lap-law

lap लॅप् n.--- बसलेल्या मनुष्याच्या पोट व मांड्या यांमधील पुढचा भाग, ‘मांडी’, अंक, उत्संग. एक भाग / हिस्सा / वळसा. v.t.--- एकावर एक घेऊन जोडणे. एकावर एक ठेवणे / राहणे. वॉर आवरण घालणे (उदा: waves lapped the beach), (द्रव पदार्थ) जिभेने उचलून सेविणे. (Lap up) अधाशीपणे, भराभर खाणे / पिणे.
laparectomy लॅपरेक्टमी n.--- आतड्याच्या बाजूचे छेदन / छेद.
laparo- लॅपरो prefix बाजू (चा), पार्श्वभाग-(-संबंधी) अशा अर्थाचे शब्दांतील पूर्वपद.
laparoscope लॅपरोस्कोप् n.--- पोटाच्या शस्त्रक्रियेत पोटांत घुसविण्याचे पारदर्शक द्रव्यनिर्मित उपकरण.
laparoscopic लॅपरोस्कोपिक् a.--- ‘Laparoscope-/ Laparoscopy- चा / -विषयक.
laparoscopy लॅपरोस्कोपी n.--- ‘Laparoscope’ ने करण्याची शस्त्रक्रिया / शल्यक्रिया.
laparotomy लॅपरॉटमी n.--- पोटाच्या बाह्य वेष्टनाचा छेद करून अंतर्भागात शल्यक्रिया करण्याची प्रक्रिया.
lapdog लॅप्डॉग् n.--- कुलुंगे कुत्रे.
lapidary लॅपिडरि n.--- जवाहिरी, जवाहिऱ्या.
lapideous लॅपिडिअस् a.--- पाषाणमय, पाषाणी.
lapse लॅप्स् v.t.--- वाहणे, ढळणे, घसरणे (from/into), एकाकडून दुसऱ्याकडे जाणे. n.--- कालौघ, कालव्यय. कालावधि, काळक्षेपामुळे / वापर नसल्यामुळे अधिकारक्षय/अधिकारलोप, व्यपगति, प्रवाह, गति, ढळ, सवलत, च्युति. (लहान) चूक, प्रमाद, त्रुटि. V.i.--- (काळाचे) निघून जाणे / संपणे / संपून जाणे / पुढे सरणे. (अधिकार इ. चे) नाहीसे / व्यपगत / लुप्त होणे, संपणे.
lapsed लॅप्स्ड् a.--- ढळलेला, खाली आलेला / घसरलेला. निघून गेलेला, नाहीसा / लुप्त झालेला, व्यपगत.
laptop लॅप्टॉप् a./n.--- = Laptop computer. लहान आकाराचा (मांडीवर / पुढ्यात घेऊन वापरण्याजोगा) (संगणक).
lapwing लॅप्विंग् n.--- टिटवी.
larceny लार्सेनि n.--- चोरी, चौर्यकर्म.
lard लार्ड् n.--- पुष्ट करणे. n.--- डुकराची चरबी.
large लार्ज् a.--- मोठा, लांबरुंद, पुष्कळ, प्रशस्त.
largess लार्जेस् n.--- बक्षिस, देणगी, पारितोषिक, औदार्य.
lark लार्क् n.--- भारद्वाराज, चंडोल, चैन, गम्मत, थट्टा, मस्करी.
larum लॅरम् n.--- हाक, कुई, भय-सूचना.
larynx लॅरिंक्स् n.--- स्वरयंत्र.
lascivious लॅसिव्हिअस् a.--- स्त्रीलंपट, कामातुर, कामी.
laser लेझर् n.--- “Light Amplification by Simulated Emission of Radiation” चे संक्षिप्त रूप : अतिशय बारीक पण तीव्र शक्तीच्या, अगदी एकमेव दिशेस जाणाऱ्या व अगदी एकाच आवर्तनमानाच्या (collimated and monochromatic) प्रकाश किरणांचे झोत सोडणारे यंत्र / उपकरण.
lash लॅश् v.t.--- मारणे, टोमणा देणे, फटकावणे, बोडती करणे. n.--- फटका, टोमणा, कोरडा, शब्दप्रहार.
lass लॅस् n.--- तरुणी, पोरगी, आडबायको.
lassitude लॅसिट्यूड् n.--- सुस्ती, मांद्य, ग्लानि, मंदपणा, शैथिल्य.
lasso लॅसो n.--- (जनावरांना पकडण्याचा चामड्याचा) फास. v.--- ‘Lasso’ ने पकडणे / रोखणे.
last लास्ट् v.i.--- टिकणे, निभाने. v.t.--- -ला पुराणे, पुरून उरणे. a.--- शेवटचा, अखेरीचा. n.--- कलाबतू, शिंगोटी. ad.--- शेवटी, अखेर.
lasting लास्टिंग् n.--- टिकाव, निभाव, तग.
lastly लास्ट्लि ad.--- शेवटी, अंती, सरतेशेवटी.
