Mem-Met

Member मेम्बर् n.--- सभासद, आसामी, अवयव.
Membrane मेंब्रेन् n.--- शरीरावयवाचा पापुद्रासारखा भाग, पापुद्रा, पातळ कवच.
Memento ममेण्टो / मेमेण्टो n.--- = Souvenir, स्मृतिचिन्ह.
Memoir मेमॉयर् n.--- चरित्र, वृत्त, बखर, टांचण.
Memorable मेमोरेबल् a.--- स्मरणीय, प्रख्यात.
Memorabilia मेमोरॅबिलिया n.--- संस्मरणीय गोष्टी, लक्षणीय वैशिष्ट्ये.
Memorandum मेमोरॅन्डम् n.--- टांचण, टिपण, याद.
Memorial मेमोरिअल् n.--- स्मारक, टांचण, अर्जी. ad.--- स्मारक.
Memorialize मेमोरिअलाइझ् v.t.--- अर्ज करणे / अर्ज देणे.
Memory मेमरि n.--- आठवण, स्मरणशक्ति, स्मृति. संगणकांत स्मृतिबद्ध म्हणजे ग्रथित विशिष्ट माहिती. अशी माहिती ठेवणारे संगणकांतील उपकरण.
Menace मीनेस् v.t.--- धाक / भय घालणे. n.--- धाक.
Menage a trois मेनाझ् आ ट्र्वा n.--- एक जोडपे व एक तिसरे प्रीतिपात्र यांचे त्रिकूट.
Menagerie मिनॅजरि n.--- शिकारखाना, पशुसंग्रह.
Mend मेन्ड् v.t. and v.i.--- नीट करणे, बारा होणे, सुधारणे, दुरुस्त करणे. On the mend सुधारण्याच्या अवस्थेतील/अवस्थेत.
Mendacious मेन्डेशस् a.--- लबाड, खोटे बोलणारा, खोटा, असत्य, खोटारडा.
Mendacity मेन्डेसिटि n.--- लबाडी, खोटे भाषण.
Mendicant मेन्डिकन्ट् n.--- भिक्षेकरी, जोगी, गोसावी, बैरागी. a.--- भिकारी, भीकमाग्या.
Menial मीनिअल् n.--- घरकाम्या, चाकर.
Meningitis मेनिन्जाय्टिस् n.--- मेंदू, पाठीतील मज्जारज्जु यांच्या आवरणाचा दाह / सूज.
Meniscus मिनिस्कस् n.--- कोरीच्या आकाराची वस्तु. कोरीच्या आकाराचा, शरीर-संधि-प्रदेशातीळ, मऊ हाडाचा (उशीसारखा / गिरदीसारखा) भाग. (Pl. Menisci मिनिसाय्).
Menopause मेनपॉज् n.--- (विशिष्ट वयानंतर स्त्रीमध्ये) मासिक ऋतुस्त्राव थांबण्याची प्रक्रिया, रजोनिवृत्ति.
Menorrhagia मेनरेजअ n.--- ऋतुस्त्रावातिशय.
Mens rea मेन्स् रीअ n.--- (विधि(कायदा) संबंधित) अपराधी मन, अपराध-/पाप- भावना, दुष्ट मन / बुद्धि, लबाडी.
Menses मेन्सीझ् n.--- विटाळ, ऋतु, रज, पुष्प.
Menstrual मेन्स्ट्रुअल् a.--- प्रतिमहिन्याचा, विटाळसंबंधी. ‘Menstruation’ - विषयक /-चा.
Menstruate मेन्स्ट्रुएट् v.i.--- विटाळ वाहणे, विटाळशी होणे. (गर्भधारणा नसताना) रज किंव्हा ऋतु द्रव्य गर्भाशयांतून बाहेर स्त्राविणे.
Menstruation मेन्स्ट्रुएशन् n.--- गर्भधारणा नसताना स्त्रीच्या गर्भाशयांतून ऋतु-/राजा-द्रव्य बाहेर टाकण्याची मासिक प्रक्रिया. ऋतुस्त्राव, रजःस्त्राव.
Menstruous मेन्स्ट्रुअस् a.--- विटाळाचा, विटाळशी.
Mensurable मेन्स्ट्रुएबल् a.--- मोजता येण्याजोगा.
Mensuration मेन्शुरेशन् n.--- मोज, माप, महत्वमापन.
Mental मेन्टल् a.--- मानसिक. Mentally मेंटलि ad.--- मनांत.
Mention मेन्शन् v.t.--- उल्लेख करणे, सांगणे. n.--- उल्लेख.
Mentor मेण्टर् n.--- विश्वासपात्र / श्रद्धेय, मार्गदर्शक / सल्लागार.
