dud-dut

dudine ड्यूडीन् n.--- ‘dude’ चे स्त्रीलिंग.
dudish ड्यूडिश् a.--- नखरेल.
duel ड्यूएल् n.--- दोघांची लढाई/कुस्ती, द्वंद्व.
duellist ड्यूएलिस्ट् n.--- द्वंद्वयोद्धा, द्वंद्वी.
duet ड्यूएट् n.--- जोडीचे गाणे/बजावणे.
duffer डफ(र्) n.--- कुचकामाचा, गलथान मनुष्य.
dug डग् n.--- सळ, आंचळ, आंसड.
dull डल् a.--- सुस्त, मंद, उदास, बोथट, जड.
duly ड्यूलि ad.--- योग्य रितीने, यथोचित.
dumb डम्ब् a.--- मुका.
dumbbells डम्बेल्स् n.--- मुदगल, डम्बेल.
dumbfound डम्फाउंड् v.t.--- थक्क करणे, आश्चर्यचकित करणे, विस्मित करणे.
dummy डमि n.--- मुका, मुका माणूस.
dump डम्प् n.--- उदासपणा, उदासी. v.t.--- -ला खाली आपटणे, (उकिरड्यावर) टाकून देणे. v.i.---पडणे, आपटणे.
dumpster डम्प्स्टर् n.--- केरकचऱ्याचा डबा/डबडे. v.---
dun डन् v.t.--- तगादा करणे. n.--- तगादा करणारा.
dunce डन्स् n.--- मूर्ख, दगड, ठोंब्या, अक्षरशत्रु.
dunderhead डण्डर्हेड् n.--- अतिमूर्ख, महामूर्ख, मूर्खशिरोमणि.
dung डंग् v.t.--- खात घालणे. n.--- गू, विष्टा, मल, शेण.
dungeon डन्जन् n.--- अंधारकोठडी, अंधारकोंडी.
dung-heap डंग्हीप् n.--- उकिरडा, नीच दशा, घाण.
duo ड्यूओ (द्वित्ववाचक उपसर्ग) n.--- (pl. duos) जोडी, युगल, द्वंद्व. दोघांनी मिळून करण्याची कृति (गाणे, वादन इ.).
duodenum ड्यूअडीनम् n.--- (pl. Duodena, Duodenums) पाठीचा कणा असणार्या प्राण्यांतील) (अन्नमार्गात जठराच्या नंतर येणारा लहान आतड्याचा सुरवातीचा भाग जेथे पित्त व स्वादुपिंडरस येऊन पडतो.
duodenal ड्यूअडीनल् a.--- duodenum चा/शी संबंधित.
dupe ड्यूप् v.t.--- फसविणे. n.--- भोळा, भळू, भाबडा, सहज फसला जाणारा मनुष्य.
duple ड्यूपल् a.--- दुहेरी, दुप्पट.
duplicate ड्युप्लिकेट् n.--- (दुसरी) (मुळासारखी) प्रतिलिपि, प्रतिकृती/नक्कल/प्रतिबिंब/प्रत. मुळाइतकीच वैध व मान्य/पुरावा म्हणून ग्राह्य प्रत/प्रतिकृति. a.--- हुबहूब समान, प्रतिकृतिभूत, प्रतिबिंबभूत, जुळा, जोडीचा, जोड-/प्रती- (उदा. जोडकिल्ली, प्रतीकिल्ली, जुळी किल्ली), मुळाइतकीच मान्य/ग्राह्य/वैध/कायदेशीर. v.t.--- -ची (दुसरी) नक्कल/प्रतिकृति/प्रत करणे.
duplicity डूप्लिसिटि n.--- टिकाऊपणा, दुहेरीपण, द्वित्व, दुतोंडीपणा, दुरंगीपणा.
durability ड्युरेबिलिटि n.--- टिकाऊपणा, स्थिरता.
durable ड्युरेबल् a.--- टिकाऊ, स्थिर, टिकण्याजोगा.
duration ड्युरेशन् n.--- कालाची मर्यादा, कालमान.
during ड्युरिंग् prep.--- मध्ये, आंत, पर्यंत.
dusk डस्क् a.--- काळसर, अंधारीचा. n.--- काळोखी, अंधारी, तिन्हीसांज.
dust डस्ट् v.t.--- धूळ टाकणे, धूळ काढणे. n.--- धूळ, धुरळा, रज, चूर्ण, गर्दी, पीठ.
dustcart डस्टकार्ट् n.--- केराची गाडी.
duster डस्टर n.--- धूळ झाडण्याचा रुमाल.
duteous ड्यूटिअस् a.---
dutiable ड्यूटिएबल् a.--- जकात/कर बसविण्याजोगा.