Efficiency एफिशन्सि n.--- कार्यसाधकत्व, सत्व, परिणामकारित्व, प्रभाव.
Efficient एफिशिअन्ट् a.--- कार्यसाधक, कार्यजनक.
Effigy एफिजि n.--- प्रतिमा, बाहुली, पुतळा.
Efflorescence एफ्लोरेसन्स् n.--- फुले येण्याची वेळ, पुरळ, बुरशी, फुलांचा भर/बार.
Effluvium एफ्ल्युव्हिअम् a.--- दुर्गंधी, घाण.
Efflux एफ्लक्स् n.--- बाहेर येणे/निघणे, स्त्राव.
Effort एफर्ट् n.--- प्रयत्न, प्रयास, आयास.
Effrontery एफ्रंटरी n.--- उद्धटपणा, धिटाई, निर्लज्जपणा.
Effluge एफल्ज् v.i.--- चमकणे.
Effulgence एफल्जन्स् n.--- तेज, दीप्ति, चमक, झगमगाट.
Effulgent एफल्जन्ट् a.--- तेजस्वी, चकचकीत, देदीप्यमान.
Effuge एफ्यूज् v.t.--- ओतणे.
Effusion एफ्यूशन् n.--- बाहेर ओतणे, उत्सर्ग, उफाळा, उकळी, ऊत, आवेग.
Effusive इफ्यूसिव्ह् a.--- उफालणारा, ओसंडणारा, उत्कट.
Egality = Eguality
Egalitarian इगॅलिटेअरिअन् a.--- समतेचा पुरस्कार करणारा, समताप्रवण.
Egalitarianism इगॅलिटेअरिअॅनिझम् n.--- समतामार्ग, साम्यवाद.
Egg एग् n.--- अंडे, कवठ. v.t.--- फूस देणे.
Egg-palnt एग्प्लँट् n.--- वांग्याचे झाड, वांगे.
Egghead एग्हेड् n.--- बुद्धिजीवी/बुद्धिमान/व्यक्ति, पंडित, प्राज्ञ.
Egoism इगोइझम् n.--- अहंकार, अहंभाव.
Egoist इगोइस्ट् n.--- अहंमानी, अहंभावी.
Egotist ईगोटिस्ट् n.--- मीपणा बोलणारा, बढाईखोर.
Egregious इग्रीजिअस् / इग्रीजस् a.--- विलक्षण, लोकोत्तर, अन्यायाचा, धादांत चुकीचा, मूर्खपणाचा, बेछूट, बेलगाम.
Egress इग्रेस् n.--- बाहेर निघणे/जाणे.
Egression इग्रेशन् n.--- बाहेर निघणे/जाणे.
Eh ए inter.-- हाय, अहा, अरे, रे.
Eider आइडर् n.--- एक मोठ्या मऊ पिसाऱ्याच्या बदकाची जात, त्या जातीचे बदक.
Eiderdown आइडरडाउन् n.--- ‘Eider’ ची पिसे. अशा पिसांनी (किंव्हा अन्य मऊ द्रव्याने) भरून केलेली रजई.
Eight एट् a.--- आठ, अष्ट.
Eighteen एटीन् a.--- अठरा.
Eighth एट्थ् a.--- आठवा.
Eighty एटि a.--- ऐंशी.
Eikon = Icon.
Either ईदर् a.--- दोहोंतून एक, एकतर, अन्यतर.
Ejaculate इजॅक्युलेट् v.t.--- उद्धार काढणे. (मैथुनक्रियेत नरद्वारा) वीर्य बाहेर सोडणे.
Ejaculation इजॅक्युललेशन् n.--- वीर्यस्खलन, वीर्यपात.
Eject इजेक्ट् v.t.--- घालविणे, काढून देणे.
Eke एक् v.t.--- पुरविणे, लांबवणे. ‘Eke out’--- पुरवून वापरणे, टिकवून धरणे.
Elaborate इलॅबरेट् a.--- सविस्तर, लक्षपूर्वक व बारकाईने केलेला/योजिलेला. जटिल, गुंतागुंतीचा, भरगच्च. v.t.--- श्रमाने तयार करणे, -चे सविस्तर विश्लेषण करणे, चा सविस्तर खुलासा करणे. v.i.--- Elaborate on : च्या वर सविस्तर स्पष्टीकरण करणे/माहिती देणे.