Menu मेन्यू n.--- निवडीसाठी उपलब्ध खाद्यपदार्थांची / अन्य गोष्टींची जंत्री / यादी.
Mercantile मर्कन्टाइल् a.--- व्यापारी, व्यापाराचा.
Mercenary मर्सिनरि a./n.--- भाडोत्री (सैनिक इ.), मोलकरी, भाडेकरी, केवळ पैशांसाठी काम करणारा.
Mercer मर्सर् n.--- रेशमी / लोकरी कापड विकणारा.
Merchandize मर्चन्डाइझ् v.t.--- वयापारी करणे n.--- (विक्रेय) माल.
Merchant मर्चन्ट् n.--- व्यापारी, सौदागर, सावकार.
Merchantable मर्चन्टेबल् a.--- खपण्याजोगा, विकाऊ.
Merciful मर्सिफुल् a.--- दयाळू, दयावान, सदय.
Merciless मर्सिलेस् a.--- निर्दय, कठोर, निष्ठुर.
Mercurial मर्क्यूरियल् a.--- पाऱ्याच्या गुणधर्माचा, अत्यंत अस्थिर / चंचल.
Mercury मर्क्युरि n.--- पारा, बुधग्रह, दूत. (Abbr. Hg. From Hydrargyrum) (पहा: Quick-silver).
Mercy मर्सी n.--- दया, कृपा, अनुकंपा, करुणा.
Mere मियर् a.--- केवळ, फक्त, नुसता, अगदी.
Merge मर्ज् v.i.--- गडद होणे, बुडणे.
Meridian मेरिडिअन् n.--- माध्यान्ह, दोनप्रहर, बहार, कळस. a.--- दोनप्रहरचा, उच्चतम.
Merit मेरिट् n.--- पुण्य, गुण, योग्यता, लायकी, अपूर्व, संचित. v.t.--- पात्र / योग्य असणे.
Meritorious मेरिटोरिअस् a.--- लायक, पुण्यवंत.
Mermaid मर्मेड् n.--- जळमाणूस, मत्स्यकन्या.
Merrily मेरिलि ad.--- खुशीने, मौजेने, आनंदाने.
Merry मेरि a.--- आनंदी, खुषी, हास्यमुख.
Merry-go-round मेरि-गो-राउण्ड् n.--- फिरत्या चाकावर चढून गोल फिरवायचा खेळ. अशा खेळाचे साधन.
Merrymaking मेरिमेकिंग् n.--- हास्यविनोद, थट्टामस्करी.
Mesh मेश् n.--- जाळीची भोके, जालबंध. v.t.--- जाळ्यात धरणे.
Meslin मेस्लिन् n.--- धान्याची मिसळ, मिश्रान्न.
Mesmerize / Mesmerise मेझ्मराइझ् v.t.--- -ला भारून / मोडून टाकणे / मोहिनी घालणे, -ला खेचून घेणे / तीव्रपणे आकृष्ट करणे.
Mesmerism मेस्मरिझम् n.--- मोहिनी विद्या, संमोहनशास्त्र.
Mess मेस् v.i.--- एके ठिकाणी जेवणे. n.--- ठाव, पात्र, विचका, चिवडा, परवड, भिसी, हाल, फजिती, गोंधळ, घोळ.
Message मेसेज् n.--- निरोप, संदेश, खलिता.
Messenger मेसेन्जर् n.--- जासूद, निरोप्या, दूत.
Messiah मिसाइअ n.--- यहूदी (ज्यू) जमातीचा भावी तारणकर्ता राजा. येशू, ख्रिस्त. विशिष्ट कार्यास वाहून घेतलेला लोकनेता.
Messianic मिसायनिक् a.--- Messiah वर श्रद्धा ठेवणारा.
Messmate मेस्मेट् n.--- सहभोजी, पंक्तिभाऊ.
Messuage मेस्वेज् n.--- घरवाडी.
Metabolic मेटबॉलिक् a.--- ‘Metabolism’ -चा / -संबंधीचा /-स्वरूपाचा.
Metabolism मेटॅबलिझम् n.--- अन्न द्रव्याचे जीवद्रव्यात रूपांतर. (=constructive metabolism = Anabolism) आणि याउलट प्रक्रिया (जीवप्राय अवस्थेतील द्रव्याचे (protoplasm चे) तदितर द्रव्यात रूपांतर =Destructive Metabolism = Catabolism = Katabolism). या दोन्ही प्रक्रियांचे शरीरांतील नैसर्गिक संयुक्त संचालन.
Metacarpus मेटाकार्पस् n.--- हाताचा चवडा / तळवा.
Metal मेटल् n.--- धातु. v.t.--- खडी घालणे, धातूने मढविणे.
