Zoo-Zor

Zoo झू n.--- प्राणीसंग्रहालय.
Zoo doo झू डू n.--- प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या शेणापासून बनविलेले खत.
Zoo- ‘सजीव प्राणी’ या अर्थी लावले जाणारे उपपद.
Zoobiotic झूबायॉटिक् a.--- परजीवी किंवा सहजीवी. एखाद्या प्राण्यावर पूर्णपणे किंवा अंशतः अवलंबून असलेला.
Zoochore झुउकोर् n.--- अशी वनस्पती जिच्या बिया प्राण्यांद्वारे पसरविल्या जातात.
Zoochorous झुउकोरस् a.--- जनावरांद्वारे पसरविले जाणारे बीज असलेली (वनस्पती).
Zoogeography झोअजिअॉग्रफी n.--- प्राण्यांच्या भौगोलिक वितरणाचे शास्त्र. ह्या शास्त्राचा अभ्यास.
Zooglea झोअग्लीअ n.---अनेक सूक्ष्मजीव एकत्र येऊन बनलेला जेलीसारखा लिबलिबीत गोळा. = Zoogloea
Zoogloea = Zooglea
Zoograft झूग्राफ्ट् n.--- प्राण्याच्या शरीरावरून काढून माणसाच्या शरीरावर जोडलेले कातडे / कातड्याचा तुकडा.
Zoografting झूग्राफ्टिंग् n.--- प्राण्याच्या शरीरावरून कातड्याचा एक भाग काढून तो माणसाच्या शरीरावर जोडण्याची शस्त्रक्रिया.
= Zooplasty
Zoography झूग्राफी n.--- प्राणीवर्णनासंबंधी प्राणीशास्त्राची (‘Zoology’ ची) एक शाखा.
Zookeeper झूकीपर् n.--- प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांची काळजी घेणारा मनुष्य.
Zoological झोअलॉजिकल् a.--- प्राण्यांशी संबंधित, ‘Zoology’ शी संबंधित.
Zoologist झोऑलजिस्ट् n.--- प्राणीशास्त्रतज्ज्ञ.
Zoology झोऑलजी n.--- प्राणीशास्त्र, प्राण्यांशी संबंधित जीवशास्त्राची (‘Biology’ ची) एक शाखा.
Zoom झूम् v.i.--- सूं असा आवाज करीत वेगाने जाणे, (एखाद्या अडथळ्यावरून) वेगाने उडत जाणे. v.t.--- विमान वेगाने एकदम वरच्या दिशेने उडविणे. (एखाद्या अडथळ्यावरून) वेगाने उडवत नेणे. n.--- वेगाने जाण्याचा आवाज, वेगाने जाण्याची क्रिया. Zoom in --- एखादी वस्तू किंवा देखावा कॅमेऱ्याच्या किंवा भिंगाच्या साहाय्याने जवळून व मोठा करून दाखविणे.
Zoomania झूमेनिआ n.--- जनावरांप्रति उत्कट भावना, जनावरांची तीव्र आवड.
Zoometry झोआॅमेट्री n.--- प्राणांच्या शरीरावयवांच्या लांबी-रुंदीची प्रमाणबद्ध मोजणी.
Zoomorph झोअमॉर्फ् n.--- एखाद्या प्राण्यासारखे रूप धारण केलेली देवता.
Zoomorphic झोअमॉर्फिक् a.--- प्राणीरूपांत दर्शविण्यासंबंधी.
Zoon झोआॅन् n.--- संयुग जीवातील एक जीव. एकाच अंड्यातून उत्पादित जीव / प्राणी / व्यक्ती. अश्या जीवांचा समूह.
Zoonosis झोआॅनसिस् n.--- माणसांत पसरू शकणारा प्राण्यांचा रोग.
Zoophagous झोआॅफगस् a.--- मांसाहारी, मांसभक्षक. = Carnivorous.
Zoophile झूअफाइल् n.--- प्राण्यांची आसक्ति / आवड असणारी व्यक्ती. प्राण्यांना समर्पित असलेली व्यक्ती. रोगनिदानशास्त्रात (Pathology) जिवंत प्राण्यांना प्रयोगासाठी वापर करण्याच्या पद्धतीपासून वाचविणारी व्यक्ती (विशेषतः अश्या पद्धतींपासून ज्या प्राण्यांना त्रासदायक / पीडाकारक असतात).
Zoophilia झोअफिलिआ n.--- प्राण्यांवर असामान्य प्रेम / आसक्ती.
Zoophilism झोअफिलिझम् n.--- प्राण्यांशी भावनिक संलग्नता असण्याची प्रवृत्ती.
Zoophobia झूअफोबिआ n.--- प्राण्यांची असामान्य / विलक्षण भीती असण्याची विकृती.
Zooplasty = Zoografting
Zootechnics झोअटेक्निक्स् n.--- पशुसंवर्धन, पशुसंवर्धनाचे शास्त्र.
Zori झोरी n.--- पेंढ्याने किंवा रबर ने बनलेली जापानी चप्पल.
Zoril झोरिल् n.--- मुंगसासारखा दिसणारा एक आफ्रिकन प्राणी.