latch लॅच् v.t.--- खिटी घालणे, फिरकी फिरविणे, बंद करणे. n.--- खिटी, फिरकी, कडी.
latchet लॅचेट् n.--- बुटाचा बंद, वादी, फीत.
late लेट् a.--- उशीरा आलेला, मागचा, माजी, आधुनिक. ad.--- उशीराने, मागून, नुकता.
latency लेटन्सी n.--- अव्यक्तता, प्रच्छन्नता, सुप्तावस्था.
lateness लेट्नेस् n.--- उशीर. Lately लेट्ली ad.--- अलीकडे.
latent लेटंट् a.--- प्रच्छन्न, गुप्त, दडलेला.
later लेटर् a.--- अलीकडचा, नुकता, थोड्यादिवसांचा.
laterite लॅटराइट् n.--- लाल रंगाच्या दगडाचा / खडकाचा एक प्रकार.
lather लॅदर् n.--- साबणाचा फेस.
lathwork लाथ्वर्क् n.--- ओमण, रीप.
lathy लॅथि a.--- काटकोळा, कागदी जवान, लुकडा.
latitude लॅटिट्यूड् n.--- रुंदी, अंतर, अक्ष, आकार.
latitudinarian लॅटिट्यूडीनेरिअन् a.--- धर्मशिथिल, स्वैर. n.--- धर्मलंड, मनसोक्त वागणारा.
latrine लॅटिन् n.--- शौचकूप, मुत्री, संडास.
latter लॅटर् a./n.--- पाठीमागचा, दुसरा, अर्वाचीन, नंतरचा, अपर, मागला, अलीकडील. (pl. Latter)
lattice लॅटिस् n.--- जाळीदार काम. जालरचना. v.t.--- जाळी करणे.
laud लॉड् v.t.--- स्तुति करणे. n.--- स्तुति, प्रशंसा, वाहवा.
laudable लॉडेबल् a.--- स्तुत्य, वंदनीय, वर्णनीय.
laudanum लॉडेनम् n.--- अफूचा अर्क.
laudatory लॉडेटरी a.--- स्तुतिपाठक, प्रशंसाकार.
laugh लाफ् v.t.--- हसणे. v.i.--- उल्हास करणे. n.--- हास्य, परिहास, हांसणे.
laughable लाफेबल् a.--- हासण्याजोगा, हास्योत्पादक.
laughingly लाफिंग्लि ad.--- हांसत, हंसत हंसत.
laughter लाफ्टर् n.--- हंशा, हंसे, हांसू, हास्य.
launch लाँच् v.t.--- लोटणे, (गलबत) फेंकणे.
launder लॉण्ड(र्) v.t.--- (कपडे इ.) धुणे. -ला स्वच्छ करणे / चांगले / कायदेशीर रूप देणे.
launderer लॉन्डरर् n.--- धोबी, परीट.
launderette लॉण्ड्रेट् n.--- आपापले कपडे आपण स्वतः धुवून नेण्याची जागा. स्वयंसेवा धुलाईकेंद्र.
laundry लॉण्ड्री n.--- कापडी धुण्यास देण्याचे दुकान. धुलाई केंद्र. कपडे धुण्याची जागा. धुलाईचे (धुवायचे / धुतलेले) कपडे.
laureate लॉरिएट् a.--- ‘laurel’ वृक्षाच्या परणांनी / पर्णकृतींनी बनविलेल्या माळेने सन्मानित / विभूषित. अशा मालेचा. सन्माननीय. n.--- माननीय, कविश्रेष्ठ / विद्वद्वर्य. राजकवि, कविराज.
laureation लॉरिएशन् n.--- ‘laureate’ करण्याची प्रक्रिया / विधि.
laurel लॉरेल् n.--- एक वृक्षविशेष. या वृक्षाचा पल्लव / पल्लवमाला (सन्मानाचे / विजयाचे प्रतीक / भूत) v.t.--- ‘laurel’ ने भूषविणे.
lava लाव्हा n.--- ज्वालामुखीतून निघणारा तप्तरस.
lavage लॅव्हिज् n.--- (वमनकारी द्रव्याने) उलट्या आणून पॉट साफ करण्याची क्रिया.
lavatory लॅव्हटरी n.--- धुण्याचे / आंघोळीचे भांडे. हातपायतोंड धुण्याची जागा. शौचगृह, शौचालय.
lavender लॅव्हेन्डर् n.--- एक सुवासिक वनस्पति.
laver लेव्हर् n.--- धुण्याचे भांडे, घंगाळ, तस्त.
lavish लॅव्हिश् v.t.--- उधळणे, खर्च करणे. a.--- उधळ्या.
law लॉ n.--- कायदा, निर्बंध, धर्मशास्त्र, नियम, न्याय, नीति.
lawful लॉफुल् a.--- कायदेशीर, हक्काचा, निर्दोष.
lawmaker लॉमेकर् n.--- कायदे करणारा, स्मृतिकार.