coyness कॉय्नेस् n.--- मुरका, नखरा, लाज.
cozen कझन् v.t.--- फसवणे, टकवणे.
c.P.U. सी.पी.यू. n.--- ‘Central Processing Unit’ हा संगणकाचा सर्वात महत्वाचा भाग. (यास ‘microprocessor’ असेही म्हणतात.
crab क्रॅब् n.--- खेकडा, कुरले, एक रानफळ, चिडका/वाकडा/अनुदार/क्षुद्रवृत्तीची व्यक्ति. v.t.--- निंदा/टीका/दोषारोप-द्वारा -ची अप्रतिष्ठा करणे/-चे पाय ओढणे.
crabbed क्रॅब्ड् a.--- तिरसट, चिडखोर, हिरवट.
crack क्रॅक् v.i.--- तडतडणे, तडकणे. v.t.---फोडणे, मोडणे. a.--- वेडसर, उत्कृष्ट, उत्तम, कडक. n.--- फट, सांधा, भेग, तडा, कडकडाट. ad.--- तडाख्याने, तडकाफडकी, तडक.
cracked क्रॅक्ड् a.--- वेडसर, वेडपट, खुळचट.
cracker क्रॅकर् n.--- फटाकडा, फटाका, किंकरे.
crackle क्रॅकल् v.t.--- कडकड, फटफट, टर्र… कर्र… इ. प्रकारचा ध्वनि करीत/काढीत चेपणे/कुचलणें/तोडणे/मोडणे/चिरडणे/फाडणे. n.--- कडकड इ. (वरील प्रकारचा) (चिरडणे इ. क्रियांचा) ध्वनि.
crackpot क्रॅकपॉट् n.--- चक्रम/भंपक/वेडपट माणूस
cradle क्रेडल् n.--- मुलाचा पाळणा, घोडी.
craft क्रॅफ्ट् n.--- कावा, कला, कसब, हुन्नर, गलबत.
craftsman क्रॅफ्ट्स्मन् n.--- कारागीर, शिल्पी.
crafty क्रॅफ्टी a.--- कावेबाज, मतलबी, कपटी, धूर्त.
crag क्रॅग् n.--- सुळका, खडपा, शृंग(पर्वताचे), कडा.
cragged क्रॅग्ड् a.--- सुळक्याचा, उंच सखल, खांचखोचीचा, खडबडीत, ओबडधोबड विस्तृत माहिती. v.--- विषय घाईघाईने समजून घेणे.
cram क्रॅम् v.t.--- ठासून भरणे, कोंदणे. v.i.--- रगडून खाणे.
cramp क्रॅम्प् n.---वांब, पेटका, चमक, गोळा. v.t.--- प्रतिबंध करणे, दाटी/गर्दी मध्ये कोंडणे, जखडणे, कोंदणे, कोंबणे.
crane क्रेन् n.---करकोचा पक्षी, ओझी उचलण्याची यारी. v.i.--- (नीट पाहण्यास इ.)मान उंचावणे/पुढे करणे/वाकवणे. डोकावणे (‘crane’ (करकोचा)च्या प्रमाणे).
cranium क्रेनिअम् n.--- कपाळ, करोटी, मस्तक.
crank क्रॅन्क् a.--- कलथा, कलन्डा, चक्रम, लहरी. (‘crank up’) v.t.--- चालविणे, चालू करणे, सक्रिय करणे.
cranky क्रँकी a.--- लहरी, भंपक, चक्रम, खुळा.
cranny क्रॅनि n.--- चीर, फट, भेग.
crap क्रॅप् n.--- विष्ठा, मलोसर्ग. घाण. मूर्खता.
crape क्रेप् n.--- दंडाला बांधण्याचे सूतकसूचक काळे वस्त्र.
crash क्रॅश् v.i.--- कडाडणे. n.---धडधडाट, धडाका.
crash-barrier क्रॅश्-बॅरिअर् n.--- रस्त्यावरील वाहनांची अपघाती टक्कर रोखण्यास उभारलेला अडथळा/अडसर/कुंपण.
crate क्रेट् n.--- टोपली, सांकाठा.
crater क्रेटर् n.--- ज्वालामुखी पर्वताचे तोंड, (स्फोट इ. मुळे झालेला) मोठा खड्डा.
cravat क्रॅव्हॅट् n.--- गळेबन्द, कंठवस्त्र.
crave क्रेव्ह् v.t.---काकुळतीने मागणे, विनवणी करणे, -ची आशा लागणे, -ला खाखविणे, -ची खवखव सुटणे.
craven क्रेवन् n./a.--- भ्याड, भित्रा, गलितधैर्य, बुळा, भागूबाई, भेकड. ‘cry craven’ : शरणागति पत्करणे.
craving क्रेविंग् n.--- तीव्र अभिलाषा/लालसा.
crawfish क्रॉफिश् n.--- नदीतील खेकडा.
crawl क्रॉल् v.i.--- रांगणे, भुईसपट सरपटणे, रडतरडत जाणे, लपूनछपून जाणे. लाचारीने वागने. (सरपटणार्या प्राण्यांनी) गजबजलेले/भरलेले असणे. n.--- उराने चालणे. पालथे पडून व पाण्यावरून हात मारून पाय मागे झाडून पोहण्याचा एक प्रकार.