chu-civ

chubby चबि a.--- गब्दुल, मांसल.
chuck चक् v.i.--- खुटखुटणे, थापटने, फेंकणे, टाकणे, फेकून/टाकून देणे.
chuckle चकल् v.i.--- गालांत हसणे. n.--- मंदहास्य, स्मितहास्य.
chug चग् n.--- (इंजिन इ. चा फटफट असा आवाज. v.i.--- फटफट आवाज करणे / आवाज करीत जाणे.
chum चम् n.--- परमस्नेही, मित्र.
chump चम्प् n.--- मूर्ख / खुळा माणूस. जाड व छोटा लाकडाचा ठोकळा. एखाद्या वस्तूचे जाड व बोथट तोंड.
chunam चूनॅम् n.--- चुना, चूर्ण.
church चर्च् n.--- ख्रिस्ती लोकांचे देऊळ, भाजनालाय.
churchyard चर्च्यार्ड् n.---देवळाजवळची प्रेते पुरण्याची जागा, स्मशान.
churl चर्ल् n.--- तुसडा, गावंढळ, लोभी, कृपण.
churlish चर्लिश् a.--- गावंढळ, कर्कश.
churn चर्न् n.--- दही घुसलन्याचॆ माथणी, घुसळण्याचे भांडे. v.t.--- घुसळणे.
churn-staff चर्न्स्टाफ् n.--- घुसळण्याची रवी.
chute (also ‘Shute’) n.--- उतरता प्रवाह; उतरती पन्हाळ/नळ.
chyle काइल् n.--- अन्नरस, आमाशयातून लहान आंतड्यांत आलेल्या ‘chyme’ चा, स्वादुपिंड व पित्ताशय यांतील रसांच्या मिश्रणाने झालेला/बनलेला दुधाळ अन्नरस.
chylo- काइलो- ‘chyle’ चे समासगत रूप.
chylous काइलस् a.--- ‘chyle’(अन्नरस) -संबंधीचा/- सदृश/-प्रचुर.
chyme काइम् n.--- खाल्लेल्या अन्नाचा, आमाशयांतील पाझरणाऱ्या द्रव्यांच्या मिश्रणाने तेथे बनविलेला लगदा/काला/रेंदा. आमरस.
cicada सिकेडा/सिकाडा n.--- पारदर्शक पंखांचा एक कीटक.
cicatrics सिकॅट्रिस् n.--- चट्टा, व्रण.
cider साय्डर् n.--- ‘apple’(सफरचंद) या फळाचा रस.
cigar सिगा(र्) n.--- चुट्टा, चिरूट, पानांत गुंडाळलेली मोठी विडी.
cigaret = Cigarette
cigarette सिगरेट् n.--- कागदाच्या नळीत (तंबाकू) वळलेली (‘cigar’ पेक्षा लहान) बिडी/विडी.
cigarillo सिगरिलो n.--- लहान ‘cigar’.
cilia (plural of ‘ cilium’) सीलिआ n.--- सूक्ष्म लव.
ciliary सीलिअरि a.--- ‘cilia’ च्या स्वरूपाचा.
cincture सिन्क्चर् n.--- मेखला, पट्टा.
cinder सिन्डर् n.--- कोळपलेला कोळसा.
cinema सिनिमा n.--- चलचित्रगृह, चलचित्रव्यवसाय, चलचित्रफीत / चलचित्रपट.
cinematic सिनेमॅटिक् a.--- ‘ cinema’ विषयक.
cinematographic सिनिमटॉग्रफिक् a.--- ‘cinematography’ विषयक.
cinematography सिनि(न)मटॉग्रफी n.--- चलच्चित्रीकरणविद्या.
cinnabar सिनाबार् n.--- रससिंदूर, हिंगूळ, पारा.
cinnamon सिनॅमन् n.--- दालचिनी.
cipher सायफर् n.--- अंक, शून्य, कवडीमोल मनुष्य, गूढलिपी. v.t.--- हिशेब करणे, गूढलिपी लिहिणे, (प्राथमिक/साधी) आकडेमोड करणे. ओळखून काढणे.
ciphering सायफरिंग् n.---
circle सर्कल् n.--- वर्तुळ, कडे, गोल, घेर, मंडळी, मंडळ, गिरकांडी. v.t.--- वेढा घालणे, सर्कल मारणे, प्रदक्षिणा करणे, गरका मारणे. ‘ to come to full circle’ = गोल फिरून पुनः मूळ जागी येणे, मूळ-पदावर येणे.
circuit सर्किट् n.--- फेरा, फेरी, गिरकांडी, मंडळ, वेटोळे, वळसा, चक्कर. ऋणाग्र व धनाग्र यामधील पूर्ण विद्युतप्रवाहमार्ग. गात, टोळी, घोळका.
circuitous सर्क्यूूइटस् a.--- गरक्याचा, वाकडा, फेऱ्याचा.
circular सर्क्युलर् n.--- वटहुकूम, जाहिरात, प्रसिद्धपत्रक.
