W.P.P. ‘Witness Protection Programme’ चे संक्षिप्त रूप - घातक / धोकादायक गुन्हेगारांविरुद्ध महत्वाचा साक्षीदार असलेल्या व्यक्तीस साक्षीपूर्वी व नंतर अभेद्य संरक्षण देण्याची कायदेशीर व्यवस्था. साक्षि-रक्षा-व्यवस्था.
W.W.W./ WWW ‘World-Wide-Web’ चे संक्षिप्त रूप.
Wabble वॉबल् = v.i.--- लटपटणे, डगमगणे, तोल जाणे, डुगडुगणे, डळमळने, झोकांड्या खाणे. अनिश्चित असणे, निश्चय करण्यात डळमळणे. v.t.--- तोल घालवणे, डळमळीत करणे. = Wobble
Wabbly वॉब्ली a.--- डळमळीत, लटपटणारा, डुगडुगणारा, थरथरणारा, अनिश्चित, अस्थिर, डळमळणारा. = Wobbly.
Wack वॅक् v.t./v.i.--- जोराचा तडाखा हाणणे, बडवून काढणे. n.--- जोराचा तडाखा, तडाख्याचा फाड्कन् झालेला आवाज. भाग, वाटा. = Whack
Wacky वॅकी a.--- वेडाचारी, वेडपा. विदूषकी, विक्षिप्त, विचित्र, अजब, चक्रम.
Wad वॉड् n.--- कापूस, गवत, भुसा, इ. चे थर / पुंज. चुंबळ, पुडके, पेंडी, बोळा. नोटांचे किंवा कागदपत्रांचे बंडल. कापसाचा किंवा मऊ कापडाचा किंवा मऊ लोकरीचा बोळा. दोन वस्तू बांधताना इ. त्यांमध्ये (पॅकिंगसाठी) घालावयाचा एखाद्या मऊ कापडाचा किंवा कागदाचा बोळा/घडी इ..v.t.--- घट्ट गुंडाळी करणे, कोंबणे, भरणे, एका जागी स्थिर ठेवण्यासाठी घट्ट कोंबणे. ‘Wad’ ने भरणे / जाड करणे.
Wadding वॅडिंग् n.--- बोळा, चोंदा, पुरण.
Waddle वॉडल् v.i.--- बदकासारखे डुलत डुलत फेंगडे चालणे, डुलत डुलत चालणे. छोट्या छोट्या पावलांनी डुलत डुलत चालणे. n.--- डोलती / वेडीवाकडी चाल.
Waddy वॉडी n.--- ऑस्ट्रेलियातील आदिवासी हत्यार म्हणून वापरतात असा एक जड लाकडी सोटा. v.t.--- ह्या सोट्याने हाणणे.
Wade वेड् v.i.--- अवघड रस्त्यातून/मातीतून/वाळूतून/पाण्यातून इ. वाट काढत जाणे. v.t.--- प्रयासाने मार्ग काढीत ओलांडून जाणे.
Wader वेडर् n.--- अवघड रस्त्यातून/मातीतून/वाळूतून/पाण्यातून इ. वाट काढत जाणारी व्यक्ती किंवा वस्तू. लांब पाय, मान, व चोच असलेले उथळ पाण्यात राहणारे पक्षी (सारस, बगळा, करकोचा इ. सारखे), समुद्र-किनाऱ्यावर वसणारे छोटे किंवा मध्यम आकाराचे पक्षी (Sea gull इ. सारखे). मच्छीमारांचे किंवा कामगारांचे पाण्यात काम करताना घालावयाचे जलरोधक उंच बूट.
Wadi वाडी n.--- ओहोळ, पावसाळ्यात वाहणारा लहान ओढा. खोल अरुंद दरी. = Wady
Wading pool वेडिंग पूल n.--- लहान मुलांना पोहण्यासाठी / खेळण्यासाठी छोटा उथळ पाण्याचा तलाव.
Wadmal वॉड्मल् n.--- थंडीचे टिकाऊ कपडे बनविण्यासाठी वापरले जाणारे जाड लोकरीनी बनलेले अवजड कापड. = Wadmaal, Wadmol, Wadmoll, Wadmel.
