Cao-Car

Caoutchouc कूचूक् n.--- रबर.
Cap कॅप् n.--- डोक्याची लहान टोपी, शिरोभार, शेम्बी. v.t.--- शेम्बी बसविणे, डोक्यावर टोपी ठेवणे.
Capability केपेबिलिटी n.--- शक्ति, दक्षता, कर्तृत्व, योग्यता.
Capable केपेबिलिटि a.--- मावून घेण्याजोगा, योग्य.
Capacious कॅपेशस् a.--- मोठ्या सांठवणाचा, प्रशस्त.
Capacity कॅपॅसिटि n.--- आवांका, विस्तार, सांठवा, अधिकारी, पेशा.
Cap-a-pie कॅपापाय् ad.--- नखशिखांत, आपादशिर, धारणक्षमता, धारिता.
Cape केप् n.--- भूशिर.
Caper केपर् v.i.--- उद्या मारणे, खिदळणे, नाचणे, चाळा, माकडचेष्टा, खोडी.
Capillary कपिलरी n.--- केसासरखा बारीक, सूक्ष्म, केसासाराखी सूक्ष्म रक्तवाहिनी, केशिका (हिंदी).
Capillary attraction कपिलरि अॅट्रॅक्शन् n.--- केशाकर्षण.
Capital कॅपिटल् n.--- राजधानी, भांडवल. a.--- शिरोभागाचा, श्रेष्ठ, उत्कृष्ट, देहांत-शासन-पात्र. वाक्यारम्भीचे वा विशेषनामाचे अक्षर लिहिण्यास वापरली जाणारी इंग्लिश भाषेची विशिष्ट लिपि, इंग्लिश भाषेची ‘मोठी’ लिपि. (पहा : Uncial) a.--- या लिपिमधील / लिपीपैकी कोणतेही (अक्षर).
Capitalist कॅपिटाॅलिस्ट् n.--- भांडवल वाला, पुंजीवाला.
Capitation कॅपिटेशन् n.--- शिरगणती.
Capitation tax कॅपिटेशन् टॅक्स् n.--- डोईपट्टी, माणूसपट्टी.
Capitulate कॅपिच्युलेट् v.i.--- कलमबन्दी करणे, शरण जाणे.
Capon केपॉन् n.--- खच्ची केलेला कोंबडा.
Caprice कॅप्रिस् n.--- मनाची लहर, छंद, नाद, तरंग.
Capricious कॅप्रिशस् a.--- लहरी, नादिष्ट, छंदखोर.
Capricorn कॅप्रिकॉर्न् n.--- मकर रास.
Capsicum कॅप्सिकम् n.--- मोंगली मिरची.
Capriole कॅप्रिओल् n.--- बकरीसारखी उडी.
Capsize कॅप्साइझ् v.t and v.i.--- उपडा करणे, उपडा होणे.
Capstan कॅप्स्टन् n.--- एक प्रकारचा रहाट.
Capsule कॅप्सूल् n.--- बोंड, बीजकोश.
Captain कॅप्टन् n.--- फौजेवरचा अधिकारी, सरदार, कप्तान, कर्णधार, (सांघिक खेळातील) चमूप्रमुख, संघनेता.
Carafe करॅफ् n.--- पाणी वाढण्याचे काचेचे भांडे.
Caption कॅप्शन् n.--- सरकारी धरणे, जप्ती; प्रकरण / भाष्य / कलाकृति इ. चे शीर्षक.
Captious कॅप्शस् a.--- तकारी, पकडीचा, हुजतखोर
Captiously कॅप्शस्लि ad.--- दिक्कतखोरीने, हुज्जत करून.
Captivate कॅप्टिव्हेट् v.t.--- लढाईत पाडाव करणे, युद्धात धरणे, भुरळ घालणे, मोहिनी घालणे.
Captive कॅप्टिव्ह् n.--- लढाईत केलेली कैदी.
Captivity कॅप्टिव्हिटि n.--- कैद, दास्य, बंदी.
Captor कॅप्टर् n.--- लढाईत पाडाव करून धरणारा.
Capture कॅप्चर् v.t.--- पकडणे. n.--- पाडाव, लूट.
Car कार् n.--- रथ, देवाचा रथ, रुळावरची गाडी.
Carabine कॅराबाइन् n.--- लहान बंदुक, कडाबीन.
Caramelize
Carat कॅरट् n.--- रत्नाचे वजन मोजण्याचे माप : 200 mg = 1 carat, मिश्रधातूंतील सोन्याची शुद्धता मोजण्याचे माप : 1/24 शुद्ध सोने = १ कॅरट्.
Caravan कॅराव्हॅन् n.--- काफला, कारवान.
Caravansary कॅराव्हॅन्सरी n.--- धर्मशाळा, सराई.
Caraway कॅरॅवे n.--- ओवा, अजमोदा.
