bite / Bit घास, थोडासा, तुकडा अंश.
blithe ब्लाइद् a.--- सुखी, आनंदी, बेपर्वा, निश्चिंत, बेफिकीर.
bolster बोल्स्टर् n.--- टेकायचा तक्क्या/लोड. v.t.--- आश्रय देणे, आधार देणे, बळकट करणे.
bower बावर् n.--- लातकुंज, लतागृह, झाडाखालील सावलीची जागा, लतामंडप. स्त्रियांची स्वतंत्र बसायची खोली. v.t--- एखाद्या व्यक्तीला किंवा जागेला लता, वेली, झाडाझुडपांनी वेढणे /आच्छादिणे, झाडावेलींच्या सावलीत एखाद्याला आसरा/निवारा देणे.
boxy a.--- चौरस. लहान व कोंदट.
brazen ब्रेझन् a.--- निर्लज्ज, कोडगा, निगरगट्ट, बेशरम. पितळ्याचा, पितळ्यासारखा. v.t.--- निर्लज्ज/कोडगा बनविणे.
bricklayer ब्रिक्लेअर् n.--- गवंडी, विटांचे बांधकाम करणारा.
brood n.--- पिल्ले, मुलेबाळे, अंड्यातून एकाच वेळी बाहेर आलेल्या पिल्लांचा (विशेषतः पक्षयांच्या) समुदाय. v.t.--- अंडी उबविणे. v.i.--- (एखाद्या क्लेशदायक गोष्टीबद्दल) खोलवर विचार करणे.
brunt ब्रण्ट् n… जोर, फटका, आघात, हल्ल्याचा मुख्य जोर, एखाद्या गोष्टीचा सर्वात जास्त परिणाम.
bunny बनी n.ससा (a. मुलांच्या खेळण्यातील )
burden बS(र्)डन् n. कर्तव्य, दुःख. Burden of proof - सारांश, मुख्यांश सिद्ध करण्याची जवाबदारी
bureau ब्यूरो n. अनेक कप्प्यांची किंवा खणांची पेटी / कपाट / मेज, विशिष्ट व्यवसाय, संशोधन, पाहणी इ. कार्य करणारी संस्था, कार्यालय. pl. : bureaux, bureaus.
burger बS(र्) गर् n. भाजलेला / तळलेला / परतलेला मोठा पाव / केक ( मैदा - ढोकळा ) = ham burger
burglarious बर्ग्लेरियस् a. घरफोडी विषयक,घरफोड्या, घरफोडीचा.
burnish बर्निश् v.t.--- उजळून टाकणे, घासून तकाकी आणणे. n.--- चमक, तकाकी.
burst बS(र्)स्ट् n. स्फोट, भडका, बंदुकीच्या तोफेच्या गोळ्यांचा भडीमार.