Wadmol =Wadmal
Wadset वॉड्सेट् n.--- गहाण. v.t.--- गहाण ठेवणे.
Wady = Wadi
Waesucks वेसक्स् interjection --- हाय! आह! = Alas!
Wafer वेफर् n.--- (बटाट्याची) पातळ कुरकुरीत चकती. वेफर. सील करण्यासाठी वापरली जाणारी पातळ (लाख इ. ची) चकती. v.t.--- सील करणे, वेफरने चिकटविणे. Wafer-thin a.--- (वेफर सारखी) अतिशय पातळ.
Waff वॅफ् n.--- ओझरता दृष्टिक्षेप. वाऱ्याचा झोत, वाऱ्याचा भपका.
Waffle वॅफल् n.--- वटवट, बडबड, बरळ. दोन्ही बाजूला चौकोनी कप्पे असलेला एका प्रकारचा खुसखुशीत केक. वायफळ बडबड किंवा लिखाण.; v.i.--- व्यर्थ बडबड करणे, दुटप्पी बोलणे, वायफळ बडबड करत बसणे, वायफळ संदिग्ध लिहिणे. Waffle cloth --- मधमाश्यांच्या पोळ्याप्रमाणे (चौकोनी कप्प्यांसारखे दिसणारे) विणून बनविलेले कापड.
Waft वॅफ्ट् v.t.--- वाहवत जाणे / नेणे, पाण्यावरून किंवा हवेतून सहजतेने तरंगत नेणे. v.i.--- हवेतून तरंगत जाणे, तरंगणे, दरवळणे. n.--- हेलकावा, (वारा, सुगंध, इ. ची) मंद झुळूक, हेलकाव्याची हालचाल.
Wag वॅग् v.t.--- हालवणे, डोलवणे, डुलणे,एकीकडून दुसरीकडे किंवा वरून खाली वारंवार व जोरात हालवणे, (वायफळ बडबड करताना) सतत तोंड/जीभ चालविणे,एखाद्या व्यक्तीकडे तिरस्कारासपद बोट नाचवणे. n.--- थट्टेखोर, विदूषक, गोष्टीवेल्होळ मनुष्य, गमत्या, चेष्टेखोर. v.i.--- एकीकडून दुसरीकडे किंवा वरून खाली वारंवार व जोरात हालणे.
Wage वेज् v.t.--- चालविणे, पैज मारणे. Wages n.--- पगार, बक्षीस, पगार, वेतन, कामाचा मोबदला, खंड. Wage earner / Wageworker n.--- श्रमजीवी, मजुरीवर जगणारा, मजूर, पगारदार.
Wager वेजर् v.t.--- पैज मारणे.(भांडण, तंटा, युद्ध, इ.) चालू ठेवणे, आघाडी उघडणे. पैसा, वस्तू, इ. पैजेला लावणे. n.--- पैज, पण. पैजेवर / पणाला लावलेली वस्तू/रक्कम. पैजेवर / प्रतिज्ञेवर केलेले विधान / प्रक्रिया. पैज, जुगार. v.i.--- पैज लावणे, जुगार खेळणे.
Waggery वॅगरि n.--- थट्टा, कौतुक. गोष्टीवेल्होळ माणसाचे गमतीचे बोलणे, चेष्टेखोर व्यक्तीने केलेली गंमत /थट्टा/चेष्टा/मस्करी.
Waggish वॅगिश् a.--- थट्टेखोर, चेष्टेत / मस्करीत / थट्टेत केलेला, चेष्टेखोर, खोडकर.
Waggle वॅगल् v.t.--- वारंवार व जोरात वरून खाली किंवा एकीकडून दुसरीकडे हालवणे. v.i.--- वारंवार व जोरात वरून खाली किंवा एकीकडून दुसरीकडे हालणे.
Waggly वॅग्ली a.--- अस्थिर, अदृढ.
Waggon / Wagon वॅगन् n.--- चौचाकी गाडी, चारचाकी माल वाहून नेणारी उघडी गाडी, मालगाडीचा डबा, मालगाडी. बाळाची चारचाकी ढकलगाडी.
