Hem-Het

Hem हेम् v.t.--- तुरपणे, वेढणे, खांकरणे. n.--- गोठ, लोड, कपड्या-/कापडा- चा काठ. घसा मोकळा करण्याची / खाकरण्याची क्रिया/आवाज. H. in/about/up/round: घेरणे. घेरून आवर घालणे, नियंत्रित करणे, नियंत्रणात / लगामात घेणे. खाकरणे, (बोलण्यात) चाचाराने, अडखळणे.
Hemicrania हेमिक्रेनिया n.--- डोक्याच्या अर्ध्या भागातील वेदना, अर्धशिशी.
Hemisphere हेमिस्फिअर् n.--- गोलार्ध, भूगोलार्ध.
Hemistich हेमिस्टिक् n.--- श्लोकार्ध, वृत्तार्ध.
Hemlock हेम्लॉक् n.--- एक विषारी वनस्पति. अशा वनस्पतीपासून बनवलेले विषारी द्रव्य / रसायन.
Hemophilia n.---= Haemophilia
Hemorrhage = Haemorrhage
Hemorrhoid = Haemorrhoid
Hemp हेम्प् n.--- ताग, अंबाडी, सण, भांग.
Hen हेन् n.--- कोंबडी, कुक्कुटी.
Hence हेन्स् ad.--- एथून, आंतापासून, यामुळे.
Henceforth हेन्स्फोर्थ् ad.--- इतःपर, यापुढे.
Henchman हेंच्मॅन् n.--- नोकर, हुजर्या, अनुचर, पाईक, कट्टर.
Henna हेना
Hepatitis हेपटाइटिस् n.--- यकृताचा (liver) विकार, पित्तदोष.
Heptagon हेप्टॅगॉन् n.--- सप्तकोणाकृति.
Her हर् pron.--- तिचा, तिला. Herself हर्सेल्फ् --- स्वतः ती.
Herald हेराल्ड् n.--- नकीज, शिंगाड्या, वार्ताहर, उद्घोषक, आगमनाची आरोळी / सूचना देणारा, दूत, अग्रदूत. v.--- आगमनाची (पूर्व) सूचना देणे / घोषणा करणे. v.t.--- प्रसिद्ध करणे.
Herb हर्ब् n.--- वनस्पति, औषधि, बुटी, बुटीपासून येणारी लहान वनस्पती.
Herbal हर्बल् a.---
Herculean हर्क्यूलिअन् a.--- महत्प्रयासाचा.
Herd हर्ड् v.t.--- कळपाने राहणे. n.--- कळप, झुंड.
Herdsman हर्ड्स्मन् n.--- धनगर, गोप, गुराखी.
Here हिअर् ad.--- येथे, इकडे, इहलोकी, इहजन्मी.
Hereafter हिअर्आफ्टर् ad.--- पुढे, पुढच्या काळांत.
Hereditary हेरेडिटरि a.--- वंशपरंपरागत, पिढीजात.
Heredity हेरेडिटी n.--- सृष्टीच्या नवप्रसूतिक्रमांत अनुवंशाने पिढ्यांतून उतरत जाणारा गुणसमुच्चय. असे गुणसंक्रमण. अनुवंश(-प्रक्रिया).
Heresy हेरिसी n.--- पाखंडमत, पाखंड, थोतांडमत, परस्पराविरोधी / संप्रदायविरोधी मत.
Heretic हेरेटिक् a.--- अश्रद्ध. संप्रदायभ्रष्ट. n.--- पाखंडी, कुमार्गी.
Herewith हिअर्वुइथ् ad.--- यासोबत, ह्यासहित.
Heritage हेरिटेज् n.--- वतन, वारसा, वडिलोपार्जित मिळकत.
Hermaphrodite हS(र्)मॅफ्रडाइट् n.--- उभयलिंगी- / नपुंसक- / तृतीयलिंगी- प्राणी/वनस्पति. हिजडा. शिखंडी. परस्परविरोधी गुणधर्माची व्यक्ति / वस्तु (पहा: ‘Eunuch’)
Hermaphroditic हS(र्)मॅफ्रडाइटिक् a.--- ‘Hermaphrodite’ - विषयक / -लक्षणयुक्त.