Metallic मेटॅलिक् a.--- धातूसंबंधी, धातूचा केलेला. धातुयुक्त, धातूत्पादक. जळजळीत, तिखट, झोंबणारा, तीक्ष्ण (चव, अभिव्यक्ति, इ.).
Metalliferous मेटलिफेरस् a.--- धातुजनक, धातु उत्पादक.
Metalline मेटॅलिन् a.--- धातूचा, धातूच्या धर्माचा.
Metallist मेटॅलिस्ट् n.--- धातुपारखी, धातुपरीक्षक.
Metallography मेटलोग्रॅफि a.--- धातुवर्णन विचार.
Metalloid मेटलॉइड् n.--- अर्धधातु, धातुसदृश द्रव्य.
Metallurgist मेटालर्जिस्ट् n.--- धातुशोधक.
Metallurgy मेटालर्जी n.--- धातुशोधन विद्या.
Metamorphose मेटॅमॉर्फोस् v.t.--- -चे देहांतर/रूपांतर करणे.
Metamorphosis मेटमॉर्फसिस् n.--- देहान्तार, रूपांतर, पूर्ण परिवर्तन.
Metaphor मेटफोर् n.--- रूपक, अलंकार, उपमा.
Metaphoric मेटॅफोरिक् a.--- लाक्षणिक, रूपकात्मक. = Metaphorical.
Metaphysics मेटफिजिक्स् n.--- दृश्य सृष्टीच्या मुळाशी असलेल्या सूक्ष्म तत्वांचा विचार. मूलतत्वविचार.
Metayer मिटेयर् n.--- अर्धेलीने शेती करणारा.
Mete मीट् v.t.--- मोजणे, मापणे. n.--- माप, मर्यादा.
Mete out मीट् आऊट् v.i.--- मोजून देणे/वाटणे. (सजा, पारितोषिक इ.) देणे.
Metempsychose मेटेमप्सिकोझ् v.t.--- (जीवास) एका देहातून दुसऱ्या देहांत घालणे. पुनर्जन्म देणे, नवीन जन्मास घालणे.
Metempsychosis मेटेमप्सिकोसिस् n.--- (जीवाचा मृत्यूनंतर) अन्यकायप्रवेश. पुनर्जन्म.
Meteor मीटिआॅर् / मीटिअर् n.--- उल्का, तारा, दिव्य, उत्पात, उल्कोन्मेष.
Meteoric मीटिआॅरिक् a.--- वेग, आकस्मिक अल्पजीवी उन्मेष इ. बाबतीत उल्केसारखा.
Meteorite मीटिअराइट् n.--- भूमीवर पडलेली उल्का.
Meteoroid मीटिअ्रॉइड् n.--- पृथ्वीच्या वातावरणात आल्यास ‘उल्का’ होणारा सूर्यकक्षेतील गोलक.
Meteorology मीटिअरॉलजी n.--- पृथ्वीच्या वातावरणाचे, विशेषतः हवामानाचे, शास्त्र.
Meter मीटर् n.--- मापक, मापणारा.
Method मेथड् n.--- क्रम, पद्धति, रीत, व्यवस्था.
Methodical मेथॉडिकल् a.--- व्यवस्थेचा, क्रमाचा.
Methodically मेथॉडिकलि ad.--- क्रमाने, व्यवस्थेने.
Methodism मेथॉडिझम् n.--- कर्मठपणा, कर्मठ स्वभाव.
Methodist मेथॉडिस्ट् n.--- कर्मठ, कर्मशील, प्रेमनिष्ठ.
Methodize मेथडाइज् v.t.--- व्यवस्थित करणे, क्रम बांधणे.
Methought मिथाट् int.--- मला वाटले!
Methuselah मिथ्यूझेल् proper noun.--- बायबलात उल्लेखिलेला ९६९ वर्षांचे आयुष्य लाभलेला एक प्राचीन कुलप्रमुख.
Metier मेटियर् n.--- धंदा, व्यवसाय. विशेष प्रावीण्याचे क्षेत्र / विषय.
Metonymy मिटॉनिमि n.--- लक्षण.
Meter, metre मीटर् n.--- छंद, वृत्त, पद्य. एक लांबी मोजण्याचे माप. ३९.३७ इंच.
Metri causa (= for the sake / reason of metre) (i.e. for prosodic facility) वृत्ताच्या / छंदाच्या कारणासाठी / सौकर्यासाठी / सोयीसाठीं).
Metrical मीट्रिकल् a.--- छंद शास्त्राचा, पद्यरूप.
Metropolis मेट्रोपोलिस् n.--- मुख्य शहर, राजधानी.
Mettle मेट्ल् n.--- स्वभाव. तेज, ओज, पाणी.
Mettled मेटल्ड् a.--- पाणीदार, तापट, तीव्र, रंगेल.