Encampment एन्कॅम्पमेंट् n.--- तळ, मुक्काम.
Encapsulate इन्कॅप्सुलेट् v.i.--- कोशिकेंत (capsule) घालने. सारबद्ध करणे.
Encash v.t.--- -ला रोख पैशांत परिवर्तित करणे, (हुंडी, चेक इ.) वतविणे, रोखीने घेणे/प्राप्त करणे.
Enceinte आंसॅण्ट् a.--- (फ्रेंच) गर्भवती, गरोदर.
Encephalitis एन्सेफलाइटिस् n.--- मेंदूज्वर, मेंदूचा दाह, मस्तिष्क-शोथ (हिंदी).
Encephalon एन्सेफलॉन् n.--- मेंदू (हिंदी: मस्तिष्क/भेजा).
Enchain एन्चेन् v.t.--- सांखळीने बांधणे, गुंतविणे.
Enchant एन्चँट् v.t.--- भारणे, मंतरणे, मोहित करणे.
Enchanter एन्चँटर् n.--- जादूवाला, बीरमंत्री.
Enchantment एन्चँट्मेंट् n.--- मोहनी, चेटूक.
Enchase एन्चेस् v.t.--- जडणे, जडावाचे काम करणे.
Encircle एन्सर्कल् v.t.--- वेढा घालणे, कवटाळणे, वळसा घालणे, वेष्टणे.
Enclave एन्क्लेव्ह् n.--- (वेगळ्या प्रकारचे/लोकांचे) क्षेत्र, प्रांत, वसाहत.
Enclose एन्क्लोझ् v.t.--- गरका घालणे, आवार घालणे, आंत घालणे.
Enclosure एन्क्लोझर् n.--- कुंपण, आवाराची भिंत.
Encomium एन्कोमिअम् n.--- तारीफ, प्रशंसा, स्तुति.
Encompass इन्कम्पस् v.t.--- -ला गराडा घालणे, वेढणे, -ला मर्यादित/मर्यादाबद्ध/व्यावर्तित करणे.
Encore आँकॉर् n.--- (‘पुनः होऊ द्या’ इ. शब्दांनी व्यक्त झालेले) प्रेक्षकांचे/श्रोत्यांची दाद, पुनः करा म्हणून सांगणे, पुनः एकदा.
Encounter एन्काउन्टर् v.t.--- गांठ पडणे, गाठणे, भेटणे, लढणे. n.--- आकस्मिक भेट, सामना, लढाई.
Encourage एन्करेज् v.t.--- उत्तेजन/धीर्या देणे.
Encouragement एन्करेज्मेंट् n.--- प्रोत्साहन.
Encroach एन्क्रोच् v.i.--- दुसऱ्याच्या कामांत शिरणे, मर्यादेबाहेर जाणे, सीमोल्लंघन करणे.
Encrypt एन्क्रिप्ट् v.t.--- -ला संकेतबद्ध/गूढलक्षणांकित करणे.
Encumber एन्कम्बर् v.t.--- खोडा घालणे, डोक्यावर ओझे ठेवणे, भाराग्रस्त/ऋणग्रस्त करणे, अटकावणे, भार घालणे.
Encumbrance एन्कम्ब्रन्स् n.--- पायखोडा, गुंता.
Encyclical इन्सिक्लिकल् n.--- पोपचे कनिष्ठ पाद्र्यांना मार्गदर्शक पत्र.
Encyclopedia एन्सायक्लोपीडिआ n.--- विद्यासंग्रह.
End एन्ड् v.t. and v.i.--- समाप्त करणे/होणे, संपवणे, संपणे.
Endanger एन्डेन्जर् v.t.--- संकटात/धोक्यात/भयात घालणे.
Endear एन्डिअर् v.t.--- आवडता/प्यारा करणे.
Endeavour इन्डेव्हर् n./v.--- यत्न करणे, (निकराचा) प्रयत्न (करणे). यत्न.
Endemic एन्डेमिक् a.--- (रोग, दोष, इ.) साथीचा नव्हे असा, विशिष्ट स्थानी/बाबतीत वारंवार उद्भवणारा, सहज, प्रकृतिसिद्ध. साथीचा नव्हे असा; सहज, प्रकृतिसिद्ध (रोग, दोष, इ.).
Endi n.--- रेशमाची एक जात.
Endless एन्डलेस् a.--- अपार, अत्यंत, अनंत.
Endocrine एण्डक्रीन् a./n.--- शारीरगतरक्तप्रवाहात आपला स्त्राव थेट सोडणारा नलिकाविरहित (ductless) ग्रन्थि. (उदा: कंठग्रन्थि, पोषग्रन्थि). (पहा: ‘exocrine’).
Endorse एन्डॉर्स् v.t.--- सही करणे, शेरा लिहिणे.
Endorsement एन्डॉर्स्मेन्ट् n.--- सही, शेरा, लेख.
Endoscope एन्डस्कोप् n.--- शरीरांतील खोल/जटिल/गुंतागुंतीच्या भागाची पाहणी/छायाचित्रण करण्याचे यंत्र.
Endoscopy एन्डस्कोपी n.--- ‘Endoscope’ च्या सहाय्याने केलेली पाहणी/छायाचित्रण.
Endow एन्डाउ v.t.--- दान देणे, आंदण देणे.