी भरती केलेले सैनिक.
Lewd ल्यूड् a.--- स्त्रीलंपट, कामासक्त, विषयी.
Lewdly ल्यूड्लि ad.--- कामभावाने, कामुकपणे.
Lexical लेक्सिकल् a.--- भाषेतील, शब्दांसंबंधीचा, शब्दसंपत्तिसंबंधींचा, शब्दकोशविषयक, शब्दकोशस्वरूपाचा, शाब्दिक. (This dictionary would certainly be a valuable lexical companion to English literature.)
Lexicographer लिक्झिकोग्रफर् n.--- कोशकार, शब्दकोशकर्ता.
Lexicographical लिक्झिकोग्रफिकल् a.---
Lexicographist लिक्झिकोग्रफिस्ट् n.--- = Lexicographer
Lexicography लिक्झिकोग्रफी n.--- शब्दकोशरचना / शब्दकोशशास्त्र.
Lexicon लेक्सिकन् / लेक्सिकॉन् n.--- (pl. Lexica / Lexicons) कोश, शब्दकोश.
Lexiconographer n.---
Liable लायेबल् a.--- जबाबदार, योग्य, पात्र.
Liableness लायेबल्नेस् n.--- पात्रता, योग्यता, जबाबदारी.
Liaise लिएझ् (with) v.i.--- (with) -शी संपर्क ठेवणे / सहकार्य करणे.
Liaison लिएझॉन् n.--- संपर्क, सहकार्य.
Liar लायर् n.--- खोटे/असत्य बोलणारा, असत्यवादी, खोटारडा.
Libation लायबेशन् n.--- देवादिकांस अर्पण केलेला / देऊ केलेला मद्यादि (द्रव / पेय-) नैवेद्य.
Libel लाइबेल् n.--- निंदापत्र. v.t.--- पात्रात निंदा करणे.
Libeller लाइबेलर् n.--- नालस्तीचे लेख लिहिणारा.
Liberal लिबरल् a.--- उदारमनाचा, थोर, उत्तम. n.--- स्वातंत्र्य/सुधारणावादी.
Liberality लिबरॅलिटि n.--- उदारपणा, औदाऱ्य.
Liberate लिबरेट् v.t.--- मोकळा / स्वतंत्र करणे.
Liberation लिबरेशन् n.--- मुक्तता, दास्यमुक्ति.
Libertarian लिबर्टेरियन् n.--- इच्छा-स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता, स्वातंत्र्यवादी.
Libertarianism लिबर्टेरियॅनिझम् n.--- स्वातंत्र्यवाद.
Libertine लिबर्टीन् a.--- उच्छुंखल, बदफैली. n.--- रांडबाज, शृंगारी, व्यसनी, निर्बंधन, मुक्त.
Liberty लिबर्टि n.--- स्वतंत्रता, मुखत्यारी, मुभा, स्वातंत्र्य.
Libidinous लिबिडिनस् a.--- विषयी, स्त्रीलंपट.
Libido लिबिडो n.--- नैसर्गिक शारीरिक (विशेषतः लैंगिक) प्रेरणा / वासना.
Librarian लायब्रेरियन् n.--- पुस्तकसंग्रहाधिकारी.
Library लायब्रेरि n.--- पुस्तकवाचनालय, पुस्तकालय.