Sut-Swi

Sutlor सट्लर् n.--- लष्कराबरोबर फिरणारा वाणी.
Swab स्वॅब् v.t.--- बोळक्याने पुसणे. n.--- बोळका, झाडू.
Swadle स्वॅडल् v.t.--- गुंडाळणे, वेष्टिणे. n.--- मुलाचे वेष्टण.
Swag स्वॅग् v.i.--- हालणे, हिसके बसणे.
Swagger स्वॅगर् v.i.--- घमेंड मारणे, उद्दामपणाने / दिमाखाने वागणे / चालणे. बढाई मारणे. n.--- घमेंड, औद्धत्य, उद्दामपणा. a.--- ऐटदार, दिमाखदार, डौलदार, ‘ऐट, दिमाख, डौल, घमेंड दाखविण्यास धारण केलेला’ अशा अर्थी समासाचे पूर्वपद. (उदा.: Swagger-stick).
Swahili स्वहीली n.--- आफ्रिकाखंडाच्या पूर्वकिनाऱ्यालगतच्या झांझीबार-नामक प्रदेशांतील व आसमंतातील ‘बअantu-नामक समाज. त्यांची भाषा. a.--- स्वाहिली लोक-/भाषा - विषयक.
Swane स्वेन् n.--- गावंढळ तरुण, शेतकरी.
Swallow स्वॉलो v.t.--- गिळणे, डल्ला मारणे, खाणे, गडप करणे, ग्रासणे, जिरवणे. n.--- गळा, अन्नमार्ग, पाकोळी, चव, रुचि, आवड.
Swamp स्वॅम्प् n.--- पाण्याची जागा, दलदल.
Swan स्वॉन् n.--- राजहंस पक्षी, हंस.
Swanky स्वँकी a.--- भपकेबाज, दिखाऊ, नाटकी दिमाख दाखविणारा, ढोंगी ऐटबाज.
Sward स्वॉर्ड् n.--- गवताची जमीन.
Swarm स्वॉर्म् v.i.--- घों घों करणे, गजबजणे, गर्दी असणे. n.--- गर्दी, सुळसुळाट, थवा.
Swart = Swarthy
Swarthy स्वार्दी a.--- काळसर, कृष्ण, काळवट.
Swashbuckling स्वॉश्बक्लिंग् a.--- घमेंडखोर धूर्त, पोकळ वल्गना करणारा (लफंग्या), बढाईखोर.
Swat स्वॉट् n.--- थप्पड, ठोसा, फटका. कसून अभ्यास करणारा / व्यासंगी माणूस. v.--- कसून अभ्यास करणे.
Swath स्वॉथ् n.--- नियोजित कापणीच्या पल्ल्यात / कक्षेत येणारा गवताचा पट्टा. (विध्वंसाचे / विनाशाचे) क्षेत्र, आवाका, पट्टा. = Swathe (n.)
Swathe स्वेद् v.t.--- वेष्टणे, गुंडाळणे. n.--- वेष्टण, पट्टा.
Sway स्वे v.i.--- झुकणे, अम्मल करणे, मन वळवणे, वहिवाट n.--- अंमल, कल, ओढा, तोल.
Swear स्वेअर् v.i.--- शपथ घेणे / वाहणे, शपथेवर साक्ष देणे. Swear off: शपथपूर्वक टाकणे / सोडणे.
Sweat स्वेट् v.i.--- घाम येणे / आणणे, निचरणे. दबावाखाली / पिळवणूक करणे / करविणे. n.--- घाम, निचरा, पाझर. परिश्रम, मेहनत, कष्ट.
Sweep स्वीप् v.t.--- झाडणे, वाहवणे, सपाट्याने जाणे, डौलाने मिरवणे. जलादींमध्ये मग्न होणे, त्यांनी वेधले जाणे / आकारांत होणे; अशा रीतीने आकारांत करणे; (आर्थिक बाबतीत) कफल्लक करून टाकणे. n.--- झपाटा, (तलवार इ. चा) वार, फटका.
Sweeper स्वीपर् n.--- भंगी, झाडणारा, हलालखोर.
Sweepstake स्वीप्स्टेक् n.--- जुगार, लॉटरी.
Sweet स्वीट् a.--- गोड, चांगला, मिठा, मधुर.
Sweetmeat स्वीट्मीट् n.--- मिठाई, पेढेबर्फी.
Sweetness स्वीट्नेस् n.--- गोडपणा, गोडी.
Swell स्वेल् v.t.--- फुगणे, सुजणे, तुंबणे, बळावणे, ताठणे. n.-- सूज, फुगारा, चढ, उठाव, उसळी.
Swelter स्वेल्टर् v.i./ v.t.--- उष्णतेने व्याकूळ होणे, घर्मार्त होणे, घामाने डबडबणे; भाजून काढणे, उन्हाने व्याकूळ करणे.
Swerve स्वर्व्ह् v.i.--- चढणे, ढळणे, झुकणे. एकदम बाजूस वळणे.
Swift स्विफ्ट् a.--- जलद. Swift footed --- जलद चालणारा.
Swiftly स्विफ्ट्लि ad.--- जलदीने, सत्वर.
Swig स्विग् n.--- मोठा घोट.
Swill स्विल् n.--- उरलेसुरले, उष्टेखरकटे यांचा काला; आंबवण, रबडा.
Swim स्विम् v.i.--- पोहणे, पोहून जाणे, तरंगणे. n.--- पोहण्याची क्रिया. जगरहाटी, व्यवहार. To be in the swim: जगरहाटीने चालणे, जगाच्या व्यवहारांशी जुळवून घेणे. जगरहाटी समजून घेणे.
Swimmer स्विमर् n.--- पोहणारा.
Swimming स्विमिंग् n.--- पोहणे, घेरी, पेंवणी.
Swimmingly स्विमिंग्ली ad.--- धडकून.
Swindle स्विण्डल् v.t.--- (संपत्ति) लुबाडून घेणे. n.--- लबाडी, फसवणूक.
Swine स्वाइन् n.--- डुक्कर.
Swing स्विंग् v.i.--- झोके घेणे, पेलणे. n.--- झोका, झोपाळा, रहाटपाळणा, फेंक, हेलकावा, वेग, ओघ, स्वैराचार.
Swipe स्वाइप् n.--- (जोरदार) टोला, ठोसा, तडाखा. Take a swipe at : -ला ठोसा लगावणे. ‘Swipe at: v.t. / v.i.--- ‘Swipe’ हाणणे.
Swirl स्वSर्ल् n.--- (पाण्याचा / द्रवाचा / कणांचा / वायुरूप द्रव्याचा) (गोल फिरणारा) भोवरा. अशा भोवऱ्याची गोलाकार गति. अशा भोवऱ्यासारखे वळण / गांठ. v.t.--- गोलाकार गति देणे. भोवऱ्यासारखे फिरविणे. v.i.--- भोवऱ्यासारखे फिरणे.
Switch स्विच् v.t.--- चमकावणे. बदलणे, स्थानांतरित करणे, कळ दाबून विद्युतप्रवाह सुरू करणे (switch on) किंवा थांबविणे (switch off). n.--- छडी, कांठीं. बदल, स्थानांतरण. वीजप्रवाहात केलेला बदल, असा बदल करण्याची कळ. शेपटीच्या टोकाचा गोंडा.
Swivel स्विव्हल् n.--- स्थिरभागाभोवती चा भाग फिरता असलेली (यंत्र-) रचना. v.--- (‘swivel’ रचनेत) गोल फिरणे, गिरक्या घेणे.