saw-sce

saw सॉ v.i.--- करवतीने कापणे. n.--- करवत. म्हण, न्याय.
sawdust सॉडस्ट् n.--- भुसा, भुसकट.
saxophone सॅक्सफोन् n.--- फुंकून वाजवायचे सनईसारखे वाद्य. एका प्रकारची पुंगी / पिपाणी.
say से v.t.--- म्हणणे, बोलणे.
saying सेइंग् n.--- बोलणे, म्हण.
scab स्कॅब् n.--- खपली, खवडा, खांडूक / खांडुक.
scabby स्कॅबी a.--- खबड्या, नीच.
scabbard स्कॅबर्ड् n.--- शस्त्र ठेवण्याचे म्यान. v.t.--- (शस्त्र) म्यानांत ठेवणे.
scabies स्केबीज् n.--- शरीरावर खाज उत्पन्न करणारा एक चर्मरोग, खरूज.
scaffold स्कॅफोल्ड् / स्कॅफल्ड् v.t.--- माळा बांधणे. इमारती-कामाला ‘scaffolding’ उभारणे / लावणे. n.--- माळा. देहान्तशासन देण्याचा कट्टा / मंच / ओटा. वधमंच. =scaffolding. The scaffold --- देहान्तशासन.
scaffolding स्कॅफोल्डिंग् / स्कॅफल्डिंग् n.--- बांधकामाला लागून कामकऱ्यास उभे राहण्यास / सामान ठेवण्यास तात्पुरते उभारलेले मंचजाल / परांची मालिका / मंचगुंफा.
scale स्केल् v.t.--- शिडी लावून चढणे, तोलणे, पायरीने चढणे. n.--- शिडी, पायरी, दरजा, चढता उतरता क्रम, प्रमाण, पापुद्रा, तराजूच्या पारडे, खवला (माशाचा). scale down : प्रमाण घटविणे / कमी करणे.
scales स्केल्स् n.--- तराजू, तूळराशी.
scalp स्कॅल्प् v.t.--- (जुगार इ. मध्ये) (मोठा लाभ इ.) लाटणे / हस्तगत करणे / पटकावणे.
scalpel स्कॅल्पल् n.--- शस्त्रक्रियेचे लहान पण तीक्ष्ण धारेचा चाकू.
scaly स्केलि a.--- खवल्याचा, पापुद्र्याचा.
scam स्कॅम् n.--- दुर्व्यवहार, लबाडी, बनवाबनवी, भ्रष्टाचार. हूल, कंडी.
scamp स्कॅम्प् n.--- सोदा, छटे.
scamper स्कॅम्पर् v.i.--- पळ काढणे, निसटणे. चपळाईने पळणे, दौडणे, इकडे-तिकडे दुडुदुडु पळणे. n.--- पळ.
scan स्कॅन् v.t.--- शोध काढणे, पदाच्या मात्रा मोजणे. भरभर / चट्कन पाहणे / वाचणे, -वर नजर टाकणे / फिरविणे. विशिष्ट क्षेत्र किरणप्रक्षेपादिद्वारा तपासणे / धुंडाळणे. छंदांत / वृत्तांत बसविणे. n.--- अशी पाहणी / निरीक्षण / धांडोळा / तपास. छंदानुसरण, वृत्तानुसरण.
scandal स्कॅन्ड्ल् n.--- चहाडी, निंदा, लाज. चीड / तिरस्कार आणणारे दुष्कृत्य / दुर्घटना, लाजिरवाणा प्रकार. यांमुळे वाटणारा राग / खेद / धक्का / शरम. कुटाळकी, नालस्ती. v.t.--- निंदा करणे, कलंक लावणे.
scandalize स्कॅन्डलाइझ् v.t.--- त्रासविणे, दुखावणे, आळ घेणे, डाग लावणे, निंदा करणे.
scandalous स्कॅन्डलस् a.--- नालस्तीकारक, अनुचिततेमुळे धक्कादायक. त्रासदायक, चहाडखोर, शरमेचा.
