to-tom

to टु -स, -ला, -ते. ‘-कडे/-ला जाताना’ या अर्थी क्रियाविशेषनात्मक शब्दसंहितीत प्रयुक्त. (The wife instructed me on what to wear to office.) To and fro --- इकडे-तिकडे.
toad टोड् n.--- मोठा बेडूक. Toad stool --- कुत्र्याचे मूत, छत्री, अळंबे.
toady टोडि n.--- हांजीहांजी करणारा, खुशामत्या. आश्रित गुलाम.
toast टोस्ट् v.t.--- भाजणे, गरम करणे, -चा (मद्यपानपूर्वक) सन्मान करणे. (पाव इ.) गरम / तांबूस / कडक / कुरकुरीत होईतो भाजणे. -ला भरपूर गरम करणे / भाजून काढणे. n.--- पाव इ. चा भाजून काढलेला काप. विस्तवावर भाजलेली रोटी, जिच्या आरोग्यचिंतनार्थ पान केले टी व्यक्ति. ज्याच्या सन्मानार्थ (सामूहिक) (मद्य-)पान-सेवन केले जाते / स्नेहसंमेलन केले जाते अशी व्यक्ति-/वस्तु-/गोष्टी- -च्या सन्मानार्थ / अभिनंदनार्थ (सामूहिक) (मद्य-)पण करणे / स्नेह-संमेलन करणे.
tobacco टोबॅको n.--- तंबाखू, तमाखू, ताम्रकूट.
toboggan टबॉगन् n.--- बर्फ़ावरून सरकत जाण्याची घसरपट्टी / गाडी. (sledge). v.i.--- अशा घसरपट्टीने (बर्फ़ावरून) फेरफटका करणे.
tocsin टॉक्सिन् n.--- भयसूचक घंटा.
today टुडे n. & ad.-- आज, आजच्या दिवशी.
toddy टॉडि a.--- ताडी, शिंदीची दारू.
toe टो v.t.--- पायांच्या बोटांनी / बोटाने ढकलणे / स्पर्शिणे. पायाची बोटे लावणे. v.i.--- पायाचे बोट (बोटे) हालविणे. पायाच्या बोटांनी (बोटे हालवून / नाचवून) संगीताला साथ देणे. n.--- पायाचे बोट. Toe a/the line/mark --- आखून दिलेल्या ओळीवर पायाचा चवडा ठेवून (ओळींत) (स्पर्धेकरिता इ.) उभे राहणे.
toga टोगा n.--- (रोमन पद्धतीचा) झगा / कंचुक.
together टुगेदर् ad.--- मिळून, एकवटून, बरोबर.
toil टॉइल् v.t.--- मेहनत करणे, खपणे, खपविणे. n.--- श्रम, कष्ट; जाळे.
toilet / Toillete टॉयलेट् n.--- प्रसाधनाचे साहित्य, प्रसाधन, वेशभूषा. न्हाणीघर / संडास / मुतारी असलेला प्रसाधन कक्ष.
toileteries टॉयलेटरीझ् n.--- वेशभूषेची उपकरणे.
toilsome टॉइल्सम् a.--- मेहनतीचे, कष्टाचे, दगदगीचा.
token टोकन् n.--- खूण, ओळख, याद, चिन्ह, लक्षण.
tokenism टोकनिझम् n.--- बाह्य खुणा / चिन्हे / संकेत / सोंगे यांचे स्तोम. सोंगाडेपणा, नाटकीपणा.
tolerable टॉलरेबल् a.--- माफक, बरे, सह्य, बेताचे, कामचलाऊ.
tolerance टॉलरन्स् n.--- सहनशक्ति, सोसणूक.
tolerate टॉलरेट् v.t.--- मोकळीक देणे, मनाई न करणे.
toleration टॉलरेशन् n.--- मोकळीक, अनिषेध, सहिष्णुता.
tom-tom टॉम्-टॉम् n.--- हाताने वाजवायचे लहान, अरुंद, ढोलके. टिमकी. (हिंदी: टमटम). अशा टिमकीचे वादन. v.i.--- टिमकी वाजविणे. v.t.--- (टिमकी वाजवून वा अन्य कृतीने) -ची / च्या बद्दल घोषणा करणे / -ची वाहवा करणे / -चा प्रचार करणे.
tomboy टॉम्बॉय् n.--- फाजील व उद्दाम पोरगा.
tome टोम् n.--- खूप मोठे वजनदार / जड पुस्तक, मोठ्या ग्रंथमालेच्या अनेक खंडांपैकी /भागांपैकी एक खंड/भाग.
tomfool टॉम्फूल् n.--- विदूषक.
tomorrow टुमारो n. & ad.--- उद्या.