ruf-rye

ruffian रफिअन् n.--- निर्दय मनुष्य, मांगहृदय. a.--- हिंस्रपणाचा.
ruffle रफल् v.t.--- सुरकुती पाडणे, व्यग्र करणे. n.--- कापडाच्या एका पट्टीची एक कड शिवून जवळ आणून बनविलेली फ्रिल.
rug रग् n.--- जाडीभरडी कांबळी, घोंगडी (अंथरूण वा पांघरूण म्हणून).
rugby रग्बी n.--- अंडाकृति / लंबगोलाकार चेंडूचा एक खेळ (हातापायाने खेळण्याचा).
rugged रगेड् a.--- उंचसखलाचा, खडबडीत, कठोर, उर्मट, उद्धट, ओबडधोबड, कडक. कणखर, बळकट, भक्कम.
ruggedness रगेड्नेस् n.--- खडखडीतपणा, कडकपणा.
ruin रुइन् v.t.--- नाश करणे, धुळीस मिळवणे, भिकेस लावणे.
ruinous रुइनस् a.--- जीर्ण, मोडकळीस आलेला.
rule रूल् v.t.--- अंमल करणे, राज्य करणे, रेखाटणे, आखणे. n.--- कायदा, अंमल, प्रभाव, नियम, क्रम, पद्धत. As a rule --- नेहमी. Rule of three --- त्रैराशिक. Double Rule of three --- पंचराशिक.
ruler रूलर् n.--- राज्यकर्ता, प्रभु, ईश्वर, नियंता, आखणी.
rum रम् n.--- एका पिण्याच्या दारूचे नाव. a.--- विलक्षण, तऱ्हेवाईक.
rumble रम्बल् v.i.--- पोटांत गुरगुरणे, गडबडणे. n.--- गडगडाट, घरघर, गर्जना, गुरगुर.
rumbustious रम्बस्चस् = Rambunctious.
ruminate रुमिनेट् v.t.--- रवंथ करणे, चिंतन करणे.
rumination रुमिनेशन् n.--- रवंथ, मनन, चिंतन.
rummage रमेज् v.t.--- धुंडाळाने, -चा धांडोळा / झडती घेणे. n.--- शोध, तपास, धांडोळा, झडती.
rumour रूमर् v.t.--- अफवा / बातमी पसरणे. n.--- अफवा, वार्ता, बातमी.
rump रम्प् n.--- ढुंगण, चौक, पुठ्ठा, शेपूट.
rumple रम्पल् v.t.--- सुरकुती पाडणे, सुरकुतविणे. n.--- सुरकुती.
run रन् n.--- (छायाचित्रणाचे - फिल्मचे-)(पडद्यावर) प्रक्षेपण. नाट्यप्रयोगाचे मंचन. मुख्य / प्रचलित / सर्वसाधारण वर्ग / प्रकार. v.t.--- छापून प्रसिद्धिणे. Eg. In our last issue, we ran the story…. v.i.--- धावणे, पळणे, गळणे, वाहणे, फुटणे, वितुळणे. Run down v.t.--- धक्का देऊन पाडणे. पाठलागाने दमछाक करून पकडणे, धुंडाळून काढणे, नालस्ती करणे, शरीराने खचणे / दुर्बल होणे. Run away --- पळून जाणे. Run on --- वटवट करणे. Run out --- खपणे. Run upon --- (मनाने) -मध्ये व्यग्र असणे.
run-down रन्-डाउन् n.--- मुद्देसूद विवरण / माहिती, सारांश. a.--- बिघडलेला, रुग्ण, आजारी. v.t.---
run-up रनप् n.--- उडी घेण्याआधीचे / फेकण्यापूर्वीचे पळणे / चालणे किंवा असे पळण्याचे /चालण्याचे अंतर. पूर्व(तयारीचा)-काल. पूर्वतयारी.
rung रंग् n.--- शिडीची पायरी, सोटा.
runner रनर् n.--- पळणारा, जासूद, धावणारा.
runoff रनॉफ् n./a.--- निकाली / निर्णायक शर्यत / स्पर्धा / चढाओढ. v.t.--- (एखादी वस्तु) एका स्थानातून दुसरीकडे (परदेश इ. मध्ये) गुप्तपणे / चोरून नेणे.
runway रन्वे n.--- आकाशांत झेपावण्यापूर्वी आणि आकाशांतून भूमीवर उतरल्यानंतर विमानास जे सरळ-सपाट भूपृष्ठ लागते ते पुरविणारा विमानतळावर बनवलेला सरळ-सपाट रस्ता. (विमानाच्या उड्डाणासाठी व अवतरण्यासाठी राखून ठेवलेली) विमानतळावरील धावपट्टी. धावन-पथ / धावन-मार्ग (हिंदी)
rupee रुपी n.--- रुपया.
rupture रप्चर् v.t.--- मोडणे, फोडणे. n.--- बिघाड, भेद, फूट, तूट, स्फोट.
rural रूरल् a.--- खेड्यापाड्याचा, शेतकीचा.
ruritania रूरिटेनिया n.--- (अँटनी होपच्या Prisoner of Zenda व Rupert of Hentzau या कादंबरीतील) एक काल्पनिक राज्य, प्रेमप्रकरणे, कारस्थाने यांनी युक्त असे (छोटे) राज्य / संस्थान.
ruse रूझ् n.--- हुलकावणी; (लबाडीचा / फसवणुकीचा) डाव, कावा.
rush रश् v.i.--- सपाट्याने चालणे, शिरणे, तुटून पडणे. n.--- झपाटा, झोत, रपाटा.
rusk रस्क् n.--- साखर इ. मिसळून गॉड केलेला व पुनः भाजून कोरड्या कुरकुरीत वड्यांच्या रूपाचा पाव.
rust रस्ट् v.i.--- गंजणे, तांबणे. n.--- तांब, कलंक, गंज.
rustic रस्टिक् n.--- गांवढळ, खेडूत. a.--- गावठी, साधा, खेडवळ, ओबडधोबड.
rusticate रस्टिकेट् v.t.--- कांही मुदतपर्यंत शाळेतून अगर कॉलेजांतून काढणे.
rustle रसल् v.i.--- सरसर जाणे / चालणे. n.--- सरसर, सळसळ.
rusty रस्टि a.--- जळलेला, मलीन.
rut रट् n.--- माज, मस्ती, उधान, भर. हत्ती, हरीण इ. सस्तन प्राण्यांस प्रतिवर्षी उद्भवणारी संभोगेच्छा. या अवस्थेत हत्तीच्या गंडस्थळातून होणारा स्त्राव. पहा : ‘Ichor’.चाकारी, चाकोरी, रूढ पद्धति, अंगवळणी पडलेली सवय, ठरीव जीवनक्रम. सागर -ध्वनि / -गर्जना. v.t.--- जुगणे, चाकारी पाडणे. (रस्ता) चाकोरीयुक्त करणे.
ruth रूथ् n.--- दया, करुणा.
ruthless रूथ्लेस् a.--- निर्दय, कठोर.
rye राय् n.--- एक प्रकारचे धान्य.