Carbohydrate कार्बोहाइड्रेट् n.--- प्राण्यांस जिवंत/कार्यशील राहण्यास आवश्यक ऊर्जा देणारे, खाद्यवनस्पतीन्पासून मिळणारे, carbon, hydrogen व oxygen यांच्या संयुगरूपात असणारे तांदूळ, गहू, केले, साखर, बटाटा, इ. मध्ये वैपुल्याने उपलब्ध असणारे विशिष्ट अन्नद्रव्य (रासायनिक सूत्र - Cn(H2O)n)
Carbon कार्बन् n.--- शुद्ध कोळसा, एक मूलतत्व.
Carboncle कार्बन्कल् n.--- माणिक, गरमॆचा फोड, काळपुळी.
Carbon-di-oxide कार्बन्-डाय्-आॅक्साइड् n.--- सूत्र (CO2) कर्ब-द्वि-प्राणिल हा वायुविशेष (वातावरणात १ टक्क्याने आढळणारा).
Carcanet कार्कानेट् n.--- रत्नमाला.
Carcass कार्कास् n.--- प्रेत, मुडदा, सांगाडा.
Carcinogen कार्सिनोजेन् n.--- कॅन्सरोत्पादक द्रव्य.
Carcinogenic कार्सिनोजेनिक् a.--- कॅन्सर रोग उत्पन्न करणारा.
Carcinogenous कार्सिनोजेनस् = Carcinogenic.
Card कार्ड् n.--- गंजीफ, नावाची चिठ्ठी, कार्ड, पान, कापूस पिंजण्याचे यंत्र. v.t.--- पिंजणे.
Cardamom कार्डमम् n.--- वेलदोडा, वेलचीचे झाड.
Carder n.--- n.---
Cardiac कार्डिअॅक् = Cordial.--- हृदयाचा, ह्रुदयसंबंधीचा, हृदयोत्तेजक.
Cardial कार्डिअल् a.--- ह्रुदय विषयक.
Cardigan कार्डिगन् n.--- शरीराच्या वरच्या भागावर घालायचा पुढून उघडणारा विणलेला अंगरखा.
Cardinal का(र्)डनल् a.--- मुख्य, विशिष्ट, प्रमुख, मुख्य, मूलभूत, मौलिक, श्रेष्ठ. (उदा. : Cardinal principles = मुख्य तत्वे, पायाभूत सिद्धांत ). n.--- पोपच्या मंडळात उच्च धर्माधिकारी; (१, २, ३, इ.) मूलभूत पूर्णांक-संख्या-वाचक (अक्षरलिखित) शब्द/आकृति.
Cardinal points का(र्)डनल् पाॅइंट्स् n.--- पूर्व, पश्चिम, उत्तर, व दक्षिण या चार दिशा.
Cardinal numbers का(र्)डनल् नम्बर्स् = Cardinals. n.---
Carding कार्डिंग् n.--- पिंजणे, पिंजारणे.
Carding कार्डिंग्
Cardio कार्डिअो - ‘ह्रुदय’ या अर्थाचे उपपद.
Cardiograph कार्डिअोग्राफ् n.--- ह्रुदयचलनाचा आलेख दाखविणारे यन्त्र.
Cardiography कार्डिअोग्राफी n.---
Cardiology कार्डिअाॅलजी n.--- हृदयाचे शास्त्र, त्यावरील ग्रंथ.
Care केअर् n.--- काळजी, जतन, पर्वा, सावधगिरी. v.i.--- काळजी/पर्वा करणे.
Career करीअर् n.--- वागणूक, वहिवाट, धांव, दौड.
Careful केअर्फुल् a.--- चिंताग्रस्त, सावध.
Carefully केअर्फुली ad.--- काळजीने, जपून.
Carefulness केअर्फुलनेस् n.--- काळजी, चिंता.
Careless केअर्लेस् a.--- निष्काळजी, बेफिकीर, गाफील, अविचारी, बेपर्वा.
Caret कॅरेट् n.--- काकपद, चुकल्याची खूण.
Caress करेस् v.t.---कुरवाळणे, गोंजारणे, आंजारणे-गोंजारणे. n.--- कुरवाळणे इ. क्रिया, प्रेमाचा स्पर्श, चुंबन, मुका.
Cargo कार्गो n.--- जहाजाचे भरताड, बारदान.
Caricature कॅरिकेचर् n.--- सोंग, नक्कल. v.t.--- नक्कल करून हसविणे, सोंग करणे.
Caries केरिईझ् n.--- (हाडे,दांत, इ. ची) झड/झीज.
Carman कार्मन् n.--- गाडीवाला, गाडीहाक्या.
Carmine कार्माइन् n.--- रंग देण्याची भडक लाल पूड.
Carnage कार्नेज् n.--- कत्तल, काटाकाटी, वाढ, हत्याकांड, संहारसत्र.
