Zinc झिंक् n.--- निळसर पांढऱ्या रंगाचा धातू-घटक. जस्त. v.t.--- ह्या धातूचा थर चढविणे, ह्या धातूने झाकणे.
Zing झिंग् n.--- चेतना, जिवंतपणा, जोम. v.i.--- सूं सूं असा आवाज करीत जोरात हालणे किंवा पुढे जाणे.
Zinger झिङर् n.--- टोमणा, प्रत्युत्तर, सणसणीत उत्तर. आश्चर्याची / धक्कादायक बातमी. खळबळ उडवणारी बातमी. चेतना / उत्साह जागृत करणारी वस्तू / व्यक्ती.
Zip झिप् n.--- बटणांच्या ऐवजी वापरता येणारी उघडझाप करता येण्यासारखी साखळी. ‘Zipper’ चे संक्षिप्त रूप. बंदुकीच्या गोळीप्रमाणे सूं असा आवाज. v.i.--- वेगाने / जोमाने वागणे / हालणे. v.t.--- उत्साह भरणे. चैतन्य भरणे. (भोजनाची) चव वाढवणे. Zip (n.) लाऊन सुरक्षित करणे. Zip (n.) उघडून मोकळे करणे. Zip line n.--- विद्युत-दोरखंड वापरून नदी, दरी, इ. च्या पलीकडे जाण्याची / (सामान) नेण्या-आणण्याची यंत्रणा. Zip-code n.--- (अमेरिकेत) पिनकोड. एखाद्या जागेचा पत्ता निश्चित सांगण्यासाठी टपालकचेरीने (पोस्टखात्याने) ठरविलेला (पाच किंवा नऊ आकड्यांचा) अंकसमूह.
Zither झिथर् n.--- एक तंतुवाद्य.
Zodiac झोडिअॅक् n.--- राशिमंडळ, राशिचक्र.
Zodiacal light झोडिअॅकल् लाइट् n.--- पूर्वेला सूर्योदयापूर्वी किंवा पश्चिमेला सूर्यास्तानंतर आकाशात कधी कधी दिसणारा दैदीप्यमान असा त्रिभुजाकार मार्ग.
Zollverein त्सॉल्फेराइन् n.--- (एकोणीसाव्या शतकात जर्मनीमध्ये) परराष्ट्रांतून आयात करताना समान आयातदर ठेवण्यासाठी (जर्मन) राज्यांची संघटना. आयातदरनियंत्रणासाठी अनेक राज्यांमधील योजना. सीमाशुल्कसंघ.
Zombi = Zombie
Zombie झॉम्बी n.--- मृत माणसाला जिवंत करण्याचे सामर्थ्य असलेला अमानवी योनीतील प्राणी. अशा सामर्थ्याने निःशब्द, इच्छाहीन पण सचेतन केलेले शव. निरुत्साही / अनुत्सुक / उदासीन / औत्सुक्यहीन / अर्थशून्य व्यक्ति. = Zombi
Zombify झॉम्बिफाय् v.t.--- अलौकिक शक्तीने मृतास सचेतन करणे.
Zonal झोनल् a.--- प्रादेशिक, विभागीय, प्रदेशासंबंधी.
Zonated झोनेटेड् a.--- विभागलेला, विभागणी केलेला.
Zonation झोनेशन् n.--- विभागलेली स्थिति / अवस्था. अनेक भागांमध्ये केलेली मांडणी.
Zone झोन् n.--- विभाग, प्रदेश.
Zoning झोनिंग् n.--- शहरनियोजनेसाठी इमारतींची संख्या, त्यांचे प्रकार व वापर प्रतिबंधित करण्यासाठी त्या शहराची वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये केलेली विभागणी. अशी विभागणी करायची पद्धत. a.--- अशा विभागणी-संबंधी. उदा. Zoning laws
Zonk झॉङ्क् v.i.--- मद्यपान किंवा अन्य मादक पदार्थांच्या सेवनामुळे मूर्च्छा येऊन पडणे, गाढ झोपी जाणे, पूर्ण विश्राम करणे. v.t.--- (मद्य किंवा इतर मादक पदार्थ देऊन) गुंगी / धुंदी आणणे. बधीर करणे, वेदना शांत करणे.
Zonule n.--- लहान प्रदेश / पट्टा / गट.