Wagonage वॅगनेज् n.--- माल वाहून नेण्यासाठी लागणारे पैसे. मालवाहतुकीसाठी लागणारी रक्कम.
Wagoner वॅग्नर् n.--- चारचाकी गाडीचा चालक.
Wagonette वॅगनेट् n.--- छत असलेली किंवा नसलेली चार चाकी छोटी बग्गी.
Wagtail वॅग्टेल् n.--- चालताना सतत हालणारी अशी लांब शेपटी असलेला एक गाणारा पक्षी.
Wah wah वा वा a.--- तुतारीच्या घंटेवर तात्पुरता हात ठेवल्याने जसा आवाज येईल तसा मोठा आवाज. n.--- असा आवाज काढणारे इलेक्ट्रॉनिक संगीत-यंत्र.
Wahine वाहीनी n.--- (हवाई व पॉलिनेशिया मध्ये) मुलगी किंवा तरुण स्त्री.
Wahoo वाहू n.--- फुलं धारण करणारे एक झुडूप. ह्याला ‘Burning bush’ असेही म्हणतात.
Waif वेफ् n.--- अनाथ/असहाय बालक/व्यक्ति. गृहहीन/बेपत्ता/बेघर मूल/मनुष्य. परित्यक्त वस्तू/व्यक्ति, मालक नसलेली वस्तू. हरवलेला प्राणी/माणूस. सडपातळ व लहान ठेवण असलेली व्यक्ती सहसा स्त्री. Waif look = अतिशय तरुण व सडपातळ पेहराव असलेली फॅशन शैली.
Waifish वेफिश् a.--- अतिशय हडकुळा, अशक्त, फाटके-तुटके कपडे घातलेला. बेघर, उपेक्षित.
Wail वेल् v.t.--- आक्रोश करणे.(कोणासाठी तरी) दुःख व्यक्त करणे, शोक करणे, तक्रार करणे. n.--- आक्रोश, विलाप, रुदन, विलाप, शोक, दुःख, आक्रोश, रडका आवाज. v.i.--- आक्रोश, विलाप, गळा काढून रडणे, (माणसाच्या रडण्यासारखा) वाऱ्याचा किंवा गाण्याचा आवाज येणे.
Wailful वेल्फुल् a.--- शोकाकुल, उदास, व्याकुळ, विषण्ण, शोकपूर्ण. आळशी.
Wain वेन् n.--- चारचाकी गाडा, खटारा.
Wainscot वेन्स्कट् / वेन्स्कॉट् n.--- भिंतीवरील खालच्या बाजूस बसविलेली लाकडी तक्तपोशी. अश्या तक्तपोशीचे लाकूड. v.t.--- भिंतीवर तक्तेबंदी करणे.
Wainwright वेन्-राइट् n.--- ‘Wagons’ तयार करणारा, चारचाकी उघडी मालगाडी बनविणारा.
Waist वेस्ट् n.--- कंबर, कमर, शरीरातील बरगड्या व नितंब यांमधला भाग. पोषाखाचा कंबर झाकणारा भाग.
Waist coat --- बंडी.
Waistband वेस्ट्बॅण्ड् n.--- कमरपट्टा, कंबरपट्टा, कमरबंद.
Waistcloth वेस्ट्क्लॉथ् n.--- लंगोटी, लंगोट, लुंगी.
Waistcoat वेस्कट् / वेस्ट्कोट् n.--- जाकीट, अंगरखा, बंडी.
Waistline वेस्ट्लाइन् n.--- कमरेचा घेर, कमरकटि.
Wait वेट् v.i.--- वाट पाहणे, दम धरणे, थांबणे. (कामासाठी इ.) सिद्ध (तयार) असणे / उपलब्ध असणे. v.t.--- -ची वाट पाहणे / वाट बघणे. खोळंबून ठेवणे. n.--- उशीर, खोळंबा, वाट, प्रतीक्षा. प्रतिक्षेचा वेळ / काळ. Wait upon --- सेवाचाकरी करणे, खस्ता खाणे.
