Dar-Dea

Daredevil डेअर् डेवल् a./n.--- कसल्याही धोक्यास/भयास न जुमानणारा साहसी (मनुष्य), अचाट साहस पत्करणारा / धारिष्ट करणारा (माणूस).
Daredevilry डेअर् डेवल्री n.--- बेभान साहसी. धाडसी वृत्ति.
Daring डेअरिंग् n.--- धारिष्ट, धाडस. a.--- धीट, साहसी.
Dark डार्क् n.--- काळोख, अज्ञान. a.--- अंधाराचा, काळा, काळासांवळा, गुप्त, दुष्ट, नीच.
Darkness डार्क्नेस् n.--- अंधःकार, काळोख, तिमिर.
Darling डार्लिंग् n.--- जीवप्राण. a.--- प्यारा, जिवलग.
Darn डार्न् v.t.---धिक्कारणे, तिरस्कारणे, -ची घृणा करणे. रफू करणे, तुणणे. n.--- रफू, रफूने दुरुस्त केलेले कपड्याचे भोक.
Darned डार्न्ड् a.--- धिक्कृत, तिरस्कृत, त्यक्त, बहिष्कृत. अत्यंत/अतिशय (वाईट अर्थी) (उदा: You have treated her darned badly.)
Dart डार्ट् n.---बरची, भाला. v.t.--- फेकणे. v.i.--- भरकन् जाणे, झेपावणे.
Dash डॅश् v.t.---आदळणे, आपटणे, उसळणे, भंग करणे, खोडणे, भेळ घालणे. n.--- शिपका, हबका(रा), हपका, छटा, भेळ, उसळी; हिम्मत, तडफ, अल्पमात्रा, अल्पांश; धडक, एका दामातील धाव.
Dastard डॅस्टर्ड् n. and a.--- भित्रा, नामर्द, भ्याड.
Dastardly डॅस्टर्ड्ली a.--- भित्रा, भागूबाई, नीच.
Data डेटा/डाटा n.--- मुद्दा, आधार, गृहीत गोष्टी. विशिष्ट विषयांतील वस्तुस्थितीची ज्ञात माहिती. विशिष्ट विवेचनांतील आधारभूत गृहीतके / गृहीत गोष्टी.
Database डेटाबेस् n.--- संगणकातील ‘Data’ चा मोठा साठा. ‘Data’चे हाताळण्या/वापरण्याजोगे वर्गीकरण / मांडणी करण्याची एक संगणकीय पद्धति.
Date डेट् n.--- तारीख, मिती, वेळ, खजूर. v.t.--- मिति घालणे. v.i.--- सुरू होणे.
Dative डेटिव्ह् n.--- चतुर्थी विभक्ति, संप्रदान.
Daughter डॉटर् n.--- मुलगी, कन्या. Daughter-in-law डॉटर् इन लॉ n.--- सून.
Daunt डॉन्ट् v.t.--- भय घालणे, धैर्य खचविणे.
Dauntless डॉन्ट्लेस् a.--- निर्भय, धीट, मर्द, घट्ट.
Dawdle डॉडल् v.i.--- गमणे, खेळणे, रेंगाळणे.
Dawdler डॉड्लर् n.--- गमणारा, खेळणारा, रेंगाळणारा.
Dawn डॉन् n.--- पहाट, अरुणोदय. v.i.--- उजाडणे, खुलणे.
Day डे n.---(संस्कृत: दिव्) दिवस, वेळ, उजेड, ऊन.
Day-and-night डे अॅन्ड्-नाइट् ad.--- अहोरात्र.
Day-after-day डे-आफ्टर्-डे ad.--- दिवसेंदिवस.
Day-by-day डे-बाय्-डे ad.--- दररोज.
Daybook डे-बुक् n.--- रोजखर्डा, रोजकीर्द.
Daybreak डेब्रेक् n.--- पहाट, प्रातःकाळ, अरुणोदय.
Day-dream डेड्रीम् n.--- मनोराज्य, दिवास्वप्न. v.i.---
Dazzle डॅझल् v.t.--- दिपविणे, चक्क करणे, भयचकित करणे, थक्क करणे, -ला अंधारी आणणे. झगमगाटाने प्रभावित करणे, दिपवून टाकणे.
Daylabor डे-लेबर् n.--- रोजमजुरी.
Dead डेड् a.--- मेलेला, निर्जीव, अचेतन, निरुपयोगी, अवसान गेलेला, मंद. n.--- भर, पूर्णावस्था.
Deaden डेडन् v.t.--- मन कठोर करणे.
Deadlock डेड्लॉक् n.--- न सुटणारा/तुटणारा संघर्ष/वाद/पेच/गुंता, पेचप्रसंग.
Deadpan डेड्पॅन् n.--- भावशून्य, नीरस, रटाळ.
Deadstock डेड्स्टॉक् n.--- निरुपयोगी झालेला माळ.