inq-ins

inquest इन्क्वेस्ट् n.--- चौकशी, शोध, तपास.
inquire इन्क्वायर् v.t. and v.i.--- पुसणे, समाचार घेणे, चौकशी करणे, प्रश्न करणे.
inquiry इन्क्वायरी n.--- चौकशी, विचारपूस, शोध.
inquision इन्क्विझिशन् n.--- चौकशी, तपास.
inroad इन्रोड् n.--- स्वारी, दौड, धाड.
insalivate इन्सॅलिव्हेट् v.t.--- चावून / चघळून (अन्न) लाळयुक्त करणे.
insane इन्सेन् a.--- वेडापिसा, विक्षिप्त, वेडगळ.
insatiate इन्सेशिएट् a.--- हावरा, अधाशी, वखवखलेला.
inscribe इन्स्क्राइब् v.t.--- कोरणे, लिहिणे, खोदणे.
inscription इन्स्क्रिप्शन् n.--- शिलालेख, ताम्रपट.
inscrutable इन्स्क्रूटबल् a.--- अनाकलनीय, अगम्य, गूढ, अभेद्य.
insect इन्सेक्ट् n.--- किडा, कृमि, कीट, कीटक, क्षुद्र जीव, तुच्छ जीव.
insecure इन्सिक्युअर् a.--- धोक्याचा, असुरक्षित, भयाचा.
insecurity इन्सिक्युरिटि n.--- असुरक्षितपणा, भय, धोका.
inseminate इन्सेमिनेट् v.t.--- -मध्ये बीजारोपण, -चे गर्भाधान करणे.
insemination इन्सेमिनेशन् n.--- बीजारोपण, गर्भाधान, बीजप्रदान.
insensate इन्सेन्सेट् a.--- अविचारीपणाचा, विवेकशून्य, मूर्ख, विवेकहीन.
insensibility इन्सेन्सिबिलिटी n.--- बधिरता, बेसावधपणा, अगोचरता, नष्टेन्द्रियता.
insensible इन्सेन्सिबल् a.--- सुना, बधिर, बेसावध.
inseparable इन्सेपरेबल् a.--- नित्यसंबंधी, अभेद्य.
insert इन्सर्ट् v.t.--- आत घालणे, आत शिरणे.
inshore इन्शोर् a.--- किनाऱ्याजवळचा.
inside इन्साइड् n.--- आतील बाजू, आतल्या बाजूचा.
insidious इन्सिडिअस् a.--- धूर्तपणाचा, बनेलपणाचा, कावेबाज, धोकेबाज, लबाड.
insight इन्साइट्
insignificant इन्सिग्निफिकन्ट् a.--- निरर्थक, क्षुल्लक, हलका, लहान.
insincere इन्सिन्सिअर् a.--- खोटा, कृत्रिम.
insinuate इन्सिन्युएट् v.t.--- पटकावणे, चलाखीने हस्तगत करणे, (परोक्षपणे / वयंगार्थाने) सूचित करणे, -चा आरोप (परोक्षपणे / वयंगार्थाने) सूचित करणे.
insinuation इन्सिन्युएशन् n.--- सूचित केलेला व्यङ्गार्थ, तिरकसपणे, अप्रत्यक्षपणे केलेला आरोप.
insipid इन्सिपीड् a.--- मिळमिळीत, अळणी, पाणचट.
insist इन्सिस्ट् v.i.--- आग्रह धरणे, फसवणे.
insnare इन्स्नेअर् v.t.--- फांशात धरणे, फसवणे.
insociable इन्सोशिएबल् a.--- घुम्या, माणूसघाण्या.
insolate इन्सोलेट् v.t.--- उन्हात ठेवणे, सूर्यपूट देणे.
insolence इन्सलन्स् n.--- स्वतःची योग्यता / स्थान / पायरी / औचित्य सोडून केलेले वर्तन, औद्धत्य, मर्यादाभंग, उद्दाम वर्तणूक, बेताल वर्तणूक.
insolent इन्सलन्ट् a.--- उद्दाम, बेताल, अमर्याद, मगरूर, उद्धट, मगरुरीचा.
insolvency इन्सॉल्व्हेन्सि n.--- नादारपणा, नादारी.
insolvent इन्सॉल्व्हेन्ट् n.--- नादार, दिवाळे वाजलेला मनुष्य.
insomnia इन्सोम्निआ n.--- निद्रानाश.
insomniac इन्सोम्निअॅक् n.--- निद्रानाश जडलेला.
insouciance इंसूस्यांस् n.--- निष्काळजीपणा, बेफिकीरी, औदासीन्य, निश्चिन्तता, लीला, सहजता, यत्नशून्यता, सलीलता.
insouciant इन्सूसियंट् a.--- निश्चिन्त, बेफिकीर, बेपर्वा, यत्नशून्य, सहजावस्थ, सलील.
