unpack अन्पॅक् v.t.--- सोडणे, उपसून काढणे.
unpalatable अन्पॅलेटेबल् a.--- रुचि नसलेले, न आवडणारे, नावडता, अप्रिय.
unparalleled अन्पॅरलल्ड् a.--- अप्रतिम, अपूर्व, अनुपम.
unperformed अन्पर्फॉर्म्ड् a.--- न बनवलेले, न केलेले.
unpitying अन्पिटिइंग् a.--- निर्दय.
unpleasant अन्प्लेझण्ट् a.--- नावडता, कडू.
unpopular अन्पॉप्युलर् a.--- लोकांच्या अप्रीतीचा.
unpractised अन्प्रॅक्टिस्ड् a.--- अभ्यास नसलेला.
unprejudiced अन्प्रेजुडिस्ड् a.--- निःपक्षपाती.
unprepared अन्प्रिपेअर्ड् a.--- तयार न केलेला.
unprincipled अन्प्रिन्सिपल्ड् a.--- दुराचारी.
unproductive अन्प्रॉडक्टिव्ह् a.--- नापीक, व्यर्थ.
unprotected अन्प्रोटेक्टेड् a.--- निराश्रित, अनाथ.
unqualified अन्क्वालिफाइड् a.--- अयोग्य, अपात्र.
unquenchable अन्क्वेन्चेबल् a.--- ना विझवता येणारा, अशमनीय.
unquestionable अन्क्वश्चनेबल् a.--- निखालस, निःसंशय, निभ्रांत.
unravel अन्रॅव्हल् v.t. / v.i.--- (प्रश्न, कोडे, समस्याच, रहस्य, गुंतागुंत, अस्पष्टता इ.) उलगड(वि)णे, सुटणे / सोडविणे, स्पष्ट / विशद करणे / होणे. v.t.--- (वीण, गुंता इ.) सोडविणे, उसविणे, उलगडविणे. v.i.--- (संबंध, मैत्री, भागीदारी, करार इ. चे) तुटणे, मोडणे, भंगणे, सुटणे. (eg.--- The alliance between Visa International and Master Card appears to be unravelling.) (past tense / past participle - ‘unravelled’ / ‘unraveled’. ad.--- ‘unravelling’ / ‘unraveling’.)
unreasonable अन्रीझनेबल् a.--- अयुक्तिक, बेसुमार, फारच, अतिशय, अयोग्य.
unrecorded अन्रिकॉर्डेड् a.--- न नोंदलेला.
unrefined अन्रिफाइंड् a.--- न सुधारलेला, अडाणी.
unregarded अन्रिगार्डेड् a.--- अवमानित.
unrelenting अन्रिलेन्टिंग् a.--- कठीण, कठोर, निर्दय.
unremitting अन्रेमिटिंग् a.--- कमी न होणारा, सारखा चालणारा.
unreserved अन्रिझर्व्ड् a.--- पुरा, अखंड, मोकळ्या मनाचा, अमर्यादित.
unrestrained अन्रिस्ट्रेण्ड् a.--- बेबंद, अनावर.
unrewarded अन्रिवॉर्डेड् a.--- फळ / बक्षीस न मिळालेला.
unriddle अन्रिडल् v.t.--- कूट / गूढ उकळणे.
unrighteous अन्राय्चस् a.--- अधर्माचा, अन्यायाचा, अधार्मिक, पापाचारी, अनीतिमान, दुराचारी.
unripe अन्राइप् a.--- न पिकलेला, कच्चा.
unrivalled अन्राय्व्हल्ड् a.--- अप्रतिम, अनुपम.
unroll अन्रोल् v.t.--- गुंडाळी सोडविणे / सोडणे.
unroof अन्रूफ् v.t.--- छप्पर काढणे.
unruly अन्रूलि a.--- दांडगा, शिरजोर, अनावर.
unsafe अन्सेफ् a.--- धास्तीचे, भयाचा.
unsatisfactory अन्सॅटिस्फॅक्टरि a.--- नापसंतीचे.
unsatisfied अन्सॅटिस्फाइड् a.--- अतृप्त, असमाधानी.
unsavory अन्सेव्हरि a.--- बेचव, नावडता, अप्रिय.
unsay अन्से v.t.--- परत घेणे, मागे घेणे, असिद्ध करणे, खोडून काढणे.
unscathed अन्स्केद्ड् a.--- सहीसलामत, कसलाही अपाय /इजा ना पोचलेली.
unscrupulous अन्स्क्रूप्युलस् a.--- सद्सद्विवेकशून्य. निर्ढावलेला, तत्वशून्य.
unsealed अन्सील्ड् a.--- मोहोर न केलेले.
unseen अन्सीन् a.--- न पाहिलेले.
unserviceable अन्सर्व्हिसेबल्
unsettled अन्सेटल्ड् a.--- ठराव न झालेला, अस्वस्थ, चंचल, अशांत, क्षुब्ध.
unshaken अन्शेकन् a.--- न हालवलेला, गच्च, स्थिर.
unsheathe अन्शीथ् v.t.--- म्यानांतून उपसणे.
unshod अन्शॉड् a.--- अनवाणी, नाल नसलेला.
unsightly अन्साइट्लि a.--- विशोभित, बेढव.
unskilled अन्स्किल्ड् a.--- अनाडी, नाकसबी.
unsociable अन्सोशिएबल् a.--- एकलकोंडा, माणुसघाण्या.
unsold अन्सोल्ड् a.--- न विकलेला.
unsolicitous अन्सॉलिसिटस् a.--- निष्काळजी.
unsought अन्सॉट् a.--- न शोधलेला, अयाचित.
unspeakable अन्स्पीकेबल् a.--- न सांगता येण्यासारखे, अनिर्वाच्य.
unspotted अन्स्पॉटेड् a.--- डाग न पडलेला, बिन डागाचा, शुद्ध, निष्कलंक.
unsteady अन्स्टेडी a.--- क्षणिक बुद्धीचा.
unsubdued अन्सब्ड्यूड् a.--- न जिंकलेले, वश न झालेले.
unsubstantial अन्सब्स्टॅन्शिअल् a.--- पोकळ, निर्जीव, रिकामा, फुसका.
unsupported अन्सपोर्टेड् a.--- निराधार, पाठबळाशिवाय.
unsuspected अन्सस्पेक्टेड् a.--- संदिग्ध नसलेले.