She-Shi

She शी pron.--- ती.
Sheaf शीफ् n.--- पेंढी, जुडी. v.t.--- पेंढ्या बांधणे.
Shear शिअर् v.t.--- कातरून ठीकठाक करणे. कातराणे, कापणे. (past tense --- sheared / shore. Past participle --- sheared / shorn).
Sheen शीन् n.--- तेज, चमक, चकचकीतपणा, लखलखाट.
Sheet-anchor शीट्-अॅङ्कर् n.--- (जहाजाचा) मोठा नांगर. मुख्य आधार.
Shekel शेकेल् n.--- नाणी, पैसा, अर्थलाभ.
Shelf शेल्फ् n.--- भिंतीत वा उभ्या चौकटीत वस्तु ठेवण्यास आधार, वा शोभा म्हणून आडवा बसवलेला फलक / पट्ट / पट्टी. (हिंदी : टांड (स्त्री.)).
Shell-shock शेल्-शॉक् n.--- मज्जातंतूची विकृति, मानसिक धक्का, धसका.
Shell-shocked शेल्-शॉक्ड् a.--- ‘Shell-shock’ ने बाधित / ग्रस्त. अंगात आलेला, आविष्ट.
Shelter शेल्टर् v.t.--- आश्रय धरणे. n.--- आश्रय, आधार.
Shepherd शेपर्ड् n.--- मेंढ्या राखणारा, मेंढपाळ.
Shepherdess शेपर्डेस् n.--- मेंढपाळाची स्त्री, धनगरीण.
Sherd शSर्ड् n.--- = Shard.
Sheriff शेरीफ् n.--- शेरीफ, कोतवाल.
Shibboleth शिबोलेथ् / शिबलेथ् n.--- परवलीचा शब्द (ज्यावरून एखाद्याचा गट, जात, देश, इ. ठरविता येईल); असे ओळख पटविणारे कोणतेही लक्षण.
Shield शील्ड् v.t.--- संरक्षण करणे. n.--- रक्षण, ढाल.
Shift शिफ्ट् v.t.--- जागा बदलणे, पालटणे, बदलणे. n.--- बदल, पाळत, हिकमत, सोडवण, कामाची पाळी. अपाय, अपसरण. (Rankings of many have changed: there have been both upward and downward shifts.)
Shimmy शिमी v.i.--- आखडू पावलांनी थरथरत जाणे.
Shin शिन् n.--- पायाची नळी, नडगी, अग्रजंबा.
Shindy शिण्डी n.--- भांडण, वाद, तंटा.
Shine शाइन् v.i.--- प्रकाशणे, चकाकणे, उजेड देणे, चमकविणे, बुद्धिप्रभाव दाखविणे. n.--- प्रभा, प्रकाश, कांति, चमक, चकाकी.
Shining शाइनिंग् n.--- तेज. a.--- प्रकाशमान, तेजस्वी.
Ship शिप् v.t.--- तारवांत भरणे, जहाजाने पाठविणे. n.--- तारू, गलबत, जहाज, आकाश-/अवकाश- यान.
Shipment शिप्मेंट् n.--- जहाजावर चढविण्याची / जहाजाने नेण्याची / पाठविण्याची प्रक्रिया. अशा चढविलेल्या / पाठविलेल्या मालाचे मान.
Shipper शिपर् n.--- जहाजाने वाहतूक करणारा.
Shipping शिपिंग् n.--- ‘Shipper’ चा धंदा, नौकानयन. जहाजरानी (हिंदी).
Shire शायर् n.--- परगणा, प्रांत.
Shirk शर्क् v.t.--- कामाची टाळाटाळ करणे.
Shirker शर्कर् n.--- कामचुकारू.
Shirt शर्ट् n.--- सद्रा, खमीस.
Shiver शिव्हर् v.i.--- शहारणे, थंडी वाजणे, अंगावर कांटा येणे, अंगावर शहारा येणे. (थंडीने किंवा तापाने) थरथर कापणे, कापरे भरणे, हुडहुडी भरणे.