Carnal कार्नल् a.--- विषयासंबंधी, दैहिक, वैषयिक, उपभोग-विषयक.
Carnation कार्नेशन् n.--- गुलेणार, गुल् अनार.
Carnelian कार्नेलिअन् n.--- अकीक, तांबडा रंग.
Carnival कार्निव्हल् n.--- (जल्लोष/दंगल/कल्लोळ - युक्त) उत्सव/सण.
Carnivora कार्निव्होरा n.--- मांस खाणारा प्राणी.
Carnivorous कार्निव्होरस् a.--- मांस खाणारा.
Carol कॅरल् n.--- (भक्तीचे-आनंदाचे) गाणे, स्तोत्र, हर्षगान. v.i.--- (असे गीत) गाणे, गायानोत्सव करणे.
Carom कॅरम् n.--- पटावर मांडलेल्या टिकल्यांना नेम मारून पटाकडेच्या भोंकात पाडण्याचा एक खेळ.
Carousal कराऊझल् n.--- मनसोक्त मदिरापान.
Carouse कॅराउझ् n.--- मनसोक्त मदिरापान. v.i.--- मनसोक्त दारू पिणे, पानोत्सव करणे.
Carp का(र्)प् n.--- राही मासा, गोड्यापाण्यातील एक (विशेष खाण्यासाठी जोपासला जाणारा) एक मासा. v.i.--- दोष काढणे, तक्रार करणे, फांटे फोडणे, आढेवेढे घेणे.
Carpel कार्पेल् n.--- बीजकोश, एकदल.
Carpenter कार्पेन्टर् n.--- सुतार, बढाई, तक्षक
Carpentry का(र्)पेन्ट्री n.--- सुतारकाम, दारुकर्मन, तक्षशिल्प.
Carpet कार्पेट् n.--- जाजम, गालिचा, सतरंजी.
Carpus कार्पस् n.--- मनगट.
Carriage कॅरेज् / कॅरिज् n.--- गाडी, वाहन, हल, चालचलणूक, चाल.
Carrier कॅरिअर् n.--- हमाल, वाहक, वाहणारा. (शरीर इ. ची) ठेवण/बांधा, ढब
Carrion कॅरिअन् n.--- शिळे मांस, अखाद्य मांस.
Carrom=Carom
Carrot कॅरट् n.--- गाजर.
Carry कॅरि v.t.--- नेणे, वाहणे, दपटणे, स्थलांतर करणे, साधणे, निभावणे, गर्भित करणे, घडवणे.
Cart कार्ट n.--- गाडा, छकडा, रेकला. v.t.--- गाडीत घेणे.
Cartage कार्टेज n.--- वाहतूक.
Carte blanche कार्त् ब्लांश् n.--- कोरा कागद, कोरा चेक; पूर्ण मोकळीक, हवे ते लिहिण्याचा/करण्याचा अधिकार.
Cartel कार्टेल् n.--- लिखित विरोध/आव्हान; विरोधपत्र; (परस्परांच्या कैद्यांच्या मुक्ततेबद्दल) लिखित करार / समझोता; उत्पादन/भाव स्पर्धा नियंत्रणात ठेवणारा व्यापारी-संघ; विशिष्ट हितसंबंध रक्षिणारा गट.
Carter
Cartgrease कार्टग्रीस n.--- ओंगण, वंगण.
Cartilage का(र्)टिलिज् n.--- मऊ हाड, कूर्चा, कास्थी. (हिंदी : कुरकुरी, उपास्थि)
Cartographer कार्टोग्रफर् n.--- नकाशे बनविणारा. मानचित्रकार.
Cartographic कार्टोग्रफिक् a.--- नकाशे काढण्यासंबंधी.
Cartography कार्टो(टाॅ)ग्रफी n.--- नकाशे काढण्याचे शास्त्र, नकाशारूप चित्रण, मानचित्रण.
Carton का(र्)टन् n.--- पेटी, पेटिका, डबा. (संस्कृत- पिटकः , पेटकः , पेटा, मंजूषा , मंजूषिका).
Cartoon कार्टून n.--- हास्यकारक चित्र, व्यंगचित्र.
Cartouch कारटुश् n.--- काडतूस, काडतुसाची पेटी.
Cartridge कार्ट्रिज् n.--- काडतूस, रंग, दारुगोळा इ. भरलेली नळी/सुरळी/गुंडाळी.
Cartrut
Cartwheel कार्ट्व्हील् n.--- गाडीचे चाक ; (फिरत्या गाडीच्या चाकाप्रमाणे दावी किंव्हा उजवी) कोलांटी. v.i.--- अशी कोलांटी खाणे, आडवे कलंडणे.
Carucate कॅरुकेट् n.--- औत, आऊत.
Carve कार्व्ह् v.t.--- कोरणे, कापणे, खोदणे.