circulate सर्क्युलेट् v.t./ v.i.--- फिरविणे, प्रसार करणे, फिरणे, चालणे, चालविणे.
circulation सर्क्युलेशन् n.--- फिरविणे, प्रसार.
circumambulate सर्कम्अॅम्ब्युलेट् v.t.--- प्रदक्षिणा घालणे, परिभ्रमण करणे.
circumcise सर्कम्साइझ् v.t.--- सुंता करणे.
circumcision सर्कम्सिशन् n.--- सुंता.
circumference सर्कम्फरन्स् n.--- घेर, मंडळ.
circumflex सर्कम्फ्लेक्स् n.--- सभोंवार पसरणे.
circumfuse सर्कम्फ्यूज् v.i.---
cicumjacent सर्कम्जॆसन्ट् a.--- आसपासचा.
circumlocution सर्कम्लोक्यूशन् n.--- द्राविडी प्राणायाम, चरपट, चरपटपंजरी.
circumnavigate सर्कम्नॅव्हिगेट् v.t.--- गलबतातून पृथ्वी प्रदक्षिणा घालणे.
circumscribe सर्कम्स्क्राईब् v.t.--- हद्द करणे, मर्यादित करणे.
circumspect सर्कम्स्पेक्ट् a.--- सावध, चौकस.
circumspection सर्कम्स्पेक्शन् n.--- सावधपणा, दूरदृष्टि, पोंच.
circumstance सर्कम्स्टन्स् n.--- संबंध, गोष्ट, प्रकरण, अवस्था, गुण, प्रकार.
circumvallation सर्कम्व्हॅलेशन् n.--- कोटबंदी.
circumvention सर्कम्व्हेन्शन् n.--- फसवणूक, दगा.
circumvolution सर्कम्व्होल्युशन् n.--- प्रदक्षिणा.
circus सर्कस् n.--- सरकस, तालीमखाना, रंगभूमि.
cirrhosis सिरोसिस् n.--- यकृत कठिण होण्याची विकृति.
cistern सिस्टर्न् n.--- टाकी, हौद, कुंड.
citadel सिटॅडल्/सिटडल/सिटडेल n.--- बालेकिल्ला.
citation साइटेशन् n.--- ग्रंथ, लेख,इ. वरून (प्रत) काढून घेतलेला उतारा/संदर्भासह उल्लेख, उद्धरण, हवाला.
cite साइट् v.t.---
citizen सिटिझन् n.--- नगरवासी, नागरिक, पौरजन.
citizenry सिटिझनरी n.--- नागरिकांचा समग्र समुदाय. समस्त पौरजन.
citizenship सिटिझन्शिप् n.--- नागरिकत्व.
citric सायट्रिक् a.--- लिंबाचा, ‘citron’-/’citrus’- चा
citron सिट्रन् n.---लिंबाच्या जातीची फळे देणारे झाड. अशा स्वादिष्ट झाडांची जात. अशा झाडाचे फळ (lemon,orange, lime, grapefruit, etc.). अशा फळाची स्वादिष्ट साल, जम्बीर(-फल) महाळुंग, मातुलंब, तोरंजन.
citrus सिट्रस् n.---= Citron. a.--- ‘Citron’/’Citrus’ -चा/-विषयक.
city सिटि n.--- शहर, नगर, नगरी.
civet सिव्हेट् n.--- जवादी मांजराची कस्तुरी.
civetcut सिव्हेट्कॅट् n.--- जवादी मांजर.
civic सिव्हिक् a.--- शहराचा, नगरासंबंधी.
civil सिव्हिल् a.--- शहरसंबंधी, लोकव्यावहारिक, दिवाणी, मुलकी, सभ्य, सुधारलेला, गांवखात्याचा.
civil-court सिव्हिल्-कोर्ट् n.--- दिवाणी, अदालत.
civil engineer सिव्हिल् इन्जिनिअर् n.--- इमारती (भवाने), पूल, धरणे, रस्ता, इ. बांधकामाचा तज्ज्ञ, बांदकाम-तंत्रज्ञ.
civil engineering सिव्हिल्-इन्जिनिअरिंग् n.--- इमारती, पूल, रस्ते, धरणे, आदि बांधकामांचे तंत्रज्ञान/शास्त्र.
civil hospital सिव्हिल् हॉस्पिटल् n.--- सरकारी/शासकीय, सार्वजनिक रुग्णालय.
civilian सिव्हिलिअन् n.--- मुलकी काम करणारा.
civility सिव्हिलिटी n.--- सभ्यपणा, माणुसकी.
civilization सिव्हिलिझेशन् n.--- सुशिक्षितपणा, सुधारणा, संस्कृति, सभ्यता.
civilize सिव्हिलाइझ् v.t.--- सुधारणे, सुशिक्षित करणे.
civil-law सिव्हिल् लॉ n.--- खाजगी हक्कांचा कायदा.
civil-war सिव्हिलि वॉर् n.--- आपसांतील लढाई, तंटा, यादवी.