inspect इन्स्पेक्ट् v.t.--- पाहणी करणे, तपासणे.
inspection इन्स्पेक्शन् n.--- चौकशी, पाहणी, शोध.
inspector इन्स्पेक्टर् n.--- पाहणी करणारा, तपासनीस.
inspiration इन्स्पिरेशन् n.--- साक्षातकारदायी/प्रबोधक दैवी प्रभाव, प्रेरणा, सफुर्ति, स्फुरण. स्फुरणदायी व्यक्ति / वस्तु. उत्स्फूर्त विचार / कल्पना.
inspirational इन्स्पिरेशनल् a.--- ‘inspiration’ संबंधीचा, स्फुरणदायी.
inspire इन्स्पायर् v.t.--- श्वासाने आत घेणे (फुफुसांत), प्रेरणा / सफुर्ती देणे, प्रभावित करणे, श्वासोच्छ्वास करणे.
instability इन्स्टॅबिलिटि n.--- अस्थिरता, असुरक्षितपणा.
install / Instal इन्स्टॉल् v.t.--- (अधिकारपद इ. वर) (उपचारपूर्वक) स्थापिणे, उभारणे, राज्याभिषेक करणे, वस्त्रे देणे, प्रतिष्ठा करणे.
installation इन्स्टलेशन् n.--- (उपकरण / यंत्रणा / व्यवस्था इ, ची) स्थापना.
instalment इन्स्टॉल्मण्ट् n.--- (कर्ज आदी च्या परतफेडीचा / अन्य कार्यपूर्तीचा) हप्ता, आंशिक पूर्ति / भरपाई. कार्यपूर्तीच्या अनेक भागांपैकी एक. हिस्सा.
instance इन्स्टन्स् n.--- क्षण, उदाहरण, दृष्टांत.
instant इन्स्टण्ट् a.--- चालू, सध्याचा, तेंव्हाचा; चालू महिन्याचा; तात्काळ येणारा / होणारा / बनणारा.
instate इन्स्टेट् I. in, into - (एखाद्याची) (एखाद्या पदी / स्थानी) स्थापना करणे; I. with - (एखाद्यास) -ने युक्त करणे.
instead इन्स्टेड् ad.--- बद्दल, ऐवजी, जागी.
instep इन्स्टेप् n.--- मनुष्याच्या पायाचा वरील कमानदार पृष्ठभाग. या भागास झाकणारा जोड्याचा / पादत्राणाचा / पायमोजाचा भाग.
instigate इन्स्टिगेट् v.t.--- वाईट कामास प्रवृत्त करणे, फूस देणे, उठावणी करणे.
instill / Instil इन्स्टिल् (in / into) v.i.--- थेंबाथेंबाने आत घालणे / जिरविणे, हळू हळू गेली उतरविणे / आत्मसात करावयास लावणे / मुरविणे.
instinct इन्स्टिंक्ट् n.--- अंगची बुद्धि, उपजत स्वभाव.
institute इन्स्टिट्यूट् v.t.--- सुरू करणे, स्थापिणे.
institution इन्स्टिट्यूशन् n.--- स्थापित मंडळी, शाळा.
instruct इन्स्ट्रक्ट् v.t.--- शिकविणे, आज्ञा करणे.
instruction इन्स्ट्रक्शन् n.--- शिक्षण, सूचना.
instrument इन्स्ट्रुमेंट् n.--- हत्यार, यंत्र, कारण, लेख, उपकरण, साधन, निमित्त.
instrumentality इन्स्ट्रुमेन्टॅलिटि n.--- प्रतिनिधिभूत अंग.
insubordinate इन्सबॉर्डिनेट् a.--- आज्ञापालन ना करणारा, आज्ञा भंग करणारा.
insubordination इन्सबॉर्डिनेशन् n.--- आज्ञाभंग, आज्ञेचे उल्लंघन.
insufferable इन्सफरेबल् a.--- दुःसह, असह्य.
insufficient इन्सफिशन्ट् a.--- अपुरता, अयोग्य.
insulin इन्स्यूलिन् n.--- सेविलेल्या पिष्टमय पदार्थांच्या (carbohydrates) च्या) पचनास उपयुक्त, रक्तांतील सरावलेला (glucose ला) मर्यादित ठेवणारे, स्वादुपिंडातून स्त्रवणारे प्रथिनात्मक (pancreas) संप्रेरक (hormone).
insult इन्सल्ट् n.--- उपमर्द, मानखंडना, अपमान. v.t.--- अपमान / उपमर्द करणे.
insurance इन्शूअरन्स् n.--- विमा.
insure इन्शुअर् v.t.--- विमा करणे. v.i.--- विमा उतरणे.
insurgence / Insurgency इन्सर्जन्स् / इन्सर्जन्सी n.--- बंडखोरी.
insurgent इन्सर्जंट् n.--- सरकारवर उठलेला मनुष्य.