Hermetic / Hermetical हर्मेटिक्(ल्) a.--- हवाबंद, बाह्यप्रभावापासून विलग. अद्भुत / अतींद्रिय विषयक. n.--- अद्भुत रसायनशास्त्रवेत्ता, रससिद्ध.
Hermetically हर्मेटिकलि ad.--- एकजीव होईल अशा रीतीने; हवाबंदरीतीने; पूर्ण घट्टपणे.
Hermit हSर्मिट् n.--- एकाकी / एकांतात राहणारा तपस्वी.
Hermitage हर्मिटेज् n.--- आश्रम, मठ, पर्णकुटि.
Hernia हS(र्)निअ n.--- शरीरांतर्गत अवयव वा त्याचा भाग सैल पडून / वक्र होऊन / सुजून त्यामुळे त्या अवयवाच्या आवरणास फुगवटा येण्याची विकृति, अंतर्गळ (हिंदी: आन्त्रवृद्धि). Inguinal hernia: जांघेतील अंतर्गळ. Umbilical hernia: नाभिप्रदेशातील अंतर्गळ. Strangulated / Obstructed hernia: ज्यांत सरकलेला अवयव आवळला / पिळला जातो असा अंतर्गळ.
Hernio ‘Hernia’ संबंधीचा’ अशा अर्थाचे समांसातील पूर्वपद.
Hernioplasty हर्निओप्लास्टी n.--- ठिगळ लावून / रफू करून अंतर्गळ दूर करण्याची शस्त्रक्रिया.
Herniotomy हर्निओटोमी n.---
Hero हीरो n.--- मर्द, शूर, शूराचा, वीराचा.
Heroic हिरॉइक् a.---
Heroin हेरोइन् n.--- अफू (opium) च्या चिका(resin मधून काढलेल्या ‘Morphine’ पासून बनविलेला अंमली पदार्थ.
Heroine हेरॉइन् n.--- नायिका, बहाद्दर स्त्री.
Heroism हेरोइझम् n.--- मर्दुमकी, शौर्य, वीरश्री.
Heron हेरन् n.--- करकोचा पक्षी, बगळा, बगळी.
Herpes हर्पीझ् n.--- नागीण (एक त्वचारोग).
Herpetic हर्पेटिक् a.--- ‘Herpes’ संबंधीचा.
Herpetology हर्पिटोलॉजी n.--- सर्पविद्या, जीवशास्त्रातील सरपटणाऱ्या जीवांचा भाग. Herpes रोगाचे शास्त्र.
Hesitate हेझिटेट् v.i.--- कांकू करणे, गुटमळणे.
Hesitation हेझिटेशन् n.--- कांकू, धरसोड, टंगळमंगळ.
Hesperian हेस्पीरिअन् a.--- पश्चिमेकडील, पश्चिम.
Hesperus हेस्पिरस् n.--- शुक्राचा तारा.
Hessian हेशन् n.--- गोणपोट, तरट, बारदान.
Hest हेस्ट् n.--- आज्ञा, हुकूम.
Heterogeneity हेटरोजीनीइटी n.--- वैविध्यपूर्णता, बहुजिनसीपणा. पहा: ‘homogeneity’.
Heterogeneous हेटरॉजीनियस् / हेटरोजीनस् a.--- विविधांगी, वैविध्यपूर्ण; अनेकोद्भव; असवर्ण, विधर्मी, भिन्नस्वभावी, विजातीय. पहा: Homogeneous.
Heterosexism हेटरसेक्सिझम् n.--- भिन्नलिंगी व्यक्तींमधील लैंगिक संबंधाचाच पुरस्कार करणारी आणि समलिंगी लैंगिक संबंधाबद्दल / असे संबंध ठेवणाऱ्याबद्दल तिरस्कार / भेदभाव करणारी विचारसरणी / वाद.
Heterosexual हेटरसेक्शुअल् a.--- भिन्नलिंगी लैंगिक संबंधच पासनात करणारी (व्यक्ति).