Waiter वेटर् n.--- खिजमतगार, खानावळीतला वाढपी. वाट पाहणारा, प्रतीक्षा करणारा. v.i.--- खानावळीत वाढप्याचे काम करणे.
Waitering वेटरिंग् n.--- वाढप्याचे काम.
Waiting वेटिंग् n.--- प्रतीक्षेचा काळ, विराम, खंड, उशीर. a.--- प्रतीक्षा करणारा, वाट पाहणारा. Waiting list n.--- प्रतीक्षा करणाऱ्यांची यादी. परिणाम/निकाल अनिश्चित असलेल्यांची किंवा थोपवून/थांबवून धरलेल्यांची यादी. = Waitlist (n.). Waitlist v.t.--- निकाल अनिश्चित असलेल्यांच्या यादीत नाव घालणे.
Waitress वेट्रेस् n.--- खानावळीत वाढणारी स्त्री. हॉटेलात काम करणारी महिला. v.t.--- वेट्रेस् म्हणून काम करणे.
Waitron वेट्रॉन् / वेट्रन् n.--- खानावळीत काम करणारी व्यक्ति (स्त्री किंवा पुरुष). = Waiter or Waitress.
Waitstaff वेट्स्टाफ् n.--- ‘Waitron’ चे काम करणारे कर्मचारी. = Wait staff.
Waive वेव्ह् v.t.--- वगळणे, (एखाद्या गोष्टीचा) आग्रह न धरणे, हक्क इ. सोडून देणे, माफ करणे. पुढे ढकलणे, लांबणीवर टाकणे. (जागा, अधिकार इ.) सोडणे, (श्रद्धा, कल्पना, हेतू इ. चा) त्याग करणे. स्थगित करणे, विचार न करणे, मनातून काढून टाकणे.
Waiver वेवर् n.--- हक्क सोडल्याची चिठ्ठी, सूट दिल्याची चिठ्ठी/लेख/कागदपत्र. त्यागचिठ्ठी, सोडचिठ्ठी.
Wake वेक् v.t.(often followed by ‘up’)--- सावध करणे, जागे करणे, अज्ञान दूर करणे, जागा करणे / होणे, जागणे, जागविणे. n.--- जागरण.जागे असण्याची स्थिति (eg. ‘in between sleep and wake’). (past tense: Waked / Woke. Past participle: waked / Woken / Woke.) v.i.--- झोपेतून उठणे, जागे होणे, स्वप्नातून जागे होणे, निश्चल अवस्थेतून जागे होणे, जागृत होणे, सावध होणे.
Wakeboarding वेक्बोर्डिंग् n.--- पाण्यावरती स्पीडबोटने ओढल्या जाणाऱ्या सर्फबोर्डवर करामती दाखवायचा खेळ.
Wakeful वेक्फुल् a.--- जागा, न झोपलेला, झोप नसलेला, निद्रारहित, निद्राविमुख, जागृत, निद्राहीन, सावध, दक्ष.
Wakeless वेक्लेस् a.--- गाढ झोपलेला, गाढ झोपेचा.
Waken वेकन् v.i./ v.t.--- जागे होणे / करणे, प्रेरित करणे, सावध होणे / करणे. उठणे, उठविणे. v.t.--- झोपेतून उठवणे, उत्तेजित करणे, चेतवणे.
Waking वेकिंग् n.--- जागृति.
Wale वेल् n.--- विणलेल्या वस्तूंमधे उभी विणलेली पट्टी / शृंखला. जखमेची खूण, आघात झाल्याची खूण. छडी किंवा चाबकाच्या आघातामुळे त्वचेवर उठलेला जखमेचा ओरखडा / डाग. v.t.--- त्वचेवर जखमेचे ओरखाडे काढणे / डाग देणे. (विणकामात) उभ्या उभ्या पट्ट्या विणणे.
