deg-del

degeneracy डीजनरसी n.--- मूळ गुणांचा/जातीचा ऱ्हास.
degenerate डीजनरेट् a.--- निकृष्ट, कमजात, अधम, पतित. v.i.--- मूळ गुणांचा/जातीचा ऱ्हास होणे, र्हास/अवनति पावणे,दर्जाव उतरणे, निकृष्ट पातळीस येणे.
deglutition डिग्ल्युटिशन् n.--- गिळणे.
degradation डिग्रेडेशन n.--- ‘degrade’ करण्याची / होण्याची प्रक्रिया.
degrade डिग्रेड् v.t.--- हलक्या पायरीवर आणणे, पदच्युत करणे, मानभंग करणे, पावित्र्य/मोठेपणा कमी करणे, अधःपात करणे. विघटना द्वारे (कांही घटक अन्य उपयोगासाठी वेगळे करून) -ची दर्जांत घट करणे. (उदा: In prolonged starvation glucose may be synthesized in the body by degrading (degradation of) tissue proteins or fats.
degraded डिग्रेडेड् p.p.a.--- पतित, मानाभ्रष्ट.
degrading डिग्रेडिंग् a.--- अपयशाचा, बेअब्रूचा.
degree डिग्री n.--- पदवी, दर्जा, अंश, भाग, पायरी.
degree of latitude डिग्री आॉफ् लॅटिट्यूड् n.--- अक्षांश.
degree of longitude डिग्री आॉफ् लाँन्जिट्यूड् n.--- रेखांश.
dehisce डिहीस् v.i.--- ‘आ’ वासणे, उघडणे; (शेंगा/फळे यांचे)बीजोत्सर्जनासाठी उघडणे/विस्फारणे.
dehiscence डिहिसन्स् n.--- ‘आ’ वासण्याची क्रिया;(वनस्पतीत फलादिकांची) बीजोत्सर्जनासाठी उमलण्याची/फुटण्याची प्रक्रिया.
dehiscent डिहिसन्ट् a.--- उघडणारा, फुटून फाकणारा.
dehors दहोर् (लॅटिन्) -च्या कक्षेबाहेरील.
dehydrate डिहायड्रेट् v.t.--- -ला जलरहित करणे. v.i.--- जालाहीन होणे.
dehydration डिहायड्रेशन् n.--- जलविरहित करण्याची/होण्याची प्रक्रिया, जलहानि.
deify डीइफाय् v.t.--- देव मानणे, देवपद देणे.
deign डेन् v.i.--- योग्य मानणे, कृपा करणे.
deism डिइझम् n.--- एक ईश्वर मानण्याचे मत, एकेश्वरी.
deist डीइस्ट् a.--- एक ईश्वर मानणारा.
deity डीइटी n.--- देवता, ईश्वर, देव.
deja vu देजा व्हू n.--- प्रथम अनुभवातही होणारा पूर्वानुभवाचा स्मृतिभ्रम, मिथ्यास्मृति. अतिपरिचित, दुःखदत्या परिचित. साधर्म्यामुळे जागविली गेलेली पूर्वानुभवाची स्मृति.
deject डिजेक्ट् v.t.--- खिन्न/उदास करणे, उत्साहभंग करणे.
dejected डिजेक्टेड् p.p.a.--- खिन्न, उदास.
dekko डेको (हिंदी ‘देखो’ पासून) n.--- दर्शन, अवलोकन. v.--- बघणे, दर्शन घेणे, पाहणी करणे.
delapidate = Dilapidate
delapidation = Dilapidation
delay डिले n.--- खोटी, विलंब. v.t.--- विलंब/खोटी करणे.
delectable डिलेक्टेबल् a.--- मजेदार, गमतीचा, सुखकर, रुचकर.
delectation डिलेक्टेशन् n.--- आनंद, मजा, सुख.
delegate डेलिगेट् v.t.--- वकील/प्रतिनिधि म्हणून पाठविणे,(विशिष्ट अधिकार इ.) अन्यास/कनिष्ठास सोपविणे. n.--- वकील, मुखत्यार, मुनीम, प्रतिनिधि, अधिकृत.
delegation डेलिगेशन् n.--- प्रतिनिधिप्रेषण, प्रतिनिधिमंडळ, (अधिकार इ. चे) प्रत्यायोजन.
delete डिलीट् v.t.--- काढून टाकणे, खोडून टाकणे.