scandinavia स्कॅन्डनेव्हिअ नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क (काहींच्या मते इसलँड हि) या देशांनी व्याप्त प्रदेश.
scandinavian स्कॅन्डनेव्हिअन् a.--- Scandinavia -चा / -संबंधीचा. n.--- Scandinavia चा रहिवासी.
scanner स्कॅनर् n.--- प्रक्रिया / पद्धति / लिखित मजकूर इ. वर नजर ठेवणारे / जाणणारे यंत्र / उपकरण. रेडारची संदेशग्राही तारपट्टी. प्रेक्षण- / परीक्षण- / तपासणी- यंत्र.
scantily स्कॅन्टिलि ad.--- अपूर्णपणे, कोताईने, हात राखून.
scanty स्कॅन्टि a.--- थोडा, अपुरा, कृपण.
scape स्केप् n.--- (‘Lansdcape’ वरून बनलेले नाम) देखावा / दृश्य -या अर्थी अन्य नामांपुढे समासांती प्रयोग: उदा. Seascape, Cloudscape, mindscape (=मनांत भरलेला देखावा, मनांत बनलेली परिस्थिति इ. ची जाण).
scar स्कार् n.--- चट्टा, व्रण, डाग. v.t.-- दुखापत करणे.
scarce स्केअर्स् a.--- दुर्मिळ. थोडा, कमी, अपुरा, वीराला, तुरळक. व्यस्त.
scarcely स्केअर्स्लि ad.--- कष्टाने, विरळा.
scarcity स्केअर्सिटि n.--- दुर्मिळपणा, विरळेपणा.
scare स्केअर् v.t.--- भिवविणे. n.--- दचका, धसका, धडकी.
scare crow स्केअर् क्रो n.--- तोडगा.
scarf स्कार्फ् n.--- अंगवस्त्र, शाल.
scarfskin स्कार्फ्स्किन् n.--- बाहेरील कातडी.
scarlet स्कार्लेट् a.--- लालभडक, तांबडे. n.--- लाल रंग, नारिंगीकडे झुकणारा लाल रंग.
scary स्केअरी a.--- भयानक, भयंकर. भयभीत, भित्रा.
scathe स्केद् v.t.--- टीकास्पद हल्ला करणे, अपाय करणे, कठोर व बोचक अशी टीका करणे.
scathing स्केदिंग् a.--- अति कडवट / प्रखर, जळजळीत.
scatter स्कॅटर् v.t.--- फाकाफाक करणे, वाताहात करणे, विरळ करणे, विखरून टाकणे, उडवणे.
scavenge स्कॅव्हेंज् / स्कॅव्हिंज् v.--- (कचऱ्यातून) (उपयुक्त वस्तु) गोळा करणे / निवडणे.
scavenger स्कॅव्हेन्जर् n.--- हलालखोर, भंगी, झाडू.
scenario सिनारिओ n.--- देखावा, परिस्थितीचे चित्र, (नाटक वगैरेची) रूपरेखा.
scenarist सिनारिस्ट् n.--- चित्रपटाचा / नाटकाचा देखावा निर्माण करणारा तज्ज्ञ.
scenary = Scenario = Scenery.
scene सीन् n.--- देखावा, दृश्य.
scent सेंट्
scentless सेंट्लेस्
sceptic स्केप्टिक्
sceptical स्केप्टिकल् a.--- (धर्म, ईश्वर इ. गोष्टींवर) विश्वास / श्रद्धा नसलेला / संशय असलेला, अश्रद्ध. संशय / अनिश्चय यांनी ग्रस्त.
scepticism स्केप्टिसिझम् n.--- ईश्वर इ. कल्पनांबद्दल) संशय / अनिश्चय बाळगण्याचा पंथ. परिपूर्ण ज्ञान अप्राप्य / अशक्य मानणारी विचारधारा.
sceptre सेप्टर्