Walk वॉक् v.i.--- चालणे, सहल करणे, पायी चालणे, रपेट मारणे, पायाखाली घालणे. v.t.--- रपेट करायला लावणे, पायी चालवणे. n.--- सहल, वाट, वर्तन, गति, वागणूक, रपेट, फेरफटका. पायी चालायचे अंतर, पायी चालत जाण्यास लागणारा वेळ. Walk off --- निघून जाणे. Walk over --- प्रतिस्पर्धी नसताना शर्यतीच्या मार्गावर नुसते चालून शर्यत जिंकणे, कोणतीही स्पर्धा लीलया जिंकणे. Walk out --- विरोध दर्शवत सभेतून निघून जाणे, बहिष्कार / त्याग करणे, सोडून जाणे. Walk through n./v.t.--- एखाद्या कामाचे प्रात्यक्षिक (करणे),एखाद्या जागेचे पायी फिरून दर्शन (घेणे/करणे), एखाद्या प्रक्रियेचे क्रमाक्रमाने मार्गदर्शन (करणे).
Walkable वॉकेबल् a.--- चालण्यास योग्य, चालत ओलांडण्यासारखा, चालत जाण्यासारखा.
Walkabout वॉकबाउट् n.--- पायी काढलेली सहल, राजघराणातील व्यक्ती इतर प्रसिद्ध व्यक्तींना किंवा सर्वसामान्य व्यक्तींना भेटतात व त्यांच्यात वावरतात असा प्रसंग. आपल्या मूळ ठिकाणी जाण्यासाठी व नातेवाईकांना भेटण्यासाठी घेतलेली अनौपचारिक रजा, कामावरून अनुपस्थिति.
Walkaround pay वॉकराउंड् पे n.--- अधिकृत निरीक्षकासोबत कारखान्याच्या दौऱ्यावर जाऊन कर्मचाऱ्याने मिळविलेले अतिरिक्त वेतन.
Walkathon वॉकथॉन् n.--- धर्मदानासाठी (Charity साठी) निधी जमा करण्यासाठी व त्याबरोबरच सहनशक्ती तपासण्यासाठी मोठे अंतर चालून जाण्याची प्रायोजकांनी आयोजित केलेली शर्यत.
Walkaway वॉकवे n.--- बंदीगृहातून किंवा रुग्णालयातून कोणाचे लक्ष नसताना निघून जाणारी व्यक्ती. सोपा विजय, सहज मिळालेले यश.
Walkdown वॉक्-डाउन् n.--- पायऱ्यांनी खाली जाता येण्यासारखे जमिनीखाली स्थित (भूमिगत) घर किंवा दुकान. a.--- भूमिगत, जमिनी खालील, रस्त्याखालील.
Walker वॉकर् n.--- चालणारा, फिरत जाणारा. चालायला शिकत असलेल्या बाळाला किंवा अक्षम माणसाला आधारासाठी धरता येण्यासारखी कमरेपर्यंत उंच असलेली व पायाखाली चाकं असलेली दोन किंवा चार पायांची धातूची फ्रेम.
Walkie-talkie वॉकी-टॉकी n.--- ट्रान्समीटर आणि रिसीव्हर जोडून बनविलेला हलका व सहज एकीकडून दुसरीकडे नेता येण्यासारखा रेडिओ टेलिफोन.
Walkover वॉकोह्वर् n.--- सहज मिळालेला विजय, सहज मिळालेले यश, सहज पूर्ण झालेले काम.
Walkthrough वॉक्थ्रू n.--- कथानकाची स्क्रिप्ट वाचता वाचता केलेली सिनेमाची किंवा नाटकाची रंगीत तालीम. नवख्या व्यक्तीला एखादी प्रक्रिया किंवा कार्यपद्धती क्रमाक्रमाने समजावून सांगणारे प्रात्यक्षिक.
Walkway वॉक्वे n.--- चालण्यायोग्य मार्ग, चालत जाण्यासारखा (विशेषतः दोन इमारतींना जोडणारा किंवा एकाच इमारतीच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे नेणारा) रस्ता.
Walky-talky = Walkie-talkie.
Wall वॉल् v.t.--- भोवती अडथळा / भिंत बांधणे. सर्व बाजूंनी भिंत / कुंपण बांधणे. सगळीकडून घेरून टाकणे. n.--- भिंत, कुसूं, तट, अडथळा, कुंपण, अटकाव, प्रतिबंध; बाह्यतम संरक्षणात्मक थर.
