ह्यांनी ज्ञानार्जनासाठी आयुष्यभर केलेल्या अखंड तपश्चर्येचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या मुलांना त्या ज्ञानाचा पूर्ण लाभ मिळाला व त्यांची आयुष्यं उत्तम घडली. त्याचप्रमाणे इतरांनाही त्याचा उपयोग व्हावा या हेतूने मुलांनी दीक्षितरीच्या प्रसिद्धीचे व ती पुढे वाढविण्याचे काम हाती घेतले. हे पाहून माझे मन आनंदाने भारावून गेले आहे.
-- सुलभा मुकुंद दीक्षित