Roue रूए n.--- विषयासक्त मनुष्य.
Rouge रूझ् n.--- (अंगावर / गालावर) लावण्याचा कृत्रिम रंग.
Rough रफ् a.--- खडबडीत, खरखरीत, दांडगा, कच्चा, तुफानी, कठोर, रुक्ष, चरबट, स्थूल, क्षुब्ध, खवळलेला, वादळी. तंतुमय, चोथायुक्त. असंस्कृत, उद्धट, हिरवट.
Roughage रफिज् n.--- पोषणद्रव्यांपेक्षा तंतु व चोथा अधिक प्रमाणांत असलेला, विरेचनोपयोगी / मलविसर्गास आवश्यक खाद्यांश.
Roughdraw रफ्ड्रॉ v.t.--- खरडणे, ओरखडणे.
Roughness रफ्नेस् n.--- धसमुसळेपणा, रुक्षता, क्षुब्धता.
Roulette रूलेट् n.--- विविध आंकड्यांच्या विभागांनी अंकित फिरत्या चाकावर आधारित एक जुगाराचा खेळ. चक्रद्यूत.
Round राउन्ड् v.t.--- गोलाकार करणे. -च्या भोवती फिरणे. (off / out) : -ची सांगता / पूर्तता करणे, संपविणे. (off / up / down) : पूर्णांकांत व्यक्त करणे. (on): -वर झडप घालणे, -वर उलटणे. a.--- वाटोळा, गोलाकार, दीर्घ वर्तुळ, ठोक, घाऊक, पूर्ण, पुरा. n.--- मंडळ, पायरी, आवृत्ति, आवर्तन, गस्त, फेरी. ad.--- सभोंवार, फेऱ्याने, जरका मारून.
Roundabout राउन्ड्अबॉउट् a.--- गरक्याचा, फेऱ्याचा.
Roundly राउन्ड्लि ad.--- साफ, निखालस, खूप, त्वरेने, बळकट.
Rouse राउझ् v.t.--- जागृत करणे, उत्तेजित करणे.
Rout राउट् v.t.--- दाणादाण करणे, उत्तेजित करणे. n.--- दाणादाण, मोड, गर्दी, समुदाय, गलबला.
Route रूट् n.--- रस्ता, वाट, जाण्याचा मार्ग.
Routine रूटीन् n.--- परिपाठ, नित्यक्रम, नित्यकर्म.
Rove रोव्ह् v.t.--- भटकणे, फिरणे, हिंडणे.
Rover रोव्हर् n.--- भटकणारा, हिंडणारा, भटक्या.
Row रो n.--- ओळ, रांग, पंक्ति, माळ. v.t.--- वल्हवून नेणे.
Row n.--- दंगा, गोंधळ, धांदल, कोलाहल, कडाक्याचे भांडण, खडाजंगी, वादंग, बाचाबाची, कलह, तंटा, रावविवाद, विवादराव, (वि-)वादाक्रन्द, साक्रोशकलह.
Row राउ n.--- दंगा, गोंधळ, धांदल, कोलाहल, कडाक्याचे भांडण, खडाजंगी, वादंग, बाचाबाची, कलह, तंटा, रावविवाद, विवादराव, साक्रोशकलह. a.--- वादाक्रन्द.
Rowdy राउडी n./a.--- आडदांड मनुष्य, पुंड, गुंड, दुर्दांत, धटिंगण. a.--- हुच्चा, लुच्चा, सोदा, खट.
Royal रॉयल् a.--- राजाचा, राजास शोभणारा. n.--- एक जातीचा कागद.
Royalist रॉयलिस्ट् n.--- राजाचा अभिमान धरणारा.
Royalty रॉयल्टि n.--- राजेपणा, बादशाही, राजपद.
Rub रब् v.t.--- घासणे, घासून काढणे, चोळणे. n.--- घर्षण, मर्दन, अडचण, लचांड, टोमणा.
Rubbish रबिश् n.--- (निरुपयोगी) दगडमाती वगैरेचे तुकडे, कचरा, घाण, गबाळ, खरीप. v.t.--- -ला घाण / कचरा / रद्दी म्हणून निकालांत काढणे. -ला कुचकामी / कुचकामाचा ठरवणे. -ला कचऱ्याने घाण करणे.
Rubble रबल् n.--- दगडांचा / खड्यांचा ढीग, खडी.
Rubicon रूबिकॉन् रोमन इतिहासातील एक ओढा जो सीझरने ओलांडता त्याच्या व पॉम्पेच्या युद्धास तोंड लागले. To cross or pass Rubicon : (एखादे कृत्य करण्यासाठी) निर्णायक पाऊल उचलणे.
Rubric रूब्रिक् n.--- लाल / ठळक अक्षरांतील (वर्गीकरणदर्शक) शीर्षक.
Rubricate रूब्रिकेट् v.t.--- लाल रंगाने खूण करणे, लाल रंगाने दर्शविणे.
Ruby रूबि n.--- माणिक, लाल. माणिक-सारखा रंग. v.t.--- लाल / तांबडा करणे.
Ruck sack रक्सॅक् n.--- (प्रवाशाची) पडशी / पोतडी.
Rudder रडर् n.--- सुकाणूं.
Ruddy रडि a.--- तांबूस, टवटवीत, तुकतुकीत.
Rude रूड् a.--- दांडगा, रानटी, असभ्य, मस्त, कडक, तीव्र, जोराचा, भयंकर, उद्धट.
Rudely रूड्लि ad.--- उद्धटपणाने, दांडगाईने.
Rudiness रूडिनेस् n.--- दांडगेपणा, असभ्यता, अकुशलता.
Rudiment रूडिमन्ट् n.--- मूलतत्व, बीजतत्त्व, प्राथमिक सिद्धांत, प्रारंभावस्था, बीजावस्था.
Rudimental = Rudimentary
Rudimentary रूडमेन्टरी a.--- मौलिक, बीजभूत; ओबडधोबड, कच्चा; अविकसित, अपूर्ण, अपक्व. अवशेषस्वरूपांतील.
Rue रू v.t.--- रडणे, पस्तावा करणे, दुःख करणे. हळहळणे.
Ruefulness रूफुल्नेस् n.--- रडकेपणा, दुःखप्रदता.