cou-coy

coup de main कू द म्यँ n.--- एखादे ठिकाणी काबीज करण्यासाठी / विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी केलेला निकराचा हला, एलगार.
couple कपल् n.--- जोडी, जोडा, जोडपे, कैची.
couplet कप्लेट् n.--- दोहरा, बैत
courage करेज् n.--- धैर्य, हिम्मत, मर्दनकी, छाती.
courier कूरिअर् n.--- जासूद, हलकारा.
course कोर्स् n.--- चाल, गति, मार्ग, रोख, दिशा, वळण, ऋतु, परिपाठ, शर्यतीची जागा. कार्यपद्धति, (विशिष्ट विषयाच्या शिक्षणाचा, विशिष्ट काळाचा) अभ्यासक्रम. (आजारावरील विशिष्ट कालाचा) उपचारक्रम. भोजन-क्रमांत एका वेळी वाढण्याचा मुख्य खाद्यपदार्थ. असा पदार्थ वाढण्याचा भोजनक्रमांतील एक भाग (जसे प्रथम भात, मग भाकरी इ.). v.t.---पारध करणे, जलद धावणे.
courser कोर्सर् n.--- पारध करणारा, शर्यती घोडा.
court कोर्ट् n.--- कचेरी, सरकारवाडा, दरबार, लोक, आंगण. v.t.--- -ची मागणी करणे, ओढवून घेणे, -ला सामोरे जाणे, आर्जव करणे, मागणी घालणे, मनधरणी करणे.
court-martial कोर्ट्-मार्शल् n.--- सैनिकन्यायसभा.
courteous कोर्चिअस् a.--- सभ्य, सुशील, शिष्ट.
courtesan कोर्टिझन् n.--- कलावंतीण, वेश्या, कसबीण.
courtesy कर्ट्सि n.--- सभ्यपणाची रीत, भीड, आदर, उपचार, मेहेरबानी.
courting कोर्टिंग् n.--- मनधरणी (स्त्रियांची) करणे.
courtly कोर्ट्लि a.--- दरबारला साजेसा, सभ्य, शिष्टाचार संपन्न.
courtship कोर्ट्शिप् n.--- लग्नासाठी स्त्रीचे आर्जव.
courtyard कोर्ट्यार्ड् n.--- आंगण.
cousin कसिन् n.--- चुलत/आत्ते/मामे/मावस-भावंड.
cove कोव्ह् n.--- खाडी.
covenant कव्हनण्ट् n.--- करार, प्रतिज्ञा, करारनामा. v.t./v.i.--- विधि-अनुसार/कायदेशीर करार/समय/प्रतिज्ञा करणे. (The vendor does hereby covenant with the vendee that the vendor has full and absolute power to transfer the said property by sale.)
cover कव्हर् n.--- झाकण, आच्छादन, आडपडदा, आश्रय. v.t.--- झांकणे, पांघरूण घालणे, लपविणे, पुरेसे होणे, समावेश होणे.
covering कव्हरिंग् n.--- झाकण, वेष्टन, अभ्रा, पुष्टिपत्र.
covert कव्हर्ट् n.--- आडोसा, झाडी. a.--- गुप्त, चोरटा.
covet कव्हेट् v.t.----चा लोभ/लालूच/अभिलाष धरणे, -ची हाव धरणे.
covetous कव्हेटस् a.--- लोभी, हावरा, लोभिष्ट, लालचखोर, लालची.
covey कव्हे n.--- पक्षांचा कळप, झुंड, थवा.
cow कॉऊ(अ.व. cows, जुने अ.व. kine) n.--- गाय, धेनु. v.t.--- दबकावणे, हिम्मत मोडणे.
cowage(/Cowhage/Cowitch) काउइज् n.--- खाजरी, खाजकुइली. (ऑक्सफर्ड कोशानुसार ‘कावांच’ या हिंदी शब्दापासून).
coward काउअर्ड् n.--- भित्रा/भ्याड/नामर्द/नेभळा मनुष्य/व्यक्ति.
cowardice कॉवर्डिस् n.--- भित्रेपणा, नेभळेपणा, भीरुता.
cowboy कॉऊबॉय् n.--- गुराखी, गोपाळ.
cowpen कॉऊपेन् n.--- गोठा.
cowpox कॉऊपॉक्स् n.--- काढवलेल्या देवी, गोस्तन, शीतला.
coxcomb कॉक्स्कोम् n.--- अक्कडबाज, कुर्रेबाज.
coy कॉय् v.t.--- मुरका मारणे. a.--- मुरका मारणारी, लाजाळू, अनुत्सुक, आस्थाहीन.
coyly कॉय्ली ad.--- लाजाळूपणे