saf-sal

safe सेफ् a.--- निर्भय, सुरक्षित, विश्वसनीय. n.--- तिजोरी.
safeguard सेफ्गार्ड् n.--- संरक्षण, आसरा, कौल.
safely सेफ्लि ad.--- निर्भयतेने, खुशालीने.
safety सेफ्टि n.--- सुरक्षितपणा, आश्रय, धडपणा.
safflower सॅफ्लाउअर् n.--- एक वनस्पति जिच्या फुलांची पाकळ्यांपासून लाल रंग व बियांपासून जळणाचे तेल मिळते. (Carthamus tinctorius).
saffron सफ्रन् a.--- केशराच्या रंगाचा. n.--- केशर, कुंकुम.
saft सॅफ्ट् a.--- स्कॉटलंड मध्ये ‘soft’ च्या समानार्थी वापरला जाणारा शब्द.
sag सॅग् v.i.--- ढिला / सैल पडणे, गाळून जाणे, सैलावणे.
saga सागा n.--- (संस्मरणीय) इतिहासकथा, विस्तृत वृत्तांत. लीळाचरित.
sagacious सॅगॅशस् a.--- शहाणा, चतुर, धूर्त, तैलबुद्धी.
sagacity सॅगॅसिटि n.--- शहाणपणा, चातुर्य, हुशारी.
sage सेज् n.--- ऋषि, ज्ञानीपुरुष. a.--- शहाणा, ज्ञानी, चतुर, गंभीर.
sageness सेज्नेस् n.--- शहाणपणा, चातुर्य.
sagittal सॅजिटल् a.--- बाणासारखा, बाणाचा.
sagittarius सॅजिटेरिअस् n.--- तिरंदाज, धनुरास.
sago सॅगो n.--- साबूदाणा, साबूचे तांदूळ.
said सेड् p.p.a.--- म्हटलेला, पूर्वोक्त.
sail सेल् n.--- जलप्रवास, जलपर्यटन, गलबत, तारू, शीड. v.i.--- गलबतातून जाणे, पाण्यातून जाणे, हाकारणे.
sailor सेलर् n.--- खलाशी, नाविक, दर्यावर्दी.
saint सेन्ट् n.--- साधू, संत.
saintess सेन्टेस् n.--- साध्वी.
saintly सेन्ट्लि a.--- साधूसारखा.
sake सेक् n.--- कारण. For the sake of --- करितां, साठीं.
salacious सलेशस् a.--- कामी, कामुक, स्त्रीलंपट, विषयप्रधान.
salacity सलेसिटि n.--- स्त्रीलंपटपणा, कामुकता.
salad सॅलड् n.--- कच्च्या भाजीपाल्याचे तोंडीलावणे, कोशिंबीर. हिरवा / कच्चा भाजीपाला.
salad-days n.--- अपरिपक्व / अविवेकी / कच्चे तरुण वय. गद्धेपंचविशी.
salamander सॅलमँड(र्) n.--- आगीचा कांही परिणाम ना होणारा एक काल्पनिक / पौराणिक प्राणी. सरड्यासारखा दिसणारा एक भूमीवर व पाण्यांत राहणारा प्राणी.
salmon सॅ(ल्)मन् n.--- नारिंगी रंगाचे मांस असलेला एक मासा. नारिंगी रंग.
salary सॅलरि n.--- पगार, वेतन, तनखा.
sale सेल् n.--- विक्री, मागणी, खप. On sale --- विकाऊ.
saleable सेलेबल् a.--- खपण्याजोगा.
salesman सेल्स्मन् n.--- विक्री करणारा.
salient सेलिअण्ट् a.--- (विशिष्ट ठिकाणापासून वर चढलेला वा बाहेर निघालेला (उंचवटा, सुळका इ.). उठून दिसणारा, डोळ्यांत भरणारा, ठळक, ठसठशीत. n.--- उंचावलेला / पुढे आलेला / बाजूंस पसरलेला भाग (तटबंदी, मोर्चा, भूप्रदेश इ.).
saline सलाइन / सेलाइन् / सेलीन् a.--- खारा, मिठाचा. n.--- खारा झरा.
saliva सलायव्हा n.--- थुंकी, लाळ, थुंका.
salivate सॅलिव्हेट् v.t.--- तोंड आणणे / देणे. लाळ गाळणे. लाळ उत्पन्न करणे.
sallow सॅलो a.--- फिकट. v.t.--- निस्तेज करणे.
sallowness सॅलोनेस् n.--- काळवंडी, पिकुटपणा.
sally सॅलि v.i.--- छापा घालण्यासाठी निघणे. n.--- झडप, पटकन बाहेर येणे / जाणे, प्रहार, चुटका.
salon सलाँ / सॅलॉन् n.--- कक्ष, मंदिर, महाल, (प्रतिक्षितांचे) संमेलन, मैफिल, मेळावा.
saloon सलून् n.--- सभागृह, संमेलन कक्ष, (सभा-)मंडप.
salt सॉल्ट् v.i.--- मीठ घालणे, खारट करणे. n.--- मीठ, लवण, क्षार. अम्लांतील हायड्रोजनऐवजी पूर्णतः / अंशतः अन्य मूलद्रव्य आणून बनविलेले संयुग. a.--- खारट. salt away/down v.--- बाजूला काढून साठवून ठेवणे. Salt down --- निर्भत्सना करणे, हजेरी घेणे, झाडणे.
saltern सॉल्टर्न् n.--- मिठागर.
saltless सॉल्ट्लेस् a.--- अळणी.
saltmine सॉल्ट्माइन् n.--- मिठाची खाण.
saltpetre सॉल्ट्पीटर् n.--- सोरा, सोरामीठ.
salty सॉल्टी a.--- खारट, खारा, क्षारयुक्त.
salubrious सलूब्रिअस् a.--- पुष्टिप्रद, पोषक. समाधानकारक, चांगल्यापैकी.
salubrity सॅल्युब्रिटि n.--- निरोगीपणा, पोषकता.
salutary सॅल्यूटरी a.--- पथ्यकर, शरीरहितकारक. रोग-/दोष- हारी, हित, पथ्य.
salutation सॅल्युटेशन् n.--- नमस्कार, सलाम, जोहार, कुशलप्रश्न, रामराम.
salute सॅल्यूट् v.t.--- नमस्कार / सलाम करणे. n.--- नमस्कार.
salvage सॅल्वेज् आग, नौकाभंग इत्यादि संकटातून वाचविण्याची किमया/कृति. संकटातून वाचविलेला माल/संपत्ति. संकटातून स्वेच्छेने वाचविणाऱ्यांना दिलेली भरपाई.
salvation सॅल्व्हेशन् n.--- त्राण, संरक्षण, उद्धार, बचाव.
salve साल्व्ह् / साव्ह् / सॅल्व्ह् n.--- लेप, मलम. शामक द्रव्य / गोष्ट. v.t.--- मलम लावणे.