demise डिमाइझ् n.--- मरण, मृत्यु, इच्छापत्र/भाडेकरार इ. चे अन्वये होणारे मालमत्तेचे हस्तांतरण.
demised डिमाइझ्ड् a.--- इच्छापत्र, भाडेपट्टा इ. प्रमाणे हस्तांतरित (मालमत्तेतील हितसंबंध).
democracy डिमॉक्रसि n.--- लोकसत्ताक राज्य.
demographer डिमॉग्रफर् n.--- ‘demography’ चा अभ्यासक/व्यावसायी.
demographic डिमॉग्रॅफिक्र् a.--- ‘demography’ संबंधीचा / स्वरूपाचा. (लोक-) संख्याविषयक.
demography डिमॉग्रफी n.--- लोकसंख्येचा (घनता, विभागणी इ. बाबत) अभ्यास.
demoiselle डेम्वाझेल् n.--- तरुण स्त्री.
demolish डिमॉलिश् v.t.--- पाडून टाकणे, नाश करणे.
demolition डिमॉलिशन् n.--- नाश, निर्दलन.
demon डीमन् n.--- दैत्य, भूत, राक्षस, पिशाच्च.
demonetization डिमॉनिटायझेशन् v.t.--- चलन रद्द करणे; पैसा म्हणून असलेले मूल्य नष्ट करणे.
demoniac डिमोनिअॅक् a.--- भूतग्रस्त, राक्षसी, राक्षसी वृत्तीचा मनुष्य.
demonology डीमनॉलॉजी n.--- दैत्यशास्त्र, दैत्यविचार.
demonstrate डिमॉन्स्ट्रेट् v.t.--- प्रतिपादणे.
demonstration डेमॉन्स्ट्रेशन् n.--- सिद्धांत, उपपत्ति.
demonstrative डेमॉन्स्ट्रेटिव्ह् a.--- निदर्शक.
demoralization डिमॉरलायझेशन् v.t.--- n.--- हृदयदौर्बल्य, आत्मविश्वासाचा अभाव, गलितधैर्यावस्था.
demoralize डिमॉरलाइझ् v.t.--- गुण ऱ्हास करणे. -ची नीति बिघडविणे. गलितधैर्य करणे, -ची हिम्मत/खंबीरपणा नष्ट करणे.
demur डिमर v.t.--- थांबणे, कांकू करणे, संशय घेणे, कुरकुर करणे n.--- कांकू, तक्रार, प्रतिषेध, कुरकुर.
demure डिम्यूर a.---बकध्यानी, गंभीर, लाजरी; प्रयत्नपूर्वक शांतवृत्ति/विनीतता आणलेला. n.---
den डेन् n.--- बीळ, ढोल, दरी, गुहा.
denga = Dengue
dengue डेंग्यू/डेंगेइ/डेंगी n.--- गुढगेमोडीचा आजार. अचानक उद्भवणारा, शारीरिक (विशेषतः संधीतील) तीव्र वेदनांनी व ज्वराने लक्षित, शक्तिपातकारी विशिष्ट डासांकरावी संसर्गजन्य रोग. हाडमोडीचा ताप.
denial डिनायल् n.--- नाकबूली, नकार, निषेध.
denigrate डेनिग्रेट् v.t.--- -वर शिंतोडे उडविणे, -ची निंदा/नालस्ती करणे. -ला तुच्छ लेखणे, -ची अवहेलना करणे.
denigration डेनिग्रेशन् n.--- निंदा, नालस्ती, अवहेलना, अवमूल्यन.
denim डेनिम् n.--- एका प्रकारचे बळकट, टिकाऊ कापसाचे वस्त्र - बहुधा निळ्या रंगाचे व ‘जीन्स’ साठी वापरण्यात येणारे.
denizen डेनिझन् n.--- रहिवासी, नागरिक.
denominate डिनॉमिनेट् v.t.--- नाव ठेवणे/देणे.
denomination डिनॉमिनेशन् n.--- नाव, संज्ञा, (विशेष नावाने)ओळख, पंथ, मार्ग, किंमत, शाखा, गण.
denominational डिनॉमिनेशनल् a.--- विशिष्ट नावाचा पंथ, गट इ. चा (वेगळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या/च्या स्वरूपाचा)
denominative डिनॉमिनेटिव्ह् a.--- (कोणत्याही गोष्टीस) (विशिष्ट नांव देणारा/नाव देण्यास कारण होणारा. नामापासून बनलेला/साधलेला, नामसाधित. n.--- नामापासून बनलेला, धातु/क्रियापद इ. जातीचा शब्द. नामसाधित (शब्द). नामधातु (nominal verb).
denominator डिनॉमिनेटर् n.--- छेद, छेदक.
denotation डिनोटेशन् n.--- व्यक्तिसंख्या, सूचन, द्योतन.
denote डिनोट् v.t.--- दाखविणे, दर्शविणे, अर्थ असणे.
denouement डेनूमा n.--- साहित्यातील - विशे. कथा/कादंबरी इ. - प्रमुख समस्या, पेच, प्रश्न, गुंता इ. ची सोडवणूक/उलगडा/निराकरण. (प्रकरणाची) अखेर, अंत, फलित फल(श्रुति).