Dredge ड्रेज् n.--- नदीतील गाळ काढण्याचे यंत्र. v.t. (up, out)--- उकरून/उपसून काढणे, (शोधून काढून) उजेडांत आणणे. गाळ काढून (नदी, कालवा, इ. ची) खोली वाढविणे.
Dregs ड्रेग्ज् n.--- रेंदा, खरवड, गदळ, गाळ.
Drench ड्रेन्च् v.t.--- घोट्याने पाजणे, चिंब भिजविणे. n.--- गुरांना घोट्याने पाजावायाचे औषध.
Dress ड्रेस् v.t. and v.i.--- पोषाख करणे, कपडे नेसणे/नेसवणे, शृंगारणे, साफ करणे, कमविणे, शिजविणे, विंचरणे. n.--- पोषाख, पेहराव, वस्त्रे.
Dresser ड्रेसर् n.--- वस्त्र नेसणारा. रंगमंचावरील कपड्याची/पोषाखाची व्यवस्था पाहणारा माणूस. अनेक फळ्या/पट्ट व कप्पे असलेली सामान ठेवण्याची स्वयंपाकघरातील जागा.
Dressing-room ड्रेसिंग्रूम् n.--- पोषाख करण्याची खोली.
Dressy ड्रेसि a.--- छानछोकीदार.
Dribble ड्रिबल् v.t.--- थेंबाथेंबाने (पाणी इ.) सोडणे / वाहवणे. (फुटबॉल इ. खेळात) चेंडू आपल्या नियंत्रणात घेऊन नुसता इकडे तिकडे टोलवणे. (प्रश्न, विषय)टोलवीत राहणे. v.i.--- थेंबाथेंबाने वाहणे, लाळ गाळणे, ठिबकणे, थेंब थेंब गळणे. n.--- (अल्प) ओहोळ, (लहान) थेंब. टोलवाटोलवी (विशे. खेळातील चेंडूची).
Drift ड्रिफ्ट् v.t. and v.i.--- (प्रवाहाबरोबर)वाहत जाणे / वाहविणे, ओझ्याबरोबर वाहणे, गोळा/ढीग होणे/करणे, तरंगणे. n.--- लोंढा, लोट, रोख. प्रवाहामुळे वाहत जाण्याची क्रिया.
Drift ice ड्रिफ्ट् आइस् n.--- वाहून आलेला बर्फ.
Drill ड्रिल् v.t.--- कवाईत शिकविणे, सामात्याने भोक पाडणे.
Drink ड्रिंक् v.t.--- पिणे, पिऊन घेणे, तहान भागविणे, मद्यपानोत्सव करणे. n.--- पेय पदार्थ. To do one’s health/to do to one’s health --- एखाद्यास आरोग्य चिंतीत मद्य पिणे, एखाद्याच्या आरोग्यप्रीत्यर्थ मद्यपान करणे.
Drinker ड्रिंकर् n.--- पिणारा.
Drip ड्रिप् n.--- गळती, ठिबकणी, स्त्रव-/स्त्राव-/स्त्रवण-/स्त्रावक-/स्तुति-/ठिबक-/-यंत्र. v.i.--- टिपटिप गळणे/गाळणे, स्त्रावणे.
Dripstone ड्रिप्स्टोन् n.--- कगणीचा दगड.
Drive ड्राइव्ह् v.t.--- हाकलून देणे, गाडी हांकणे, गाडींतून हवा खाण्यास जाणे, लाटालाटी करणे, निकड लावणे, दडपणे, खोवणे, जाणे, चालणे, धावणे. n.--- गाडीत बसून जाण्याचा रस्ता.
Driver ड्राइव्हर् n.--- गाडीवाला, हांकणारा, चालक.
Drivel ड्रिव्हल् v.t. and v.i.--- लाळ गाळणे/गळणे; बरळणे. n.--- लाळ/बडबड.
Drizzle ड्रिझल् v.i.--- बुरबुर पडणे. n.--- पावसाची बुरबुर.
Droit ड्रॉइट् n.--- हक्क, कायदा, न्याय.
Droll ड्रोल् a. and n.--- हास्यरसप्रवण, चमत्कारिक, कौतुकाचा, मौजेचा, विनोदी, गमतीदार, खट्याळ.
Drollery ड्रोलरी n.--- विनोद, थट्टा, थट्टामस्करी, विदूषकी चेष्टा, हास्यास्पद लीला.
Dromedary ड्रामेडरी n.---
Drone ड्रोन् n.--- फुकटखाऊ, भोजनभाऊ, गुणगुण. मधमाशांचा नर. चालकहीन / दूरनियंत्रित विमान / अस्त्र / जहाज. v.i.--- भोंSS असा आवाज काढणे. रटाळ / कांटाळवाणे भाषण करणे. (‘12 killed in US drone attacks on militant hideouts’ (news headline)).
Drool ड्रूल् v.--- लाळ गाळणे. D.(over)--- चे कोडकौतुक करणे.
Droop ड्रूप् v.i.--- गळणे, मान टाकणे, ग्लानि येणे, लोंबणे, खाली झुकणे. खिन्न होणे, हताश होणे, गळून जाणे, हताश होणे, झुरणे. n.--- खिन्न/हताश अवस्था.
Drop ड्रॉप् v.t.--- थेंब पाडणे, सांडणे, सोडणे, गमावणे, थेंबथेंब गळणे, पाझरणे, तहकूब करणे, अवचित येणे. n.--- थेंब, ठिपका, चमकदार वस्तु, पडदा, झडप.
Droppy ड्रूपी a.--- लोंबणारा, लोंबता, झुकता.
Dropsical ड्रॉप्सिकल् a.--- उदररोगाचा, उदरी.
Dropsy ड्रॉप्सि n.--- उदररोग, जलोदर, उदर, शरीरघटकातील अतीवजलसंचयाची विकृति.