Wall up वॉल् अप् v.t.--- भिंत घालून बंद करणे.
Wallet वॉलिट्/ वॉलट् n.--- पडशी, झोळी, बटवा, बारावी, चंची. पैसे, नोटा इ. ठेवायचे पुस्तकासारखे दुमडायचे पाकीट. कागदपत्रे, नोटा इ. ठेवायची छोटी कागदी किंवा कापडी किंवा चामडी प्रवासी पिशवी. छोटी हत्यारे नेण्याची पेटी. (संस्कृत: भस्त्रिका)
Walleye वॉलाय् n.--- एक मोठे डोळे असलेला मासा.
Wallflower वॉल्फ्लावर् n.--- सामूहिक नृत्याच्या वेळी जोडीदार न मिळाल्यामुळे किंवा लाजून बाजूला बसलेली व्यक्ती (विशेषतः स्त्री).
Wallop वॉलप् v.t.--- खूप झोडपून काढणे, पूर्ण पाडाव करणे, जोरात हाणणे, (खेळात इ.) पूर्ण हरवणे, ठोकणे, मार देणे, चीत करणे. v.i.--- (द्रवपदार्थ) जोरात उकळणे.उसळणे, भडकणे. n.--- जोरदार तडाखा, मार, ठोकर, प्रहार, वज्रपात.
Wallow वॉलो v.i.--- लोळणे, दुर्व्यसनांत गर्क असणे. खूप चैन करणे. कष्टाने हालचाल करणे. (माती, चिखल, बर्फ, इ. मध्ये) उत्साहात लोळणे. (धूर इ. चे) वर किंवा पुढे सरसावणे.
Wallpaper वॉल्पेपर् n.--- भिंत, छत इ. वर चिकटवायचा नक्षीदार रंगीत कागद. संगणकाच्या पडद्याच्या पार्श्वभूमीवर लावलेले चित्र. v.t.--- ‘वॉल्पेपर’ छतावर किंवा भिंतीवर लावणे / चिकटवणे.
Walnut वॉल्नट् n.--- अक्रोड, अक्रोडाचे झाड, अक्रोडाचे लाकूड.
Walrus वॉल्रस् n.--- थंड बर्फ़ाळ प्रदेशात आढळणारा दोन लांब सुळे असलेला व जाड कातड्याचा ‘Seal’ सारखा प्राणी.
Waltz वॉल्स् n.--- गिरक्या घेत सरकत जाण्याचे युगलांचे एक समूहनृत्य. गिरक्यांचे सरकनृत्य. एक नृत्याचा प्रकार ज्यात स्त्री पुरुषांच्या जोड्या प्रत्येक ठेक्यावर एक एक पाऊल ठेवत एकसारख्या गोल गोल फिरतात. अश्या प्रकारच्या नृत्याचे संगीत. v.i.--- असे नृत्य करणे / अशा तऱ्हेने भटकणे.
Wamble वॉम्बल् v.i.--- अस्थिर हालचाल करणे, झोक जात चालणे, मळमळणे. n.--- अस्थिर हालचाल, मळमळ, ओकारी, (पोटातील) गुरगुर. पोटातील मळमळ.
Wampish वॅम्पिश् v.i.--- हेलकावे खाणे, मागे पुढे होणे, झोके खाणे.
Wampus वॉम्पस् n.--- एक विचित्र आक्षेपार्ह व्यक्ति किंवा वस्तू. आडमुठ्या, रासवट मनुष्य.
Wamus वॉमस् n.--- सैलसर विणलेले व कमरपट्टा असलेले लोकरीचे जाड जाकीट.
Wan वॉन् a.--- निस्तेज, फिकट, क्षीण, ग्लान, मरगळलेला, कोमेजलेला, थकलेला, प्रकाशहीन, फिकट चेहऱ्याची (व्यक्ति). v.i./v.t.--- निस्तेज करणे / होणे.
