ten टेन् a.--- दहा.
tenable टेनेबल् a.--- राखण्याजोगा, प्रतिपादण्याजोगा.
tenacity टनॅसिटी n.--- भक्कमपणा. चिवटपणा.
tenancy टेनन्सि n.--- भोगवटा, भोगवट्याची मुदत.
tenant टेनन्ट् n.--- असामी, कूळ, भाडेकरी.
tenantry टेनन्ट्री n.--- रयताबा.
tend टेन्ड् v.t.-- कल-झोक असणे, रोख असणे, -ची काळजी घेणे, निगा राखणे.
tendency टेन्डन्सि n.--- कल, झोक, झुकाव.
tenet टेनेट् n.--- तत्व, सिद्धांत, श्रद्धा, धारणा.
tenon टेनन् n.--- कुसूं. v.t.--- कुसूं करणे.
tenor टेनर् n.--- धोरण, भाव, प्रकार, रीति. (भाषण / लिखाण / वागणूक यांतील) मुख्य सूत्र, रोख, प्रधानाशय, कल. मार्गक्रम, दिशा.
tense टेन्स् a.--- ताणलेले, ताठ. n.--- काळ. विविध कालभेद दाखविणाऱ्या धातुरूपप्रकारांतील एक.
tension टेन्शन् n.--- ओढा, ताठपणा, ताण, तणाव.
tent टेन्ट् n.--- तंबू.
tenter टेन्टर् n.--- ताणण्याची आंकडी. On tenter-hooks : अस्वस्थ अवस्थेत असणे.
tenth टेन्थ् a.--- दहावा. n.--- दहावा वाटा.
tenuity टेन्युइटि n.--- पातळपणा, सूक्ष्मपणा, कमीपणा.
tenuous टेन्युअस् a.--- पातळ, सूक्ष्म, बारीक, कच्चा, दुर्बल, अशक्त.
tenure टेन्युअर् n.--- भोगवट्याचा प्रकार.
tepid टेपिड् a.--- कोमट, मवाळ.
tepidness टेपिड्नेस् n.--- कोमटपणा, मंदोष्णता.
ter- टर् --- तिप्पट, तीन वेळा, तिहेरी अशा अर्थाचे उपपद / उपसर्ग.
tercentenary टर्सेंटिनरी n.--- तीनशे संख्ये -चा / -संबंधीचा; तीनशे वर्षांच्या पूर्तीसंबंधीचा. त्रिशताब्दी (समारंभ / उत्साह).
tergiversation टर्जिव्हर्सेशन् n.--- (स्वीकृत कार्य / तत्व / पंथ पासून) माघार / पलायन / विमुखता / डळमळीतपणा.
term टर्म् v.t.--- नाव देणे, बोलणे. n.--- मर्यादा, मुदत, संज्ञा, अवधि, अभिधान.
terms टर्म्स् n.--- बोलण्याचा वगैरे भाव, अट, शर्त.
termagant टर्मागन्ट् n.--- केकसा मावशी, कृत्या स्त्री.
terminate टर्मिनेट् v.t.--- संपवणे, मर्यादा घालणे.
termination टर्मिनेशन् n.--- शेवट, अंत्यवर्णप्रत्यय.
terminology टर्मिनॉलजी n.--- परिभाषा(शास्त्र).
termite टर्माइट् n.--- वाळवी, उधई.
terminal टSर्मिनल् a.--- शेवटचा, अखेरचा, अंतिम, टोकाचा. विशिष्ट कालखंडाच्या शेवटी असणारा देहाशेचा; देहान्तकारी. n.--- विद्युद्दाहकांतावरील उपकरण. प्रवासमार्गाचे शेवटचे स्थानक.
terminus टSर्मिनस् n.--- टोक, अंत, हददीचा दगड / खूण. (विशिष्ट) प्रवासमार्गावरील अखेरचा टप्पा. की(pl. terminuses).
terra cotta टेरा कोट्टा n.--- भाजलेली माती / खापर. अशा मातीने / खापराने बनविलेली वस्तु. अशा मृद्वस्तूचा रंग, तपकिरी-लाल रंग.
terra firma टेर फS(र्)म n.--- कोरडी / भक्कम / स्थिर भूमि / आधार.
terrace टेरस् n.--- ओटा, गच्ची, आगाशी, माळवद.
terrain टेरेन् n.--- विशिष्ट भूभाग, प्रदेश, प्रदेशाची भौगोलिक ठेवण / रूप.
terrestrial टेरेस्ट्रिअल् a.--- भूलोकाचा, ऐहिक.
terrible टेरिबल् a.--- भयंकर, भयानक, घोर.
terrier कोल्हे किंवा लहान आकाराच्या बिळात राहणाऱ्या प्राण्यांना हुडकून हाकलून काढण्यासाठी शिकवून तयार केलेल्या अश्या लहान आकाराच्या कुत्र्याची एक जात.
terrify टेरिफाय् v.t.--- भिती घालणे/दाखविणे. त्रेधा करणे.
territory टेरिटोरि n.--- आवाका, राज्य, प्रांत, राष्ट्र, मुलुख.
terrorism टेररिझम् n.--- आतंकवाद(हिंदी), दहशतवाद, धाकवाद.
terrorist टेररिस्ट् n.--- ‘Terrorism’ चा अनुयायी / पुरस्कर्ता, दहशतवादी. आतंकवादी / आतंकी(हिंदी).
terse टर्स् a.--- संक्षिप्त व मुद्देसूद, मोजक्या शब्दात बरेच काही सांगणारा.
tertiary टर्शरी a.--- तिसऱ्या श्रेणीचा.