Reg-Rei

Regain रिगेन् v.t.--- पुनः मिळविणे, पावणे, पोहोचणे.
Regal रिगल् a.--- राजकीय, राज्यासंबंधी, राजाचा.
Regale रिगेल् v.t.--- मेजवानी करणे, समाधान करणे. संतोषविणे, सुखविणे, तृप्त करणे.
Regalia रिगेलिया n.--- राजचिन्हे, राजलक्षणे.
Regality रिगॅलिटि n.--- बादशाही, नृपत्व, राजपद.
Regard रिगार्ड् v.t.--- लक्ष्य देणे, वागविणे, संबंध असणे, टेहेळणे, ऐकणे, मान राखणे. n.--- लक्ष्य, मान, भीड, गणना, आदर, दृष्टि, संबंधी.
Regarding रिगार्डिंग् prep.--- संबंधी, विषयी.
Regardless रिगार्ड्लेस् a.--- बेफिकीर.
Regency रीजन्सि n.--- राजप्रतिनिधिमंडळ, अंमल.
Regenerate रीजनरेट् v.t.--- पुनः उत्पन्न करणे, पुनर्जन्म देणे. a.--- पुनर्जात, पुन्हा उत्पन्न झालेला.
Regeneration रीजनरेशन् n.--- पुनर्जन्म, पुनर्घटना.
Regent रीजन्ट् n.--- राजाचा प्रतिनिधि, अधिपति. राज्यकर्त्यांच्या बाल्यावस्थेत / अनुपस्थितीत / अक्षमतेत राज्यकारभार पाहणारी व्यक्ति.
Regime रेजिम् n.--- पथ्य, व्यवस्था, पद्धति. = Regimen.
Regiment रेजिमेंट् n.--- फलटण, सेवा विभाग. V.t.--- फलटण करणे.
Region रीजन् n.--- देश, प्रांत, मंडळ, दिशा, भाग.
Register रजिस्टर् v.t.--- नोंदणे, दफ्तरी दाखल करणे. n.--- दफ्तार, दाखला, लेख.
Registrar रजिस्ट्रार् n.--- दफ्तरदार, नोंदणी अधिकारी, निबंधक. विद्यापीठाचा (म्हणजे युनिव्हर्सिटीचा) कुलसचिव. (हिंदी : पंजीयक).
Registration रजिस्ट्रेशन् n.--- दफतरात नोंदणे, लिहून ठेवणे.
Regress रिग्रेस् n.--- परामति, अधोगति, ऱ्हास, अवनति. v.--- परागति करणे, ऱ्हास पावणे, मागे जाणे, घसरणे.
Regression रिग्रेशन् = Regress (n.).
Regressive रिग्रेसिव्ह् a.--- अवनतिकारक, अवनतीच्या स्वरूपाचा. र्हासकारी, ऱ्हासात्मक, प्रतिगामी, अप्रगामी.
Regret रिग्रेट् v.t.--- -बद्दल दुःख / पश्चाताप करणे, रडणे. n.--- खेड, हळहळ.
Regular रेग्युलर् a.--- कायदेशीर, नियमित, बेटाचा, हिशेबी, बराबर.
Regularity रेग्युलॅरिटि n.--- कायदेशीरपणा, बेत, व्यवस्था, शिस्त, नियमितपणा.
Regulate रेग्युलेट् v.t.-- शिस्त लावणे, नियमित करणे.
Regulation रेग्युलेशन् n.--- कायदा, व्यवस्था, ठराव.
Regulus रेग्युलस् n.--- मघा, नक्षत्र, हिणकस धातु.
Regurgitate रिगSर्जिटेट् v.t.--- बाहेर / मागे / उलट दिशेस फेकणे / ओकणे. उसळविणे.
Regurgitation रिगSर्जिटेशन् n.--- बाहेर / मागे / विरुद्ध दिशेस आलेली उसळी / उलटी / भरती. वमन, उलटी.
Rehabilitate रीहबिलिटेट् v.t.--- -ची दुषकीर्ति दार करणे, -चे नाव / यश पुनः स्थापित करणे. पुनः प्रतिष्ठित करणे. (आजार, तुरुंगवास इ. नंतर) आयुष्यात मार्गी लावणे / उचित काम, धंदा इ. मध्ये स्थापित करणे.
Rehabilitation रीहबिलिटेशन् n.--- एखाद्याच्या थोरपणाची स्थापना, पुनःप्रतिष्ठापन.
Rehearsal रिहर्सल् n.--- पाठ म्हणणे, रंगीत तालीम, पूर्वाभ्यास.
Rehearse रिहर्स् v.t.--- पाठ म्हणणे, तालीम / अभ्यास / उजळणी करणे.
Reify रीइफाय् v.t.--- वस्तु म्हणून विचारात घेणे.
Reign रेन् v.i.--- सिंहासनारूढ असणे, वर्चस्व असणे, राज्य करणे. n.--- राज्य, कारकीर्द, सत्ता, वर्चस्व, राज्याधिकार.
Reiki रेकी n.--- स्पर्शाने रोग बरा करण्याचे तंत्र / शास्त्र. स्पर्श-चिकित्सा.
Reimburse रीइम्बर्स् v.t.--- भरती / भरणा करणे.
Rein रेन् n.--- लगाम, प्रगह; नियंत्रण, विनिग्रह. लगामाची दोरी, अनीन. Draw reins --- लागामणे थांबविणे. Give (one) rein(s) / give the rein(s) to --- लागामांतून / नियंत्रणातून मोकळीक देणे. v.--- लगाम घालणे, लगामात ठेवणे, नियंत्रणात ठेवणे. (from) : (पासून) रोखणे. (In) : (लगाम चालवून) मर्यादेत आणणे. (up) :(लगामाच्या साहाय्याने) खेचणे. (back) : (लागामाने) मागे खेचणे / येणे. लगाम धारण करणे / स्वीकारणे.
Reindeer रेन्डिअ(र्) n.--- उत्तरध्रुवाजवळील हिमाच्छादित प्रदेशांतील सांबराच्या जातीचा (फाटेदार शिंगांचा) एक प्राणी. (Pl. Reindeer / Reindeers).
Reins रेन्स् n.--- कंबर, कटि, पाश्चाद्भाग, मन.
Reinstate रीइन्स्टेट् v.t.--- फिरून नेमणे, पुनः अधिकार देणे, पूर्वपदावर आणणे.
Reiterate रीइटरेट् v.i.--- फिरफिरून करणे / बोलणे, उगाळणे.
Reiteration रीइटरेशन् n.--- पाठांतर, उजळणी, उगाळणे.