Wanchancy वन्चान्सी a.--- (स्कॉटिश शब्द) दुर्दैवी, अपशकुनी, विलक्षण, अस्वाभाविक, भीतीदायक, गूढ, अगम्य, असुरक्षित, अपायकारक. = Unchancy
Wand वॉण्ड् n.--- कांठीं, (परी, जादूगार इ. कडील) जादूची कांडी. (शेरीफ इ. कडील) अधिकारदर्शक दंड. सौंदर्य-प्रसाधनासाठी वापरला जाणारा ब्रश. एखाद्या झाडाचे/ झुडपाचे कोवळे देठ/शाखा.
Wander वॉण्डर् v.i.--- भटकणे, बहकणे, मार्ग सोडणे, इतस्ततः भटकणे, नेहमीचा मार्ग सोडून चुकून भलतीकडे जाणे, भटकणे, हरवणे, (सहज म्हणून विनाहेतू) भ्रमण करणे.
Wanderer वॉण्डरर् n.--- भटकणारा, ओढाळ, भटक्या.
Wanderlust वॉण्डर्लस्ट् n.--- प्रवास करण्याची किंवा भटकंतीची तीव्र इच्छा.
Wanderoo वॉण्डरू n.--- जांभळ्या चेहऱ्याचे व चेहऱ्याभोवती लांब केस असलेले श्रीलंकेत किंवा दक्षिण भारतात आढळणारे माकड.
Wandoo वॉण्डू n.--- पश्चिम ऑस्ट्रेलियात सापडणारे निलगिरीचे झाड (ह्याचे साल पांढरे असून लाकूड अत्यंत टिकाऊ असते); ह्या झाडाचे लाकूड.
Wane वेन् v.i.--- क्षीण होणे, तेज कमी होणे, लहान/क्षीण होत जाणे, (चंद्राची कला) उतरती / लहान होत जाणे, शक्ती, कीर्ती इ. चा ऱ्हास होणे. बंद होत जाणे, शेवटाजवळ जाणे. n.-- क्षय, उतार, पाया, उतरती दशा, अवकळा, ऱ्हास, उतरती कला (चंद्राची). शक्तीचा / तीव्रतेचा / आयुष्याचा उतार.
Wangle वॅङ्गल् v.t.--- लबाडीने हवी असलेली गोष्ट/वस्तु प्राप्त करणे. n.--- लबाडी, लबाडीने मिळविलेली वस्तु/गोष्ट.
Wanigan वॉनिगन् n.--- अन्न-धान्याचा साठा असलेले चालते-फिरते चाकं असलेले छोटे तात्पुरते घर / कोठार. पुरवठ्याचा पेटारा. लाकूडतोड्याची पेटी.
Wanion वॉन्यन् शाप, अपशब्द, सूड, बदला, त्वेष.
Wanna वॉन = ‘Want to’ किंवा ‘Want a’ चे बोलीभाषेतील स्पेलिंग.
Wannabe (= ‘Want to be’) वॉनबी n.--- (अंध)भक्त, भगत, चेला. दुसऱ्याच्या यशाचे किंवा श्रेष्ठतेचे अनुकरण करण्याची इच्छा (बहुधा व्यर्थच) बाळगणारी व्यक्ति. = Wannabee
Wannish वॉनिश् a.--- फिकट, बेरंग, मरगळलेला, म्लान.
Want वॉण्ट् v.i.--- गरज असणे, कमी पडणे, जवळ नसणे, हवे असणे, गरज पडणे. n.--- गरज, उणीव, प्रयोजन, दारिद्र्य, इच्छा, कमतरता, अभाव. v.t.--- -ची गरज असणे, -ची इच्छा असणे, (काहीतरी) हवे असणे.
Wanton वॉण्टन् v.i.--- इषकबाजी करणे, बेलगाम वागणे. a./n.--- इषक्बाज, लुच्चा. स्वेच्छाचारी, रंगेल, आनंदी, स्वैर, स्वच्छंद, वाह्यात, फाजील, अनिर्बंध, अमर्याद (व्यक्ति), गमत्या, कामुक व्यक्ति (विशेषतः स्त्री). a.--- बेलगाम, खेळकर, भरमसाठ, अपवित्र, नीतिभ्रष्ट (विशेषतः स्त्री). v.t.--- (सुखात/चैनीत) गमावणे.