Fio-Fit

Fiord / Fjord फिआॅर्ड / फ्याॅर्ड n.--- दुतर्फा, उंच कड्यांमधील चिंचोळी समुद्र खाडी. ‘Canyon’ / ‘Canon’
Fir फर् n.--- देवदार, पाइन्(pine) जातीचा एक वृक्ष
Fire फायर् n.--- विस्तव, अग्नि, शेकोटी, गोळ्याचा मारा, उत्साह, तेज, त्वेष. v.t. & v.i.--- आग लावणे, चेव आणणे, डागणे, पेटणे, बार सोडणे.
Fire [To breathe fire and brimstone] see ‘brimstone’
Firebasket फायर्बास्केट् n.--- टेंभा, मशाल, हिलाल.
Firebrand फायऱ्ब्रँड् n.--- पेटती वस्तु, अंगार, कोलीत, आगलाव्या, संघर्षकारी.
Fire-engine फायर्एन्जिन् n.--- आगीचा बंब.
Firefly फायर्फ्लाय् n.--- काजवा.
Firelock फायर्-लॉक् n.--- चापाची बंदूक.
Firenew फायर्न्यू n.--- उजळ, चकमकीत.
Fireplace फायर्प्लेस् n.--- चूल.
Fireproof फायर्प्रूफ् n.--- आग न घेणारा, न जळणारा.
Firework फायर्वर्क् n.--- नळे, चंद्रज्योती वगैरे दारू.
Firing फायरिंग् n.--- मारा, गोळीबार, भडीमार.
Firm फर्म् a.--- कठीण, खंबीर, गच्च, दृढ, जोराचा, घट्ट.
Firmament फर्मामेण्ट् n.--- मेघमंडळ, आकाश.
Firmly फर्मली ad.--- धैर्याने, निग्रहपूर्वक.
First फर्स्ट् a.--- पहिला, प्रथम ad.--- अगोदर, आधी.
Firstborn फर्स्टबॉर्न् a.--- प्रथम जन्मलेला, ज्येष्ठ.
Firstfloor फर्स्ट्फ्लोअर् n.--- माडी, फरा, पहिला मजला.
Firstling फर्स्ट्लिंग् n.--- पहिल्या विणीचा - वेताचा.
Firth फर्थ् n.--- खाडी.
Fiscal फिस्कल् a.--- सरकारी तिजोरी संबंधी, सरकारकडे कर, कर्ज, शुल्क इ. रूपांनी साठणाऱ्या पैशासंबंधीचा, n.--- हिशेबाचें वर्ष.
Fish फिश् v.t.--- मासे पकडणे, (पाण्यांत इ.) ०ला शोधणे धुंडाळणे. n.--- मासा, मच्छ. Fish out (पाण्यातून इ.) ०ला धुंडून बाहेर काढणे.
Fisherman फिशर्मन् n.--- कोळी, धीवर.
Fishery फिशरि n.--- मासे धरण्याची जागा.
Fishhookफिश्हुक् n.--- मासे धरण्याचा गळ.
Fishmonger फिश्मॉंगर् n.--- मासेविक्या
Fishnet फिश्नेट् n.--- मासे धरण्याचे जाळे.
Fishi फिशि a.--- माशाचा, माशासारखा, माशाचा वास मारणारा, संशयास्पद.
Fish-pond फिश् पॉण्ड् n.--- मेळाव्यात सामिल व्यक्तींनी परस्परांच्या व्यक्तिमत्वांच्या वैशिष्ट्यांतील रूपके, म्हणी, काव्यपङ्क्ति इत्यादि द्वारा परस्परांवर विनोदी, शेरामारी करण्याच्या टोमणे देण्याच्या कार्यक्रमातील शेरा किंवा टोमणा.
Fissile फिसाइल् a.--- स्फोटप्रवण, भेदशील, फुटीर.
Fission फिशन् n.--- फुटण्याची / छिन्न (भिन्न) होण्याची प्रक्रिया, स्फोट, भेद, फूट.
Fissure फिशर् n.--- चीर, भेग, फट, तडा. v.t.--- विभागणे.
Fist फिस्ट n.--- मूठ, मुष्टी, मुष्टिमोदक.
Fisticuffs फिस्टिकफ्स् n.--- धप्पाधप्पी, मुष्टामुष्टी.
Fistula फिस्ट्यूला n.--- नाडीव्रण, भगेन्द्र, एखाद्या अवयवातील नलिकारूप विकृत वाढ. (काहीं प्राण्यांतील) नलिकारूप अवयव.
Fit फिट् a.--- योग्य, लायक. n.--- झटका, आवेशस, आवेग, लहर, पाळी, जवळीक, नाते. v.t.--- लायक करणे, बेतणे, जमविणे, सज्ज करणे, शोभणे.
Fitful फिट्फुल् a.--- झटक्यांनी भरलेली, अनपेक्षित / अचानक घटनायुक्त, खळबळयुक्त, अस्वस्थ / अस्थिर संथपणाचा अभाव असलेला.
Fitter फिटर् n.--- यंत्र वगैरे जोडून बसविणारा.